पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँकेच्या निवडणूकीसाठी श्री स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार जाहीर
श्री स्वामी समर्थ पॅनेलचे प्रमुख दीपक मानकर यांच्याकडून उमेदवार यादी जाहीर
पुणे : पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को- ऑप. अर्बन बँक लि. पुणे या बँकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणूकी साठी श्री स्वामी समर्थ पॅनेल च्या अधिकृत उमेदवारांची घोषणा पॅनेलचे प्रमुख व माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली.
श्री स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण गट– विठ्ठल नामदेव जगदाळे, बाळकृष्ण दत्तात्रय उंदरे, अजय लक्ष्मण गोळे, शेखर संभाजी सावंत, हनुमंत रघुनाथ खेडेकर, सुनील सदाशिव पोमण, अंकुश लक्ष्मण कदम, राजेंद्र धोंडिबा कोंडे,
महिला राखीव गट– तनुजा रुपेश रावळ, सुवर्णा अनिल हारपुडे ,
अनुसूचित जाती जमाती गट– सुनिल दत्तात्रय कांबळे,
इतर मागासवर्ग– गजानन उर्फ किरण लक्ष्मण खोंड,
विमुक्त जाती भटक्या जमाती- रामदास भुजंगराव गायकवाड
दीपक मानकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील पगारदार नागरी सहकारी बँकाचा मुकुटमणी अशी सार्थ ओळख असणारी व सहकारी चळवळीच्या गेल्या १०८ वर्षाच्या उल्लेखनीय वाटचालीत आदर्शवत कार्य करणारी, सामाजिक बांधिलकी जोपासणारी सभासद, ठेवीदार, खातेदारांचे हित सातत्याने जपणारी कामगारांच्या कल्याणाकरिता चालविलेली आपली ही कामगारांची बँक वैभवशाली प्रगती करीत आहे.
सहकारी चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे शोभणाऱ्या आपल्या बँकेने मागील ५ वर्षात अतिशय आधुनिक संगणक प्रणाली, आर.टी.जी. एस.ची सुविधा, एस.एम.एस.ची सुविधा, कर्ज मर्यादा १० लाख करुन गतिमान कर्ज अर्ज मंजुरी, अशी दैदिप्यमान प्रगती केली आहे.
पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे हित जपणारी ही एकमेव सहकारी संस्था असून कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये साथ देणारी ही आपली संस्था आहे. सभासदांच्या हिताकरिता सभासदांचे प्रश्न तळमळीने व जिव्हाळयाने सोडविण्याकरिता व बँकेला विकासाची गती देण्याकरीता मागील ५ वर्षात आपण रिझर्व्ह बँकेची परवानगी घेऊन पुणे महानगरपालिका भवन येथे तळमजल्यावर व स्वारगेट डेपो शेजारी असे दोन “विस्तारीत कक्ष” सुरू केले. आप-आपल्या परिसरात बँकेची शाखा सुरू झाल्याने सभासदांची उत्तमरित्या सोय झाली.
मानकर म्हणाले, आता आपल्या बँकेच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुक होत आहे, यासाठी सभासदांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारे तसेच बँकेच्या हितासाठी सदैव झटणारे, पुणे मनपा, पी.एम.पी.एम.एल. व शिक्षण मंडळ या तीनही विभागातील क्रियाशील कामगार सभासद एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ पॅनेलच्या वतीने निवडणुक लढवीत आहेत.
हे सर्व उमेदवार आप-आपल्या विभागातील संघटनेत कामगार हितासाठी अनेक वर्ष पुर्ण वेळ कार्यरत आहेत. याशिवाय जास्त अनुभवी संचालक म्हणुन कार्य केलेले उमेदवार याच पॅनेलमध्ये आहेत, सर्वच उमेदवार बँकींग व सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव तसेच कामगारांशी जवळीक असलेले, सभासदांच्या हितासाठी काम करणारे आणि अखंडपणे सेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्ते आहेत.सभासदांच्या हितासाठी वचनबध्द असलेल्या आपल्या श्री स्वामी समर्थ पॅनेलला आपण, आपले बहुमोल मत देऊन उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी. 20 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांनी मतदान करून श्री स्वामी समर्थ पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन दीपक मानकर यांनी केले आहे.
One Comment