पुणे जिल्हा – Sinhasan News

जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदीप घोणे यांनी मिळवली पीएचडी
पुणे – जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदीप घोणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमार्फत बँकिंग आणि वित्त या अभ्यास मंडळातून ‘विद्यावाचस्पती (Ph.D.)’ पदवी संपादन केली आहे. “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वित्तीय कामगिरी आणि समस्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.

हे संशोधन एम.एम.सी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे या संशोधन केंद्रातून पूर्ण करण्यात आले. तसेच संशोधन कार्यादरम्यान त्यांनी आपल्या विषयाशी संबंधित ९ संशोधन पत्रे राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करून प्रसिद्ध केली आहेत.

सौ. अमृता संदिप घोणे या जेजुरीच्या माजी नगराध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच, कोल्हापूर जिल्ह्याच्या निरीक्षक म्हणूनही त्या जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच बरोबरीने आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीसाठी सुद्धा त्या ओळखल्या जातात. राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळत असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ जपली. लग्नानंतर त्यांनी एम. कॉम. पदवी, पहिल्याच प्रयत्नात SET परीक्षा उत्तीर्ण, जीडीसी अँड ए आणि आता विद्यावाचस्पती ही पदवी संपादन करून उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवले आहे.

राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एकाच वेळी उत्तुंग यश संपादन करणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब असून त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. यामुळे समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.

या यशस्वी प्रेरणेमागे शाहु, फुले आंबेडकर यांची विचारधारा मार्गदर्शक ठरली, असे त्यांनी सांगितले. शिकण्याची आवड निर्माण करणारे आपले वडील श्री. अनिल ज्ञानेश्वर कांबळे यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. तसेच या यशस्वी शैक्षणिक व राजकीय प्रवासात त्यांना त्यांचे पती श्री. संदीप अशोक घोणे (माजी अध्यक्ष, खंडोबा देवस्थान ट्रस्ट, जेजुरी) यांचा मोलाचा पाठिंबा व प्रोत्साहन व सतत मिळणारा आधार हेच त्यांच्या यशामागील महत्त्वाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांचा परिवार आणि सहकार्य करणाऱ्या सर्व हितचितंकांचे त्यांनी आभार मानले.

पुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : शिरुरच्या माजी आमदारांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी आमदार राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आ. राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्री पलांडे, धर्मेंद्र खांडरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश माननीय मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पानशेत पाणलोटातील अन्यायकारक कारवाईचा विधिमंडळात मुद्दा उपस्थित ! आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत केली ही मागणी…
गरिबांची घरे जमीनदोस्त – रिसॉर्ट, हॉटेल्स मात्र अबाधित!

मुंबई :  महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात आज (दि. १८, जुलै, २०१५) खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पानशेत पाणलोट क्षेत्रात खडकवासला जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेल्या अन्यायकारक कारवाईबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी, वंझारवाडी (ता. वेल्हा) येथील धरणग्रस्त शेतकरी किसन शंकर कडू, विजय दिनकर कडू व हरिभाऊ शंकर कडू यांच्या पूर्वकालीन घरांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करत ती घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही घरे अनेक वर्षांपासून अस्तित्वात होती व या कुटुंबांचे पानशेत धरणग्रस्त म्हणून पुनर्वसन झाल्याचा इतिहासही आहे.

मात्र, विशेष बाब म्हणजे त्याच परिसरातील पाणलोट क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स व व्यावसायिक बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे आमदार तापकीर यांनी अधोरेखित केले.

या संदर्भात सभागृहात पुढील दोन महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या:

1. गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या अनधिकृतपणे उभी असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स व व्यावसायिक बांधकामांची सविस्तर यादी व अहवाल सादर करण्यात यावा.
2. अशा अतिक्रमणधारकांची नावे, मालकीचा प्रकार, संबंधित भूखंडाची स्थिती व त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अथवा प्रलंबित कारवायांची माहिती शासनाने जाहीर करावी.

“एकाच पाणलोट क्षेत्रात गरिबांच्या घरांवर कारवाई करत, श्रीमंत व्यावसायिक घटकांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असेल, तर ती शासनव्यवस्थेची मोठी तातडीने दखल घेण्याची गरज असलेली अन्यायकारक बाब आहे,” असे मत आमदार तापकीर यांनी मांडले. शासनाने या प्रकरणात निष्पक्ष व एकसमान कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी विधानसभेत केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा, दौंड तालुका शाखेचा उत्साहात शुभारंभ
दौंड :  नरसिंह जयंतीचे औचित्य साधुन दौंड येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजासाठी अनेक वर्षे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणारी अनेक ब्रह्मवृंद या बैठकीत सहभागी झाले.

यावेळी सर्वानुमते एकविचारांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची पुणे जिल्ह्यातील शाखा क्रमांक 21 घोषित करून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत दौंड शहरातील 600 ब्राह्मण कुटुंबापर्यंत संपर्क करुन दौंड शाखेशी जोडून घेण्याबाबत नियोजन करण्यात आले.

या बैठकीत पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली व दौंड शाखा स्थापन करण्याच्या प्रक्रियेची माहिती सांगितली, जिल्हा सरचिटणीस राहुल जोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली. दौंड येथील ब्राह्मण समाज एकत्र करण्यासाठी कुटुंब व कुटुंबातील सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे यावेळी  ठरले.

या बैठकीला अर्चना साने, दीपक गटणे, मंगेश वैद्य, बी.जी. नगरकर, योगेश खंगे गुरुजी, आनंद भालचंद्र नगरकर, श्रीमती खंगे , प्रभाकर जोगळेकर उपस्थित होते.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अधिकाऱ्यांना निर्देश..
पुणे :  जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे,  दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप,  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,  पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण,  जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे.  गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे.  या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद आणि आयुका संस्थेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुका, नासा व इस्त्रो या संस्थेस भेटीबाबत मदत करण्यासोबतच तेथील कामकाजाबाबत माहिती व शास्त्रज्ञाच्या भेटीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.  तसेच  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर्ड हेल्थ ॲक्शन प्लॅन’चे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शूरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळाचा विकास आराखड्यात समावेश करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे प्रशासनास निर्देश
कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यविधी करणारे शूरयोद्धा गोविंद गणपत गायकवाड यांचे वढु बुद्रुक (ता शिरूर जि. पुणे) येथील समाधीस्थळ उपेक्षित आहे. या समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ तुळापूर, वढु बुद्रुक येथील विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३०२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या विकास आराखड्याचे काम सुरू असून या विकास आराखड्यात शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळाचा समाविष्ट करण्यात यावा, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी दिनांक ३१ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या तुळापूर, वढु बुद्रुक येथील समाधीस्थळी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांचा तुळापूरच्या सरपंच अॕड. गुंपा इंगळे, वढुचे सरपंच ज्ञानेश्वर भंडारे यांनी सन्मान केला. तसेच त्यांनी शूरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
१ जानेवारी शौर्यदीनी भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी येत असतात ते अनुयायी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी राजे तसेच शुरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात.

शौर्यदिनी गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुलाची सजावट करुन अभिवादनचे नियोजन करण्यात येते. तसेच अनुयायांना पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, पार्किंगची सोय, आरोग्य सेवा आदी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती रामदास लोखंडे यांनी दिली.

गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधी उपेक्षित असून समाधी स्थळाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी समाजाची आहे. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ विकास आराखड्यात गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळाचा समावेश करण्याचे निर्देश विधानसभेच्या उपाध्यक्षांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. सामाजिक न्याय मंत्री  संजय शिरसाठ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी विकास आराखडा बार्टीने तयार करून शासनास सादर करावा, असे निर्देश दिले.

पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देऊन गायकवाड कुटुंबियांची विचारपूस केली. गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पांडुरंग गायकवाड, कोरेगाव भीमाचे सरपंच श्री संदिप ढेंरगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, राजाभाऊ गवदे, रामदास लोखंडे यांच्यासह वढु व कोरेगाव भीमा ग्रामस्थ तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वारगेट बसस्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; गुनाट येथून अटक
पुणे : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

आरोपी दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पण त्याला जेवायला मिळत नव्हतं. भूकेनं व्याकूळ झाल्यानंतर आरोपी पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला होता अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध घेतला.

रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना हालचाल दिसली आणि स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.

पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली.

रात्री एक वाजता, तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी दबक्या पावलांनी त्याच्या दिशेने वाट काढली. काही क्षणातच त्याला ताब्यात घेतलं. ७० तासांच्या शोध मोहिमेला पोलिसांना अखेर यश मिळालं आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बलात्कार करून घरी आलेल्या आरोपीनं दुपारपर्यंत घरी आराम केला आणि संध्याकाळी कीर्तनातही सहभाग घेतला.

रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला भूक लागली होती. तिथं दत्तात्रय गाडेनं जे काय केलं, त्याचा पश्चाताप झाल्याचं म्हटलं. याशिवाय गाडेनं प्रचंड भूक लागली असून काही तरी खायला द्या असं सांगितलं. नातेवाईकांनी काही खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. त्यानंतर गाडे त्या घरातून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी यासगळ्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची पूर्ण टीम अॅक्टिव्ह झाली, डॉग स्कॉड आलं, 13 टीम तैनात झाल्या. दत्तात्रय गाडे दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. उसात जाऊन पोलिसांनी गाडेला अटक केली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

दत्तात्रय गाडे तीन दिवस शिरूरमधील गुनाटमध्येच

मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे यानं स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी गेला होता अशी माहिती आहे. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली असल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आल्याची माहिती आहे.

दरम्यान, दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला जात होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याला सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल.

पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार
पुणे  : पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास व त्यासाठी आवश्यक अशा १२ नियमित पदांना व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या ४ पदांना, तसेच त्यासाठीच्या आर्थिक तरतूदीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सध्या पौड येथे ठिकाणी लिंक कोर्ट कार्यरत आहे. या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित प्रकरणांची संख्या व न्यायालय स्थापनेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता हा निकष लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने लिंक कोर्ट ऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे.

हे न्यायालय स्थापन झाल्यामुळे पौड येथील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने चालविणे सुलभ होईल. तसेच नागरिकांसाठी व पक्षकारांची मोठी सोय होऊन, या तालुक्यातील नागरिकांसाठी जलदगतीने न्यायदान प्रकिया राबविता येणार आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. तसेच या न्यायालयासाठी आवश्यक अशा १२ नियमित पदांना व बाह्य यंत्रणेद्वारे ४ मनुष्यबळांची सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली. यासाठीच्या वेतन व वेतनेत्तर खर्चासाठीच्या १ कोटी ६४ लाख ९ हजार ८५२ रुपयांच्या तरतुदीसही बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर
पुणे :  प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत. पुणे शहरातील शाळांनाही सुट्टी देण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहे.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बनावट आधार कार्ड बनवून केले दोघांशी लग्न ; तरुणीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे : तरुणीचे बनावट आधारकार्ड तयार करून तिचे दोन तरुणांशी लग्न लावून देत फसवणूक करण्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी (दि. ४) हा प्रकार घडला. राहुल दशरथ कणसे (३७, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, मूळ रा. भांडवली, ता. माण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ज्योती रवींद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंढे, भावेश रवींद्र पाटील, ज्योती पाटीलचे आई-वडील आणि त्यांची मुलगी निशा दत्ताराम लोखंडे (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम ३१८ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमत करून मुलगी निशा लाखंडे हिचे चैतन्य खांडे यांच्यासोबत लग्न लावून देऊन चैतन्य यांच्याकडून पैसे घेतले. तसेच निशा हिचे बनावट आधारकार्ड तयार करून त्याच्या आधारे फिर्यादी राहुल कणसे यांना तिचे नाव निशा दत्ताराम पाटील असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी राहुल यांचा भाऊ सुनील कणसे यांच्यासोबत निशा हिचे लग्न लावून दिले. त्यासाठी फिर्यादी राहुल यांच्याकडून एक लाख ५५ हजार रोख तर ९५ हजार भावेश रवींद्र पाटील याच्या खात्यावर स्वीकारले. यात संशयितांनी संगनमत करून तोतयेगिरी करून २ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.