पुणे शहर

मंदार बलकवडे यांच्याकडून निधी संकलन मोहिमेतील सदस्यांकडे १ लाख रुपये निधी सुपूर्द

कोथरुड : श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन मोहीम चालू आहे. यात प्रत्येकजण आपला खारीचा वाटा उचलत आहे. मंदार चंद्रशेखर बलकवडे यांच्याकडूनही १ लाख रुपये व मंदार बलकवडे मित्र परिवाराच्या वतीने ५१ हजार रुपये असा एकूण १ लाख ५१ हजार रूपयांचा निधी निधी संकलन मोहिमेतील सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी संभाजी भागाचे कार्यवाह सुधीर जवळेकर, तरुण व्यवसायी प्रमुख -पुणे महानगर योगेश थत्ते,  मधुसुदन पारखी , कार्यवाह -संभाजी नगर नितिन फाटक , तरुण व्यवसायी प्रमुख- संभाजी नगर  रोहित पाचंगे  , वस्ती प्रमुख – गणेशनगर नितीन केसवड माजी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक दिपक पोटे, पुनीत जोशी, ॲड.धर्मेंद्र खांडरे, संगीतकार पियुष कुलकर्णी, पांडूरंग मोरे, मोहन शिगवण, सुरेश पळसकर, रूपेश अटक, मंगेश मते, सतीश दिघे, कुंदन तळेकर, कैलास मोरे व केदार बलकवडे उपस्थित होते.

अयोध्यातील श्री राम मंदिर हा सर्वांच्याच श्रध्देचा विषय आहे. हे मंदिर उभा राहत असल्याने या मंदिर उभारण्यात आपला खारीचा वाटा असावा असे माझ्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटत होते. म्हणून आज माझ्याकडून व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने निधी सुपूर्द करण्यात आला.

Img 20201213 wa0074
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये