महाराष्ट्र

एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा याचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने  जाहीर करण्यात आले आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर २०२० रोजी निश्चित करण्यात आली होती, मात्र सुधारित वेळापत्रकानुसार ती आता ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

११ ऑक्टोबर २०२० रोजी निश्चित करण्यात आलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आता २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पूर्वी निश्चित केलेल्या १ नोव्हेंबर २०२० याच तारखेला होणार आहे.

Img 20200907 195318 1

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये