Amol Sable – Sinhasan News

वारजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते हायवे चौकापर्यंत प्रस्तावित मेट्रोसाठी डबल डेकर उड्डाण पूल करण्याची मागणी…
नगरसेविका तेजश्री पवळे यांनी केंद्रीय मंत्री,मुरलीधर मोहोळ यांना दिले निवेदन

कर्वेनगर : वारजे येथील आंबेडकर चौक ते हायवे चौक येथील प्रास्तावित मेट्रोसाठी डबल-डेकर उड्डाणपूल उभारण्याची मागणी नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. यावर खासदार मोहोळ यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी तेजश्री महेश पवळे यांनी सविस्तर निवेदन सादर करीत पौड फाटा ते वनदेवी पर्यंत होत असलेल्या डबल-डेकर उड्डाणपूल हा पुढे कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलावरून मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्याची मागणी केली. सध्याच्या आराखड्यानुसार हिंगणे होम कॉलनी परिसरातील सुमारे १८ घरे बाधित होण्याची शक्यता असून, पर्यायी आराखडा स्वीकारल्यास नागरिकांची घरे वाचतील, अनावश्यक भूसंपादन टळेल आणि शासनाचा खर्चही कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे हायवे चौक या दरम्यानही भविष्यातील वाहतुकीचा विचार करून वाहनांसाठी स्वतंत्र उड्डाणपूल व त्यावर मेट्रो मार्गासह डबल-डेकर उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणे शहराला दीर्घकालीन आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नागरिकहित, शहराचा नियोजनबद्ध विकास आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती सौ. तेजश्री महेश पवळे यांनी केंद्रिय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे केली.

हे अपघात नाहीत… हे शासकीय निष्काळजीपणाचे बळी..
पुणे: राज्यात सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पावसापेक्षा अधिक भयावह ठरत आहे तो शासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता. गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन धक्कादायक घटनांनी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

मुंबईत उघड्या किंवा असुरक्षित मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका निष्पाप चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. तर आणखी एका ठिकाणी पावसाच्या पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे दोन तरुणी मृत्यूशी झुंज देत आहेत. या तिन्ही घटनांमध्ये परिस्थिती वेगवेगळी असली, तरी त्यामागील कारण एकच आहे—संबंधित यंत्रणांचा हलगर्जीपणा आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे.

पावसाळा दरवर्षी येतो. त्यामुळे कोणत्या ठिकाणी मॅनहोल धोकादायक आहेत, कोणती झाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, कोणत्या भागात विद्युत यंत्रणा धोकादायक ठरू शकते, याची माहिती प्रशासनाकडे असते. तरीही पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती, झाडांची छाटणी, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजना वेळेत का केल्या जात नाहीत, हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे.

प्रत्येक दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश दिले जातात, दोषींवर कारवाईची भाषा केली जाते, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली जाते. मात्र काही दिवसांनी ही प्रकरणे फाईलमध्ये बंद होतात आणि परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. परिणामी, पुढच्या पावसात पुन्हा एखादा निरपराध नागरिक किंवा निष्पाप बालके अशाच निष्काळजीपणाचा बळी ठरतात.

लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून विकासकामांचे दावे मोठ्या प्रमाणात केले जातात. कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाल्याची माहिती दिली जाते. पण जर नागरिकांना सुरक्षित रस्ते, सुरक्षित पदपथ, सुरक्षित वीज व्यवस्था आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा देता येत नसतील, तर त्या विकासाचा सामान्य नागरिकाला नेमका काय उपयोग?

या घटना केवळ अपघात म्हणून विसरून चालणार नाहीत. त्या प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी, देखभालीचा अभाव आणि जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीचे जिवंत उदाहरण आहेत. प्रत्येक मृत्यूमागे एका कुटुंबाचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य आहे. एखाद्या आई-वडिलांनी आपले मूल गमावले आहे, तर एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष कायमचा निघून गेला आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोन तरुणींच्या कुटुंबीयांवर आज काय मानसिक अवस्था असेल, याची कल्पनाही करवत नाही.

आज गरज आहे ती केवळ शोक व्यक्त करण्याची नाही, तर जबाबदारी निश्चित करण्याची. ज्या विभागांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण, उघड्या मॅनहोलची तातडीने सुरक्षितता, धोकादायक झाडांची छाटणी, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक आहे.

कारण प्रत्येक वेळी पावसाला दोष देणे सोपे असते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, अनेक निरपराध नागरिकांचा जीव पावसामुळे नाही, तर मानवी निष्काळजीपणामुळे जात आहे. जर आजही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे झाले नाहीत, तर उद्या पुन्हा एखादे कुटुंब अशाच निष्काळजीपणाची किंमत आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव गमावून मोजत असेल.

नागरिकांच्या जीवापेक्षा कोणतीही व्यवस्था मोठी नाही. प्रशासन जबाबदारीने काम करणार का ? त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची ? आणि अशा घटनांना जबाबदार कोण ? यावर आता नागरिकांनी एकत्र येऊन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची गरज आहे.

वनाज ते चांदणी चौक महामेट्रो प्रकल्पाला मिळणार गती ; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
पुणे : वनाज ते चांदणी चौक महामेट्रो विस्तार प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, तसेच कोथरूड, बावधन आणि परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, या उद्देशाने केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील मेट्रो भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

नगरसेविका अल्पना वरपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, अतुल गाडगीळ, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका रूपाली पवार, स्वीकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, ॲड. गणेश वरपे, कोथरूड सिटिझन फोरमचे प्रशांत कानोजिया, निलेश सैंदाने, विशाल अट्टल, अमित बोत्रे, राहुल चव्हाण, तसेच पुणे महानगरपालिका व महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या प्रगतीतील तांत्रिक, प्रशासकीय अडचणी आणि विविध त्रुटींवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची गती वाढविण्यासाठी आवश्यक त्या सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांच्या या प्रकल्पाबाबत. असणाऱ्या सूचना व अडचणीही जाणून घेत त्यावर सकारात्मक भूमिका मांडली.

कोथरूड, बावधन आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, प्रस्तावित मेट्रो स्थानकांची जागा, उड्डाणपुलाशी संबंधित नियोजन आणि नागरिकांच्या विविध मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

याबाबत नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या की, कोथरूड कचरा डेपो ते लोहिया जैन आयटी पार्कच्या अलीकडपर्यंत दुहेरी उड्डाणपूल होणार असून त्यामध्ये भारतीनगर आणि कोथरूड बस डेपोचा चौक कव्हर होत आहे, तसेच कोथरूड बस डेपोला लागूनच मेट्रो स्टेशन होणार आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे . नागरिकांचीही तशीच मागणी असल्याने त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. आजच्या बैठकीत प्रकल्पाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच पुढील कार्यवाहीला वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले की, चांदणी चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यास भुसारी कॉलनी, बावधन तसेच मुळशी परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वनाज ते चांदणी चौक महामेट्रो विस्तार प्रकल्प हा पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या आढावा बैठकीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“मावळे, जिजाऊ आणि बालशंभूरायांच्या रूपातून इतिहास झाला जिवंत!”
कर्वेनगरमध्ये मोरया मित्र मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साही वातावरणात साजरी

पुणे : धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि हिंदवी साम्राज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोरया मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत भक्तीभाव, अभिमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसर “जय शिवराय… जय शंभूराजे…”च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि प्रत्येकाच्या मनात इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा जागा झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याते मोहनराव शेटे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाली. काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या शिवव्याख्यानात मोहनराव शेटे यांनी संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान यांचा इतिहास जिवंत करून दाखवला. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि भावनेचे अश्रू तरळले.

या जयंती महोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा. चिमुकल्या मुलांनी मावळे, राजमाता जिजाऊ, बालशिवबा आणि बालशंभूराजे यांची वेशभूषा साकारत इतिहास जणू प्रत्यक्ष उपस्थित केला. त्या निरागस चेहऱ्यांवर दिसणारा स्वराज्याचा अभिमान पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. पालकांनी आपल्या मुलांचे कौतुक करत मोबाईलमध्ये हे अविस्मरणीय क्षण टिपले.

यासोबतच राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या चित्रांमधून आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांविषयीचा आदर आणि इतिहासावरील प्रेम व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नगरसेवक स्वप्नील दुधाने आणि खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा मुकुंद भेलके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका रेश्मा संतोष बराटे, इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य मंगेश नवघणे, संभाजी गावडे, कैलास सरतापे, गजानन कड, संजय गाडे, अनंता केंडे, शिवाजी भोईटे, रामदास राजहंस, बेबी करेकर, मंडळाचे अध्यक्ष अथर्व भरम, उपाध्यक्ष गणेश शिंदे, खजिनदार गणेश गायकवाड, कार्याध्यक्ष अक्षय केसवड, माजी अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक केदार मारणे म्हणाले, “मुलांना इतिहास फक्त पुस्तकांतून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजावा आणि त्यांच्या मनात स्वराज्याचा अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे मुलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत राहू.”

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केदार मारणे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर प्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. रोहिदास जाधव यांनी आभार मानले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा केवळ उत्सव नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात स्वराज्याचा इतिहास, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

– प्रथम क्रमांक : प्रणव शशिकांत जाधव (पलूस, सांगली)
– द्वितीय क्रमांक : अथर्व विठ्ठल गुरव (चंदगड, कोल्हापूर)
– तृतीय क्रमांक : आकांक्षा दलपत चव्हाण (कन्नड, संभाजीनगर)

चित्रकला स्पर्धा (चित्र रंगवणे)

– प्रथम : आराध्य सोमनाथ लांडे
– द्वितीय : श्रीकृष्ण अरुण पवार
– तृतीय : कार्तिक नितीन पाटील
– उत्तेजनार्थ : सई अविनाश मारणे, तेजुल शरद पवार

चित्रकला स्पर्धा (चित्र काढणे)

– प्रथम : अर्थव अनंत सुतार
– द्वितीय : गौरव गोविंद दुब्बे
– तृतीय : आयुषी धर्मेंद्र सिंग

शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा

– प्रथम : काव्या सोमनाथ लांडे
– द्वितीय : हिंदवी गणेश रजपूत
– तृतीय : ओवी नेताजी भोसले
– उत्तेजनार्थ : अंथाग अमृत मारणे (२ वर्षे), शुभ्रा विवेक कोतवाल, सार्थक बालाजी बिरादार

पुणे महापालिकेच्या संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी ; गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल
तत्कालीन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी लावलेले रोपटे आज झाले वटवृक्ष

पुणे : एखादी चांगली कल्पना, त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर ठेवलेला विश्वास यांचे सुंदर फळ कसे मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुणे महानगरपालिकेची संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनी होय. सन २०१३ मध्ये तत्कालीन शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी संगीत आणि कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एका छोट्या रोपट्याप्रमाणे या संगीत विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली होती. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून, त्याची साक्ष यंदाच्या शंभर टक्के निकालाने पुन्हा एकदा दिली आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम आणि तबला वादनाच्या प्रारंभिक व प्रवेशिका प्रथम परीक्षांमध्ये प्रभात रस्त्यावरील संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये परीक्षेला बसलेल्या १९० विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. यामध्ये ५४ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता, तर १०० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तसेच १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले.

हा निकाल केवळ आकड्यांचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या अथक सरावाचा, शिक्षकांच्या समर्पणाचा आणि पालकांच्या विश्वासाचा प्रवास आहे. रियाजाच्या प्रत्येक सुरातून, तबल्याच्या प्रत्येक ठेक्यातून आणि हार्मोनियमच्या प्रत्येक स्वरातून घडलेले हे यश अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे उपायुक्त शिक्षण वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, क्रीडा विभाग प्रमुख माणिक देवकर, सहाय्यक शिक्षण प्रमुख (क्रीडा) विनायक तुम्मा, क्रीडा अधिकारी रुबीना शेख, पर्यवेक्षिका मीना जाधव, मुख्याध्यापक मंगेश राजहंस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संगीत शिक्षिका दीपाली कोल्हटकर, अर्चना इरपतगिरे आणि उमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करत त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

निकालानंतर भावना व्यक्त करताना माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, “शिक्षण मंडळाचा अध्यक्ष असताना संगीत आणि कलेची आवड असलेल्या मुलांसाठी ही संगीत प्रबोधिनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. आज त्या स्वप्नाला यशाचे सुंदर पंख फुटलेले पाहताना मन भरून येते. या विद्यार्थ्यांचे यश पाहून खऱ्या अर्थाने समाधान मिळते. त्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पणाचे फळ आहे. भविष्यातही ही मुले संगीत क्षेत्रात मोठी भरारी घेतील, असा विश्वास वाटतो.”

संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीचा हा निकाल केवळ शैक्षणिक यश नाही, तर संगीत संस्कारांची जपणूक, कलेबद्दलची निष्ठा आणि एका दूरदृष्टीच्या संकल्पनेचे यशस्वी वास्तवात झालेले रूपांतर आहे. आज या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, बाबा धुमाळ यांनी लावलेल्या त्या छोट्याशा रोपट्याने खऱ्या अर्थाने एका समृद्ध वटवृक्षाचे रूप धारण केले आहे.

मेट्रो कामाचा ताण येणार डीपी रस्त्यावर ; शांतीबन चौक ते भुसारी कॉलनी रस्ता ३६ मीटरचा करावा…
नगरसेविका अल्पना वरपे यांनी घेतली आयुक्तांची भेट

पुणे : कोथरूड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि आगामी मेट्रो तसेच उड्डाणपूल प्रकल्पांचा विचार करता शांतीबन चौक गणेश मंदिर ते डावी भुसारी कॉलनीमार्गे हायवे सर्व्हिस रोडपर्यंतचा रस्ता ३६ मीटर रुंद करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पना वरपे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

अलीकडेच शांतीबन चौक ते डावी भुसारी कॉलनी (हायवे सर्व्हिस रोडपर्यंत) जाणारा डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता सुरू झाल्यापासून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्याची रुंदी केवळ १५ मीटर असून परिसरातील वाढती लोकसंख्या, नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची वाढ आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता ही रुंदी अपुरी ठरत आहे.

सदर डीपी रस्त्यालगत असलेल्या काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे नियोजन आगामी काळात होणार आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रभावीपणे सोडविण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे अल्पना वरपे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी देताना रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करता येऊ शकते. त्यामुळे भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन पुनर्विकास आणि रस्ता रुंदीकरण यांचे समन्वित नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

यासंदर्भात त्यांनी प्रशासनाचे लक्ष आगामी काळातील महत्त्वाच्या विकासकामांकडे वेधले आहे. पौड रस्त्यावर वनाज ते चांदणी चौक या दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम तसेच उड्डाणपूल उभारणीची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामांदरम्यान मुख्य रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर पर्यायी मार्गांकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सद्यस्थितीतील शांतीबन चौक,  एकलव्य पासून पुढे हायवे सर्व्हिस रस्त्यापर्यंत असणारा १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीचा वाढीव ताण सहन करू शकणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या रस्ता सुरू झाल्यानंतरच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना प्रवासासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. भविष्यात मेट्रो आणि उड्डाणपूलाच्या कामामुळे या समस्येची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे वरपे यांनी म्हटले आहे.

यासाठी शांतीबन चौक गणेश मंदिर ते डावी भुसारी कॉलनी येथील हायवे सर्व्हिस रोडपर्यंतचा संपूर्ण डीपी रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अल्पना वरपे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी तसेच भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बढेकर ग्रुपचा ‘वर्षातील सर्वोत्तम कर्मचारी २०२६’ पुरस्कार आकाश कदम यांना प्रदान
बढेकर ग्रुपच्या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाटा महत्वाचा : प्रवीण बढेकर

पुणे : पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय आणि प्रतिष्ठित नाव असलेल्या बढेकर ग्रुपतर्फे वर्षातील सर्वोत्तम कर्मचारी (Employee of the Year 2026) म्हणून आकाश कदम यांचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या परंपरेनुसार दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा उत्कृष्ट कामगिरी, निष्ठा आणि समर्पित सेवेमुळे आकाश कदम यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.

बढेकर ग्रुपमध्ये विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड करून त्याचा गौरव केला जातो. संस्थेच्या वाढीमध्ये आणि यशामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याची भावना या उपक्रमामागे आहे. यंदा आकाश कदम यांनी आपल्या कामातील सातत्य, जबाबदारीची जाणीव आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या जोरावर हा मान पटकावला.

यावेळी बोलताना बढेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बढेकर यांनी आकाश कदम यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “संस्थेच्या यशामागे कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. आकाश कदम यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने, अथक परिश्रमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून संस्थेच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नसून इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”

ते पुढे म्हणाले की, “बढेकर ग्रुप कायमच आपल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करत आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतल्याने त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण होते आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा” मिळते. जसे आमच्या  ग्राहकांबरोबर आमचे विश्वासाचे नाते आहे तसेच कर्मचाऱ्यांशी ही आहे. संस्थेच्या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाटा महत्त्वाचा आहे.

हा सन्मान केल्याबद्दल आकाश कदम यांनी बढेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बढेकर आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. संस्थेने दाखविलेल्या विश्वासामुळे अधिक जबाबदारीने आणि समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बढेकर ग्रुपकडून दिला जाणारा हा सन्मान कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेणारा असून संस्थेमध्ये सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यास मदत करणारा ठरत आहे.

अन्नदात्यासाठी रोहित पवारांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन ; सरसकट कर्जमाफीच्या मागणीला वाढता पाठिंबा
आजचा दुसरा दिवस..रोहित पवारांची तब्यात खालावली

पंढरपूर  : राज्यातील शेतकऱ्यांना जाचक अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे शुक्रवार (१२ जून) पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी बांधव, विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून रोहित पवार यांची तब्येत खालावली असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची मोठी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी आणि निकष लागू केल्याने मोठ्या संख्येने शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

रोहित पवार आंदोलनाला बसल्यानंतर या आंदोलनाला अधिक पाठिंबा मिळू लागला आहे. विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते पंढरपूर येथे भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आहेत. अनेक संघटनांनी लेखी स्वरूपात समर्थनपत्र देत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

याशिवाय राज्यातील विविध भागांतील शेतकरी स्वतः पंढरपूर येथे येऊन आंदोलनस्थळी भेट देत आहेत. वैयक्तिक स्तरावर पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही मोठी असून सामाजिक माध्यमांवरही या आंदोलनाची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ एका राजकीय नेत्याचे न राहता शेतकऱ्यांच्या व्यापक प्रश्नांशी जोडले गेले असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींचा फेरविचार करावा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सरकार यावर कोणती भूमिका घेते, याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या…

1) 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ
50 हजारापर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करुन सर्व
शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी.

2) एकवेळ समझोतामध्ये (OTS) 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करुन
सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी.

3) 2 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम आधी भरण्याची अट न टाकता सरकारने सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी.

4) प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग दोन वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी.

5) 2017 च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांअभावी 2017 कर्जमाफीचा लाभ रखडलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्यात यावी.

6) पिकविमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून
1 रुपयांमध्ये पीकविमा योजना पुन्हा लागू करावी.

7) पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी, जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल.

कर्वेनगर मधील भालेकर उद्यानाबाहेरील कचरा प्रश्नी नगरसेविका तेजश्री पवळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी… स्वतः उभे राहून पदपथ करून घेतला साफ
सिंहासन News च्या वृत्ताची घेतली दखल

पुणे, कर्वेनगर : कर्वेनगर परिसरातील भालेकर उद्यानाबाहेरील पदपथावर मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.  या प्रश्नाबाबत सिंहासन News ने वृत्त आणि व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली त्याच बरोबर तत्काळ प्रत्यक्ष जागेवर साफसफाईची करून घेत पदपथ कचऱ्यातून मुक्त केला.

भालेकर उद्यानाच्या सीमाभिंतीलगत असलेल्या पदपथावर नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने त्या ठिकाणी अक्षरशः कचरा डेपो तयार झाला होता. पदपथावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि घुशींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

स्थानिक नागरिकांच्या मते, काही दिवसांपूर्वी स्वच्छ संस्थेकडून याच ठिकाणी फिडर पॉईंट उभारण्यात आल्याने कचऱ्याचे प्रमाण आणखी वाढले. कचऱ्यामुळे घुशींची संख्या वाढून त्यांनी उद्यानाच्या सीमाभिंतीखाली बिळे केल्याने भिंतीची मजबुतीही धोक्यात आली होती. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वी याबाबत लक्ष्मी नारायण सोसायटीच्या वतीने तसेच प्रतीक नलावडे यांच्याकडूनही क्षेत्रीय कार्यालयात तक्रारही देण्यात आली होती.

विशेष म्हणजे पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीनेही धोका निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर सिंहासन News ने या प्रश्नावर सविस्तर व्हिडिओ वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. वृत्त प्रसारित होताच नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून घेत कचऱ्याच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा जाबही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

केवळ सूचना देऊन न थांबता पवळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण पदपथाची साफसफाई करून घेतली. काही तासांतच कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला. स्वच्छ झालेला परिसर पाहून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेविका तेजश्री पवळे यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

तेजश्री पवळे म्हणाल्या की, “नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. भालेकर उद्यान परिसरातील हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी योग्य नियोजन केले जाईल. पदपथावर पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.”

<svg width="50px" height="50px" viewBox="0 0 60 60" version="1.1" xmlns="https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink"><g stroke="none" stroke-width="1" fill="none" fill-rule="evenodd"><g transform="translate(-511.000000, -20.000000)" fill="#000000"><g><path d="M556.869,30.41 C554.814,30.41 553.148,32.076 553.148,34.131 C553.148,36.186 554.814,37.852 556.869,37.852 C558.924,37.852 560.59,36.186 560.59,34.131 C560.59,32.076 558.924,30.41 556.869,30.41 M541,60.657 C535.114,60.657 530.342,55.887 530.342,50 C530.342,44.114 535.114,39.342 541,39.342 C546.887,39.342 551.658,44.114 551.658,50 C551.658,55.887 546.887,60.657 541,60.657 M541,33.886 C532.1,33.886 524.886,41.1 524.886,50 C524.886,58.899 532.1,66.113 541,66.113 C549.9,66.113 557.115,58.899 557.115,50 C557.115,41.1 549.9,33.886 541,33.886 M565.378,62.101 C565.244,65.022 564.756,66.606 564.346,67.663 C563.803,69.06 563.154,70.057 562.106,71.106 C561.058,72.155 560.06,72.803 558.662,73.347 C557.607,73.757 556.021,74.244 553.102,74.378 C549.944,74.521 548.997,74.552 541,74.552 C533.003,74.552 532.056,74.521 528.898,74.378 C525.979,74.244 524.393,73.757 523.338,73.347 C521.94,72.803 520.942,72.155 519.894,71.106 C518.846,70.057 518.197,69.06 517.654,67.663 C517.244,66.606 516.755,65.022 516.623,62.101 C516.479,58.943 516.448,57.996 516.448,50 C516.448,42.003 516.479,41.056 516.623,37.899 C516.755,34.978 517.244,33.391 517.654,32.338 C518.197,30.938 518.846,29.942 519.894,28.894 C520.942,27.846 521.94,27.196 523.338,26.654 C524.393,26.244 525.979,25.756 528.898,25.623 C532.057,25.479 533.004,25.448 541,25.448 C548.997,25.448 549.943,25.479 553.102,25.623 C556.021,25.756 557.607,26.244 558.662,26.654 C560.06,27.196 561.058,27.846 562.106,28.894 C563.154,29.942 563.803,30.938 564.346,32.338 C564.756,33.391 565.244,34.978 565.378,37.899 C565.522,41.056 565.552,42.003 565.552,50 C565.552,57.996 565.522,58.943 565.378,62.101 M570.82,37.631 C570.674,34.438 570.167,32.258 569.425,30.349 C568.659,28.377 567.633,26.702 565.965,25.035 C564.297,23.368 562.623,22.342 560.652,21.575 C558.743,20.834 556.562,20.326 553.369,20.18 C550.169,20.033 549.148,20 541,20 C532.853,20 531.831,20.033 528.631,20.18 C525.438,20.326 523.257,20.834 521.349,21.575 C519.376,22.342 517.703,23.368 516.035,25.035 C514.368,26.702 513.342,28.377 512.574,30.349 C511.834,32.258 511.326,34.438 511.181,37.631 C511.035,40.831 511,41.851 511,50 C511,58.147 511.035,59.17 511.181,62.369 C511.326,65.562 511.834,67.743 512.574,69.651 C513.342,71.625 514.368,73.296 516.035,74.965 C517.703,76.634 519.376,77.658 521.349,78.425 C523.257,79.167 525.438,79.673 528.631,79.82 C531.831,79.965 532.853,80.001 541,80.001 C549.148,80.001 550.169,79.965 553.369,79.82 C556.562,79.673 558.743,79.167 560.652,78.425 C562.623,77.658 564.297,76.634 565.965,74.965 C567.633,73.296 568.659,71.625 569.425,69.651 C570.167,67.743 570.674,65.562 570.82,62.369 C570.966,59.17 571,58.147 571,50 C571,41.851 570.966,40.831 570.82,37.631"></path></g></g></g></svg>

View this post on Instagram

<svg width="50px" height="50px" viewBox="0 0 60 60" version="1.1" xmlns="https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink"><g stroke="none" stroke-width="1" fill="none" fill-rule="evenodd"><g transform="translate(-511.000000, -20.000000)" fill="#000000"><g><path d="M556.869,30.41 C554.814,30.41 553.148,32.076 553.148,34.131 C553.148,36.186 554.814,37.852 556.869,37.852 C558.924,37.852 560.59,36.186 560.59,34.131 C560.59,32.076 558.924,30.41 556.869,30.41 M541,60.657 C535.114,60.657 530.342,55.887 530.342,50 C530.342,44.114 535.114,39.342 541,39.342 C546.887,39.342 551.658,44.114 551.658,50 C551.658,55.887 546.887,60.657 541,60.657 M541,33.886 C532.1,33.886 524.886,41.1 524.886,50 C524.886,58.899 532.1,66.113 541,66.113 C549.9,66.113 557.115,58.899 557.115,50 C557.115,41.1 549.9,33.886 541,33.886 M565.378,62.101 C565.244,65.022 564.756,66.606 564.346,67.663 C563.803,69.06 563.154,70.057 562.106,71.106 C561.058,72.155 560.06,72.803 558.662,73.347 C557.607,73.757 556.021,74.244 553.102,74.378 C549.944,74.521 548.997,74.552 541,74.552 C533.003,74.552 532.056,74.521 528.898,74.378 C525.979,74.244 524.393,73.757 523.338,73.347 C521.94,72.803 520.942,72.155 519.894,71.106 C518.846,70.057 518.197,69.06 517.654,67.663 C517.244,66.606 516.755,65.022 516.623,62.101 C516.479,58.943 516.448,57.996 516.448,50 C516.448,42.003 516.479,41.056 516.623,37.899 C516.755,34.978 517.244,33.391 517.654,32.338 C518.197,30.938 518.846,29.942 519.894,28.894 C520.942,27.846 521.94,27.196 523.338,26.654 C524.393,26.244 525.979,25.756 528.898,25.623 C532.057,25.479 533.004,25.448 541,25.448 C548.997,25.448 549.943,25.479 553.102,25.623 C556.021,25.756 557.607,26.244 558.662,26.654 C560.06,27.196 561.058,27.846 562.106,28.894 C563.154,29.942 563.803,30.938 564.346,32.338 C564.756,33.391 565.244,34.978 565.378,37.899 C565.522,41.056 565.552,42.003 565.552,50 C565.552,57.996 565.522,58.943 565.378,62.101 M570.82,37.631 C570.674,34.438 570.167,32.258 569.425,30.349 C568.659,28.377 567.633,26.702 565.965,25.035 C564.297,23.368 562.623,22.342 560.652,21.575 C558.743,20.834 556.562,20.326 553.369,20.18 C550.169,20.033 549.148,20 541,20 C532.853,20 531.831,20.033 528.631,20.18 C525.438,20.326 523.257,20.834 521.349,21.575 C519.376,22.342 517.703,23.368 516.035,25.035 C514.368,26.702 513.342,28.377 512.574,30.349 C511.834,32.258 511.326,34.438 511.181,37.631 C511.035,40.831 511,41.851 511,50 C511,58.147 511.035,59.17 511.181,62.369 C511.326,65.562 511.834,67.743 512.574,69.651 C513.342,71.625 514.368,73.296 516.035,74.965 C517.703,76.634 519.376,77.658 521.349,78.425 C523.257,79.167 525.438,79.673 528.631,79.82 C531.831,79.965 532.853,80.001 541,80.001 C549.148,80.001 550.169,79.965 553.369,79.82 C556.562,79.673 558.743,79.167 560.652,78.425 C562.623,77.658 564.297,76.634 565.965,74.965 C567.633,73.296 568.659,71.625 569.425,69.651 C570.167,67.743 570.674,65.562 570.82,62.369 C570.966,59.17 571,58.147 571,50 C571,41.851 570.966,40.831 570.82,37.631"></path></g></g></g></svg>

View this post on Instagram

महायुतीत पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवरून खलबते; भाजप की राष्ट्रवादी कोण मारणार बाजी ?
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुण्यातील जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पुण्याच्या जागेवर जोरदार दावा ठोकल्याने उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पुण्याची जागा कोणाला सुटणार यावर आगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १ जून २०२६ पर्यंत वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मजबूत संख्याबळ असल्याने दोन्ही पक्षांकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यात भाजपने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिकांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही ग्रामीण भागात आपली पकड कायम ठेवत संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ही जागा प्रतिष्ठेची मानत आहेत.

भाजपकडून संघटनात्मक काम करणाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेल्या काही नावांची चर्चा सुरू आहे.   दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समन्वय साधू शकणाऱ्या नेत्याच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी पुण्याची जागा सोडण्यास दोन्ही पक्ष फारसे तयार नसल्याचे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असते तर भाजपने या जागेसाठी एवढा जोर लावला नसता पण दादा नसल्याने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी, बैठका आणि मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे पुण्याची जागा अखेर भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली बाजू वरचढ कशी हे सांगत जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, राहुल कुल, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जागा भाजपलाच सुटली पाहिजे व पक्षाने पुण्याचा जागेवरचा आग्रह सोडू नये अशी भूमिका मांडली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे, सुनील टिंगरे, निलेश निकम,माजी उपमहापौर दीपक मानकर, विलास लांडे, सुरेश घुले, योगेश बहल या पुणे शहर व जिल्ह्यातील नेत्यांनीही पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगत या जागेवर दावा सांगितला आहे. तर पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही आपली भूमिका मांडली आहे.

भाजपचे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आमचे ३३३ मतदार असल्याचे सांगत या जागेवर ठाम दावा सांगितला आहे. तर त्याला प्रत्युत्तर देत सुनील टिंगरे, निलेश निकम यांनी आमचे ३४४ मतदार सदस्य असल्याचा दावा करत पुण्याच्या जागेवर राष्टवादीचाच स्वाभाविक हक्क आल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहर पातळीवरील नेत्यांमध्ये जागेवर वाद सुरू असून ही जागा कोणाला सुटणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा तिढा कसा सोडवणार हे पाहावे लागणार आहे. आगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा वाद सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.