पुणे शहर

कोथरुड ग्रामस्थांच्या वतीने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

चंद्रकांत पाटील यांचे कोथरूडमध्ये जंगी स्वागत

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नुकतीच राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. त्याबद्दल कोथरूड ग्रामस्थांच्या वतीने मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांचे कोथरूडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी नानासाहेब भेलके, बाळासाहेब मोकाटे, निरोध्दीन पटेल रामभाऊ माथवड, विलास बोडके, शंकर मोकाटे, सुनील बरके, हरिभाऊ कुंबरे, महादेव वांभिरे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्याच्या मंत्रीपदी नुकतीच निवड झाली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांचे कोथरूड मध्ये आगमन झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच म्हातोबाची मनोभावे पूजा केली. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Fb img 1647413711531

यानंतर पाटील यांचे कोथरुडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पाटील यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्त्री शिक्षणाचे जनक महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Img 20220801 wa0304

कोथरूडचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कॅबिनेट मंत्री झाले, ही आम्हा सर्व कोथरूडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे समस्त कोथरुडकरांच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा गौरव करणं, हे आमचं दायित्व असल्याची भावना म्हातोबा मंदिराचे विश्वस्त नाना कुंबरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये