पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळाला; सुषमा अंधारेंचा आज पक्षप्रवेश

मुंबई : प्रसिद्ध वक्त्या आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Sushma Andhare will join Shiv Sena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
काही दिवसापूर्वी अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान अंधारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार आहे. सध्या शिवसेना कोणाची यावरून पेच निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. मात्र अशा स्थितीत देखील अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेणे धाडसाचं मानल जात आहे.
कोण आहेत सुषमा अंधारे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. राष्ट्रवादीच्या त्या स्टार प्रचारक होत्या. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीचा मोठा चाहता वर्ग आहे. अंधारे यांची भाषण रोखठोक आणि मुद्देसूद असतात त्यामुळं ती समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक भाषणांचा फायदा शिवसेनेला आगामी काळात मिळू शकतो.
