कोथरुड
खिलारेवाडी तरुण मंडळाच्या देवीची आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती

कोथरूड : खिलारेवाडी तरुण मंडळ नवरात्रौ उत्सवातील देवीची आरती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध उद्योजक समीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केले. याप्रसंगी सचिन फोलाने, शशिकांत कांबळे व पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



