पुणे शहर, जिल्हा – Sinhasan News

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद होती. या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ६२ लाख १३ हजार ६९२ इतके मतदार नोंदणी झाली आहे. यामध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष तर ३० लाख ६२ हजार १२ महिला व ३८३ तृतीयपंथी मतदार नोंदणी झाली आहे.

मतदान केंद्रांमध्ये ७ ने वाढ होऊन आता ८ हजार ४२४ मतदान केंद्र झाली आहेत. यामध्ये जुन्नर (३५६)आंबेगाव (३४४) खेड -आळंदी (३९३) शिरूर (४५९) दौंड (३१५) इंदापूर (३३९) बारामती (३८८) पुरंदर (४१३) भोर (५६७)मावळ (४०२)चिंचवड (५६०)पिंपरी (३९७)भोसरी (४९१)वडगाव शेरी (४३८)शिवाजीनगर (२६६ )कोथरूड (३८७) खडकवासला (५०२ )पर्वती (३४४ )हडपसर (५२५ )पुणे कॅन्टोन्मेंट (२७०) कसबा पेठ (२६८ ) असे एकूण ८ हजार ४२४ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

एएसडीडी यादीनुसार २८ लाख ६६ हजार ४८१ गणना अर्ज अनकलेक्टटेबल मतदार आहेत. त्यातील एक लाख ४३ हजार ९७५ दुबार, ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित व ३६ हजार ३६२ इतर मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादीतील ६२ लाख ११ हजार ९५० मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार ८२१ विसंगती तर ७ लाख ५४ हजार ५९७ मॅपिंग न झालेले अशा एकूण १३ लाख ३२ हजार ४१८ सुनावण्या होतील.

या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन नव्याने मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.

प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास तसेच २००२ च्या मतदार यादीशी ज्यांचे मॅपिंग झालेले नाही (No Linkage), अशा मतदारांसाठी संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येतील. दावे व हरकतींवर दि. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यवाही करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे.

याशिवाय, प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती
जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.

पुण्यात ‘छात्रों की गुंज’ मध्ये राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद ; महिला सुरक्षेवर धक्कादायक आकडेवारी केली सादर
‘छात्रों की गुंज’ ठरला तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे उपस्थितांमध्ये जेन झी पिढीतील तरुणींची संख्या लक्षणीय होती. या वेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेतल्या.

कार्यक्रमाचे स्वरूप पारंपरिक राजकीय सभेपेक्षा संवादात्मक ठेवण्यात आले होते. अनेक विद्यार्थिनींनी मंचावर येत आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. काहींनी घरातून होणारी अडवणूक, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष, तर काहींनी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या छेडछाडीचे अनुभव सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी मुली आणि महिलांना पुढे जाण्यासाठी समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच देशातील महिलांची सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी महिला हिंसाचाराशी संबंधित विविध आकडेवारी विद्यार्थिनींसमोर मांडली.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान पीपीटीच्या माध्यमातून भारतातील महिला हिंसाचाराचे चित्र विद्यार्थिनींसमोर मांडले. देशात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडतात; मात्र त्यातील मोठ्या प्रमाणावर प्रकरणांची नोंदच होत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

देशात मुलगी जन्माला येण्यापूर्वीच दरवर्षी सुमारे साडेचार लाख मुलींची अर्भकहत्या केली जाते, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुमारे ८० टक्के मुलींना कधी ना कधी विनयभंगाचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय, बस, रस्ता आणि रेस्टॉरंट अशा विविध ठिकाणी मुलींना या प्रकारच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, सुमारे २९ टक्के महिलांना शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर भारतात १०० पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली. घरापासून रस्त्यापर्यंत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत त्यांनी महिला आणि तरुणींना सुरक्षित, समान आणि स्वतंत्र वातावरण मिळण्याची गरज अधोरेखित केली.

विद्यार्थिनींच्या प्रश्नांना थेट सामोरे जात राहुल गांधी यांनी त्यांच्या अनुभवांवर संवाद साधला. त्यामुळे ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम ठरला.

मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन..
कोथरूडमध्ये मुळशी बचाव समन्वय समितीची बैठक; ‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला विरोध

पुणे : मुळशी तालुक्याची ओळख, प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मुळशीकरांनी एकजुटीने पुढे येण्याचा निर्धार केला आहे. मुळशीची चुकीच्या संदर्भात होणारी बदनामी थांबवण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचे आवाहन कोथरूड येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले.

मुळशी बचाव समन्वय समितीची बैठक कर्वे रस्त्यावरील अंबर हॉलमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी कोथरूडसह पुणे शहरातील विविध भागांत वास्तव्यास असलेले मुळशीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ‘मुळशी पॅटर्न २’ या चित्रपटाच्या नावाला ठाम विरोध करण्यात आला.

महाराष्ट्रात कुठेही गुन्हेगारी किंवा अनुचित घटना घडली की त्याची तुलना ‘मुळशी पॅटर्न’शी केली जाते. त्यामुळे मुळशी तालुक्याची आणि येथील कष्टकरी, गुणवंत व कर्तृत्ववान नागरिकांची चुकीची प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यापुढे मुळशीचे नाव चुकीच्या संदर्भात वापरले जाऊ नये, यासाठी बैठकीत जाहीर ठराव मंजूर करण्यात आला.

मुळशी हा केवळ एका चित्रपटाच्या नावापुरता किंवा एखाद्या नकारात्मक संदर्भापुरता मर्यादित नसून त्याला समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, शेतकरी, महाराष्ट्र केसरी पैलवान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर, वकील, अभियंते आणि गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या या तालुक्याला उद्योजक, व्यावसायिक आणि माजी सैनिकांचीही गौरवशाली परंपरा लाभली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी, गडकिल्ल्यांनी आणि लाल मातीने नटलेल्या मुळशीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार-सैनिकांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सेनापती बापट यांचा सत्याग्रह आणि मामासाहेब मोहोळ यांची कुस्तीची परंपराही मुळशीच्या इतिहासातील महत्त्वाचा ठेवा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या लोकचळवळीला पुणे शहरातील विविध गणपती मंडळे, देवी मंडळे आणि सेवा सोसायट्यांनी लेखी पाठिंबा दर्शविला आहे. उपस्थित नागरिकांनीही जाहीर संमतीपत्र देत या उपक्रमाला समर्थन दिले.

बैठकीला मुळशीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी, टाळकरी, उद्योजक तसेच तरुण पिढीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळशीची खरी ओळख आणि गौरवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तालुक्याची बदनामी रोखण्यासाठी सर्व मुळशीकरांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

“मुळशीकर म्हणून एकजुटीने पुढे या, मुळशीची बदनामी थांबवा आणि मुळशीची खरी ओळख महाराष्ट्रासमोर आणा,” असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त दुचाकी रॅली द्वारे अभिवादन !
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजन

पुणे : अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर ते शनिवार वाडा अशी भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आले.

शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि जयघोषांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग उत्साहाने भारून गेला होता. मराठा साम्राज्याचा दरारा दूरवर निर्माण करणाऱ्या आणि आपल्या युद्धकौशल्याने इतिहासात अजरामर ठरलेल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी पेशवे वंशज पुष्कर पेशवा, आमदार हेमंत रासने, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, सिने कलाकार ज्ञानेश वाडेकर, सुनील गोडबोले, नगरसेवक श कुणाल टिळक, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवर, आयोजक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे रॅली चे सलग पाचवे वर्ष आहे व प्रत्येक वेळी पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पेशवे प्रेमी यात सहभागी होत असतात.

या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, प्रसाद गिजरे (अध्यक्ष उद्योजकता विकास आघाडी), कमलेश जोशी, अभिनव पाठक,राहुल जोशी, वेदिका सदावर्ते (उपाध्यक्ष महिला आघाडी), अक्षय जोशी, अनिरुद्ध पळशीकर, अश्विनी कौसडीकर (अध्यक्ष social media), देवश्री बोधनी, सुरेश कुलकर्णी, यामिनी मठकरी, सुहास पानसरे, हेमंत कासखेडीकर व अनेक पदाधिकारी आवर्जून सहभागी झाले व यशस्वी करून दाखवला.

प्रमोद निम्हण, प्रल्हाद गवळी आणि डॉ. वैष्णवी किरड यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे : पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते तिघांचाही पक्षप्रवेश झाला.

कोणत्याही निवडणुका नसताना झालेले हे पक्ष प्रवेश भाजपच्या पुढील राजकीय खेळीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी भाजपाने टाकलेला हा  डाव येणाऱ्या काही काळात काय रंग दाखवतोय हे पाहावे लागणार आहे.

या पक्ष प्रवेशावेळी आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जातो. स्वतःचे हित बाजूला ठेवून राष्ट्र प्रथमला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.”

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा आनंद असून, त्यांचा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.”

प्रल्हाद गवळी हे मनसेच्या पुणे शहरातील पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रमोद निम्हण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. तर डॉ. वैष्णवी किरड यादेखील शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत्या. या तिघांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित : अर्चना गायकवाड
पुणे : प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रामधील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले असून हे भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहतील, रुग्णवाहिकांकरिता निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालक, मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

सुधारित दरपत्रकानुसार अवातानुकुलीत मारुती व्हॅन साठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 700 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 16 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत मारुती ईको, टाटा मॅजिक यासाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 900 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 17 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार 500 रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 200 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत महिंद्रा बोलेरो, फोर्स क्रुझरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 200 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 18 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 150 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 5 हजार  रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 500 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 22 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 175 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 7 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 2 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

वातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी (आयसीयु) 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 2 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 30 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 250 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 10 हजार  रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 4 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करणाऱ्या वाहनमालक, चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून पहिल्या गुन्ह्याकरिता 5 हजार रुपये दुसऱ्या गुन्ह्याकरिता 10 हजार रुपये व तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्याकरिता 20 हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी कळविले आहे.

गणेशोत्सवापूर्वी भोर-वरंधा, ताम्हिणी घाट मार्ग तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरू करा!
कोकण कृती समितीचे आमदार शंकर मांडेकर यांना निवेदन; बंद एसटी बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी.

पुणे : गणेशोत्सवासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांची तातडीने दुरुस्ती करून गणेशोत्सवापूर्वी हे मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, तसेच सध्या बंद असलेल्या एसटी बससेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण कृती समिती, पुणे यांच्या वतीने करण्यात आली.

याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकर मांडेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोकणातील रस्त्यांची सद्यस्थिती, चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि गणेशोत्सवाच्या काळातील संभाव्य वाहतूक कोंडी याबाबत आमदार मांडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव व गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणातील हा पारंपरिक आणि मोठ्या उत्साहाचा सण असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या काळात कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते.

सध्या ताम्हिणी मार्ग बंद असून भोर-वरंधा घाट मार्गाचीही पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग लांब पल्ल्याचे, वेळखाऊ आणि खर्चिक आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी व भोर-वरंधा घाट मार्गांची पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली.

तसेच गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर २४ तास कर्मचारी, जेसीबी आणि आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली. दरड कोसळणे, रस्ता खचणे किंवा अन्य कारणांमुळे वाहतूक बंद झाल्यास तातडीने मार्ग मोकळा करता यावा, यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा सज्ज ठेवावी, असे समितीने स्पष्ट केले.

मढेघाट-महाड मार्गही खुला करण्याची मागणी
वेल्हे मार्गे मढेघाट ते महाड या रस्त्याचे काम जवळपास ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मार्ग पर्यायी रस्ता म्हणून खुला करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

बंद एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
रस्त्यांसोबतच कोकणासाठी सध्या बंद असलेल्या एसटी बससेवाही गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी समितीने केली. पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणातील विविध भागात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा बससेवा उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होईल, असे समितीने सांगितले.

आमदार शंकर मांडेकरांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
कोकण कृती समितीच्या निवेदनाची आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यांची आवश्यक कार्यवाही करून मार्ग सुरू करण्याबाबत तातडीने आदेश दिले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी एसटी बसचे आगाऊ आरक्षण सुरू करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कोकणासाठी एसटी बससेवेचे आगाऊ आरक्षण सुरू करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी केल्या.

यावेळी बाबा धुमाळ, तुकाराम जाधव, सचिन दिघे, मुकेश पोटे, प्रकाश यादव, अभिजित महाडिक, रामभाऊ बडंबे, सुनील मोरे, दशरथ माटवणकर, संभाजी गोगावले, राहुल शेलार, परेश अंगणे आदी उपस्थित होते.

बार्टीची संविधान दिंडी; आळंदी ते पंढरपूर पर्यत समतादुतांनी केला वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा जागर
पंढरपुरात बार्टीच्या संविधान दिंडीचा करण्यात आला समारोप

पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीमध्ये संविधान दिंडी सहभागी झाली होती. या दिंडीचा समारोप नुकताच पंढरपुरात करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ -मुंडे, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी संविधान दिंडी च्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर पर्यत दि ८ जुलै ते २४ जुलै २०२६ दरम्यान समतादुतांनी वारकरी बांधवांमध्ये संविधानाचा प्रसार करुन जनजागृती केली. संविधान दिंडी पंढरपूर येथे दाखल झाल्यानंतर वारकरी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने संविधान दिंडीचे स्वागत केले.

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय मिळवून दिला. तसेच मूलभूत अधिकार बहाल केले. त्यामुळेच आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संविधानीक मुल्ये व राज्यघटनेची वारकरी बांधवांना ओळख होऊन त्यांच्यामध्ये महापुरुषांच्या व संतांच्या समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि बार्टी संस्थेच्या विविध योजनांचा प्रसार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहिर प्रबोधनकार राजेंद्र कांबळे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संविधानाचा तसेच संतांच्या व महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर करुन प्रबोधन केले.
याप्रसंगी सामुदायिकपणे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

या प्रबोधन कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक एस. ए. देवकुळे, सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य जितेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक सुनील सर्वगोड, रिपाइंचे अध्यक्ष संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी शेवडे, अॕड. किर्तीपाल सर्वगोड, वारकरी रावसाहेब कोमवाड (नांदेड), मिरा भवर (पुणे), बार्टीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक रंजनी वाघमारे, प्रकल्प अधिकारी उषा भिगारे, रामदास लोखंडे, राहुल कवडे, सोलापूरच्या समतादुत प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, सोलापूर जिल्ह्यातील समतादूत यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना संविधान, प्रस्ताविका, जातीव्यवस्थेचे निर्मुलन, आणि सन्मानचिन्ह भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी बार्टीच्या संविधान दिंडीच्या उपक्रमाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
समतादुतांनी वारकरी बांधव व नागरिकांना विविध कार्यक्रमांदवारे संविधानाची ओळख करून दिली तसेच सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार केला.

सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार राजर्षी कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व समतादुतांनी मेहनत घेतली.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांसाठी मदत कक्ष सुरू; संपर्कासाठी १९५० हेल्पलाईन
पुणे : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळावे यासाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे पुणे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून संबंधित संपर्क अधिकारी व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे:
विधान सभा मतदार संघ १९५ जुन्नर – श्रीमती वंदना भांगरे – ९४०३६६८२२८, १९६ आंबेगाव – श्रीमती अंजली सालार – ८६६८४९७७९१, १९७ खेड-आळंदी – श्री. अजय उमंदे – ९६८९९३४३३७, १९८ शिरूर – सौरभ नावरकर – ९९२२९७९७८३, १९९ दौंड – नीलेश गाडगे – ८२०००८८९६०, २०० इंदापूर – सचिन सैबी – ९६८९८९५१३०, २०१ बारामती – अशोक सिरसाट – ९६८९९३६०५७, २०२ पुरंदर – राजेश यादव – ९८२३७२८८४८, २०३ भोर – दिलीप छत्री – ९८२२०१४४६०, वेल्हा – ललित कोरोसिया – ९९२१७६९९९७, मुळशी – मनिष खंडागळे – ९०२८७५१९९०, २०४ मावळ – सागर दिलीप शिंदे – ९०२८८२४५५६.

मदत कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
२०५ चिंचवड – राहुल शेडगे – ९९२२५०१९७७, २०६ पिंपरी – अतुल किर्वे – ९८६०३१०८६६, २०७ भोसरी – पंकज पवार – ९८२२२३५४८०.

मदत कक्ष, पुणे महानगरपालिका:
२०८ वडगाव शेरी – राहुल ताथवडे – ९६८९९१४१८८, २०९ शिवाजीनगर – राहुल भोईर – ९७६२७७२९३३, २१० कोथरूड – सागर पासलकर – ९८२२६१४१६०, २११ खडकवासला – मनोहर जगताप – ९८५०६३१०७१, २१२ पर्वती – अनिल चौधरी – ९९२२५०७०४१, २१३ हडपसर – तुषार राजेंद्र कांबळे – ९८९०५०९१५२, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट – अमीर मुलाणी – ९६०४७०९९५४, २१५ कसबा पेठ – श्रीमती स्मिता सुश्रुत जोशी – ९८६०५७३०८५ यांचा समावेश असलेला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राखीव मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये दिलीप आंब्रे – ८६९८८४८३२४ यांचा समावेश आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ संदर्भात मतदारांनी अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मदत कक्षाशी अथवा १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुण्यातील रंगावली कलाकार शनेश्वर खराडे यांचे रांगोळीतून अजितदादांना अभिवादन!!!
बारामती येथे “आठवणीतले दादा” रांगोळी प्रदर्शनात त्यांनी साकारली दादांची एक अविस्मरणीय कलाकृती

बारामती (पुणे) : प्रत्येक रंगात एक भावना आहे, प्रत्येक रेषेत एक आठवण आहे, आणि प्रत्येक स्पर्शात मनापासून व्यक्त केलेला आदर आहे.

अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी शनेश्वर खराडे यांनी एक कलाकृती साकारली. रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी दादांना जयंती दिनी अभिवादन केले.
रांगोळी ही केवळ कला नसते, तर ती कलाकाराच्या मनातल्या भावना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करणारी एक सुंदर भाषा असते. या कलाकृतीतून “दादा” यांच्याविषयीचा सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे.

ही रांगोळी साकारताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत दिसलेलं कौतुक आणि चेहऱ्यावरचं समाधान हेच आमच्या कलेचं खरं यश आहे, असं मत त्यांनी मांडले.

काही भावना शब्दांत व्यक्त होत नाहीत… त्या फक्त मनापासून अनुभवाव्या लागतात… म्हणून… निशब्द! असंही ते म्हणाले.