राष्ट्रीय – Sinhasan News

धर्मेंद्र प्रधानांनी अखेर मौन सोडलं ; NEET पेपरफुटी आंदोलनाचा दबाव अन् राजीनामा..काय म्हणाले..
धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारण पेटणार ?

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राजीनाम्यानंतर प्रथमच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निर्णयावर भाष्य केले आहे.

भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी युवा पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. “देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मी राजीनामा दिला. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही,” असे प्रधान यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, या युवा पिढीच्या स्वतःच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणताही प्रश्न गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारवरही त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले; मात्र, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत माघार घेणार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची ओळख होती. ओडिशातील प्रभावी ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ते केंद्रातील सत्ताकारणातील महत्त्वाच्या भूमिकेत होते.

राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच केलेल्या या वक्तव्यामुळे NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

दिल्लीत मोठा गोंधळ! पोलिसांनी उपोषणस्थळावरून सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवले..
अभिजीत दिपके यांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

उपोषणस्थळी पोलिसांनी पोहोचताच आंदोलकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांनी वांगचूक यांना तातडीने रुग्णालयात हलवले आणि परिसरातील आंदोलकांनाही हटवण्याची कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वांगचूक यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी स्वतःला मारहाण करून ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. उपोषणाच्या सुरुवातीपासूनच दीपके हे वांगचूक यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषण करत होते. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांचे सुमारे 20 किलो वजन घटल्याचे सांगितले जात असून त्याचा त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून ते शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, वांगचूक यांनी शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये 20 जुलै रोजी “चलो संसद” आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

या आंदोलनाला देशभरातील विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि सरकारी डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे वांगचूक यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करण्यात येत होती. त्यांची तब्येत अधिक खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी नामांकनांना सुरुवात ; अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै
या विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या बालकांना दिला जातो पुरस्कार

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://awards.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे.

भारतात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आणि 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता दिली जाणार आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, पुरस्काराचा प्रवर्ग, अलीकडील छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या उल्लेखनीय कामगिरीची आणि तिच्या समाजावरील प्रभावाची माहिती 1,000 शब्दांपर्यंत सादर करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच कला व संस्कृती या सहा क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्यात येतो. शौर्य प्रवर्गात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी धैर्य दाखवणाऱ्या मुलांचा सन्मान केला जातो. क्रीडा प्रवर्गात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते.

समाजसेवा प्रवर्गात समाजकल्याण, पर्यावरण संवर्धन, गरजूंना मदत आणि राष्ट्रीय कार्यांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या मुलांचा सन्मान केला जातो. विज्ञान व तंत्रज्ञान प्रवर्गात संशोधन, नवोपक्रम किंवा वैज्ञानिक नमुने विकसित करणाऱ्या मुलांना पुरस्कार दिला जातो. पर्यावरण प्रवर्गात शाश्वत विकास, जनजागृती मोहीम किंवा पर्यावरणपूरक नवकल्पनांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या मुलांची निवड केली जाते. तर कला व संस्कृती प्रवर्गात संगीत, नृत्य, लेखन, चित्रकला, अभिनय किंवा इतर कलाक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा गौरव केला जातो.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने शाळा, शैक्षणिक संस्था, पालक, मार्गदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी देशातील प्रतिभावान आणि प्रेरणादायी बालकांचा शोध घेऊन त्यांच्या नावांची शिफारस करावी. देशातील प्रत्येक गुणी आणि कर्तृत्ववान बालकाला राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.

इंधन टंचाई : भारतातील ‘या’ शहरात नागरिकांसाठी मोफत बससेवा
इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळावा आणि वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढून इंधनाची बचत व्हावी यासाठी भारतातील एका शहरात मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. दमण प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर मोफत सार्वजनिक परिवहन बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रवाशांसोबत अन्य राज्यातून व परदेशातील पर्यटकांनाही याचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दमण शहरातील विविध भागात यामुळे नागरिकांना मोफत जाता येणार आहे. दमण शहरात होणारी वाहतूक यामुळे कमी होईल. प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होईल. परिवहन अधिकारी कवलजीत सिंह, दमण नगरपालिकेच्या अध्यक्षा दीपिका बेन टंडेल, काउंसलर अस्पी दमनिया, फिरदौस बेन आदी या बससेवेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. या नवीन मोफत बससेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं असून वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर  यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं.

तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत.

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

पुण्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धरणे आंदोलन
पुणे : बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) येथे पुणे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले.

या आंदोलनात भन्ते डॉ. नागघोष महाथेरो, भन्ते  बुद्धघोष महाथेरो, भन्ते शाक्यपुत्र, भन्ते राजरत्न, शक्यपुत्र राहुल,धम्मरखीत, भन्ते पय्यारक्खीत,भन्ते धम्मानंद, भन्ते आनंद, भन्ते सचित बोधी, भन्ते मिलिंद, भन्ते प्रियदर्शी, भन्ते संघपाल, भन्ते यश, यांच्यासह भिक्खू संघाचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड, राहुल डंबाळे, नगरसेवक नंदिनी धेंडे , नगरसेवक निलेश आल्हाट, बाळासाहेब जानराव , वसंतराव साळवे, शैलेश चव्हाण, भगवानराव वैराट, महेंद्र कांबळे, रोहिदास गायकवाड, निलेश गायकवाड यांच्यासह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

या आंदोलनात भिक्खू संघासह बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, त्या गया येथील महाबोधी महाविहाराची उभारणी प्राचीन काळात सम्राट अशोक यांनी केली होती. बौद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र असलेल्या या स्थळाचा हजारो वर्षांचा वारसा असूनही, सध्या त्याचे व्यवस्थापन बौद्धेतर व्यक्तींच्या ताब्यात असल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

महाबोधी महाविहार हा जागतिक बौद्ध वारशाचा केंद्रबिंदू असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या देखरेखीखाली असावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. तसेच देशभरातील बौद्ध समाज या मागणीसाठी संघटित होत राष्ट्रव्यापी स्तरावर आंदोलन करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पुढील काळातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे- प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदेत मागणी
महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी देऊ नये

पुणे : देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत शून्यकाल उल्लेखाद्वारे केली. बेफिकीर वाहनचालक, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच सोशल मीडियासाठी रस्ते व महामार्गांवर रील किंवा फोटोशूट करण्याची वाढती प्रवृत्ती ही अपघातांची नवी व चिंताजनक कारणे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशात सुमारे १.७८ लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज शेकडो कुटुंबांवर ही दुर्घटना ओढवते. विशेषतः १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे प्रमाण सुमारे ६० टक्के असल्याने ही बाब अधिक चिंताजनक आहे.  महाराष्ट्रातही आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये ३६ हजार ८४ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यात १५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातही परिस्थिती चिंताजनक असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला, तर १,३२० जण जखमी झाले. २०२३ मध्ये ही संख्या १,२३० होती.”

सोशल मीडियासाठी रस्ते व महामार्गांवर रील किंवा फोटोशूट करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे व बेफिकीर वाहनचालकांवर कठोर शिक्षेची तरतूद असली, तरी अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणे व धोकादायक वाहनचालना यावर किमान कठोर शिक्षा निश्चित करणे, रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वेग शोध प्रणाली, ब्रेथ अॅनालायझर व सीसीटीव्ही यांचा व्यापक वापर करणे, तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गासारख्या उच्च वेगाच्या मार्गांवर अपघातप्रवण ठिकाणांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण करणे, अशा उपाययोजनांची मागणी त्यांनी केली.

तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा व जबाबदार वाहनचालनाबाबत जनजागृती मोहीम राबविणे आणि अपघातग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी कुलकर्णी यांनी यावेळी केली.

सहकारी संस्थांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी एनसीईएलची स्थापना सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती
१६ हजारांपेक्षा सहकारी संस्था ‘एनसीईएल’च्या झाल्या सदस्य

नवी दिल्ली : देशातील सहकारी संस्थांमार्फत कृषी, दुग्ध, मत्स्य व सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने २०२३ मध्ये राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (एनसीईएल)ची स्थापना करण्यात आली आहे. देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १६ हजारांपेक्षा सहकारी संस्था ‘एनसीईएल’च्या सदस्य झाल्या आहेत.एनसीईएलमार्फत विविध राज्यातील खास पदार्थांची निर्यातही सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ‘एनसीईएल’ही बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन झाली. गुणवत्तापूर्ण बियाण्यांसाठी भारतीय बियाणे सहकारी समिती मर्यादित (बीबीएसएसएल), सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय सहकारी ऑरगॅनिक्स मर्यादित (एनसीओएल) आणि निर्यातीसाठी एनसीईएल अशा तीन बहुराज्यीय सहकारी संस्थांमार्फत १४ प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी काम सुरू आहे. देशातील ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे १३,९०० सहकारी संस्था एनसीईएलच्या सदस्य झाल्या आहेत, असे मोहोळ म्हणाले.                                                                                                                                बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत आवश्यक सर्व सेवा सहकारी संस्थांद्वारे उपलब्ध करून देत एनसीईएल राज्य सरकारे व त्यांच्या नोडल एजन्सींशी समन्वय साधून निर्यात वाढवण्याचे काम करत आहे. आतापर्यंत १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी १७ सामंजस्य करार झाले असून गुजरात व राजस्थानमधून मसाल्यांची निर्यात सुरू झाली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

एनसीईएलचे अधिकृत भागभांडवल २,००० कोटी रुपये असून सदस्यत्व सहा वर्गांत विभागले आहे. प्राथमिक, जिल्हा व राज्यस्तरीय तसेच बहुराज्यीय सहकारी संस्था आणि शेतकरी गट एनसीईएलचे सदस्य होऊ शकतात. निर्यातक्षम उत्पादन असलेल्या सर्व कार्यशील सहकारी संस्थांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येत आहे, असे मोहोळ यांनी विशेषत्वाने नमूद केले.

देशात दोन लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्था,सहकार क्षेत्राला ११ वर्षांत ४ लाख २१ हजार कोटी-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्य सभेत माहिती
सहकारी सोसायट्यांच्याा संगणकीकरणासह गोदामांच्या उभारणीलाही गती

नवी दिल्ली : देशातील सहकाराचे जाळे अधिक मजबूत व्हावे, सहकार क्षेत्राचा समप्रमाणात विकास व्हावा, यासाठी सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२९ पर्यंत देशात नव्या दोन लाख बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी संस्थांची (एम पॅक्स) स्थापना करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ३२ हजार एम-पॅक्सची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर देशातील प्रत्येक पंचायतीत किमान एक सहकारी सेवा संस्था असेल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केले. ६० वर्षांहून अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने सहकारावर फक्त राजकारण केले. मोदी सरकारने सहकाराला खऱ्या अर्थाने गती आणि बळकटी दिली, असेही मोहोळ म्हणाले.

काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सहकारिता क्षेत्राचा समतोल विकास झाला नाही. पश्चिमेकडील काही राज्यांत सहकार चळवळीचा विस्तार झाला; मात्र पूर्वेकडील राज्ये यात मागे राहिली. देशात सुमारे आठ लाख सहकारी संस्था आणि जवळपास ३० कोटी सभासद कार्यरत असतानाही, काँग्रेसच्या काळात सहकारिता क्षेत्राचा कारभार कृषी मंत्रालयांतर्गत केवळ संयुक्त सचिव स्तरावरच पाहिला जात होता. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर अवघ्या तीनच वर्षात मा. अमितभाई शहा यांनी आमूलाग्र बदल घडवत ११४ हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सहकार क्षेत्राला बळकटी दिली. यासंदर्भात केलेले आदर्श उपविधींना (मॉडेल बाय लॉज) केरळ वगळता देशातील ३२ राज्यांनी मान्यता दिली आहे, याकडे मोहोळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

देशात संगणक आणण्याचे श्रेय काँग्रेस घेते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात ‘पॅक्स’चे संगणकीकरण करून त्यांची कार्यक्षमता विस्तारण्याचा विचार कधीच झाला नाही. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने देशातील ७९ हजार ‘पॅक्स’चे संगणकीकरण सुरू केले असून त्यासाठी २९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पूर्वी ‘पॅक्स’द्वारे केवळ अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि कृषी संबंधित पुरवठा एवढेच काम केले जात होते.आमच्या सरकारने आदर्श उपविधी (मॉडेल बाय लॉज) तयार करून पॅक्सना बहुद्देशीय स्वरूप दिले असून त्यामुळे सहकारी सेवा संस्थांना विविध प्रकारचे २५ व्यवसाय करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. मोदी सरकारने पॅक्सच्या संगणकीकरणाला प्राधान्य दिल्यानेच हे शक्य झाले आहे. संगणकीकरणामुळे पॅक्सच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होत आहे. परिणामी, ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना विविध सेवा अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होत आहेत, ज्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत असून ग्रामीण अर्थव्यवस्था गतीने विकसित होत आहे.

१९६३ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत २०१४ पर्यंत म्हणजे ५० वर्षात प्रामुख्याने काँग्रेसच्या सत्ताकाळात देशभरातील सहकारी संस्थांना केवळ ४५ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली. परंतु, मा. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच्या ११ वर्षात सरकारने ही मदत मागील ५० वर्षांच्या तुलनेत दहा पट वाढवून चार लाख २१ हजार कोटी रुपयांपर्यंत नेली आहे. त्यावरून आमचे सरकार सहकाराला किती प्राधान्य देते, हे आपोआपच स्पष्ट होते, असे मोहोळ यांनी नमूद केले.

धान्य साठवण योजनेला गती…

देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांच्या जोरावर भारत आज जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, देशातील एकूण धान्य उत्पादनाच्या तुलनेत साठवणूक (स्टोरेज) क्षमतेत सुमारे १६६ दशलक्ष मेट्रिक टनांची कमतरता आहे. या अपुऱ्या साठवणूक क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर धान्याची नासाडी होते. तसेच, धान्य साठवण व वाहतुकीसाठी लागणाऱ्या अंतरात वाढ झाल्याने वाहतूक खर्चही वाढतो.  या पार्श्वभूमीवर, देशातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कृषी उत्पादन व्यवस्थेचा कणा अधिक मजबूत करण्यासाठी धान्य साठवणुकीसाठी जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेवर आमच्या मंत्रालयाने काम सुरू केले आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर धान्याची नासाडी कमी होईल, वाहतूक खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

११ राज्यात ११ गोदामांची उभारणी पूर्ण…

सरकार शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने शेतकऱ्यांना धान्य साठवणीसाठी दूरवरच्या गोदामांकडे जावे लागू नये; उलट शेतांजवळच गोदामे उभारली जावीत. याच उद्देशाने देशभरात पॅक्सच्या माध्यमातून विकेंद्रित पद्धतीने, स्थानिक पुरवठा व मागणी लक्षात घेऊन गोदामांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या पायलट प्रकल्पामध्ये आतापर्यंत ११ राज्यांतील ११ गोदामांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. पायलट प्रकल्पाचा विस्तार करत आता आमच्या मंत्रालयाने ७०४ पॅक्सची निवड केली असून, यामुळे सुमारे ६० हजार मेट्रिक टन साठवण क्षमतेची निर्मिती होणार आहे. ही गोदामे भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत, यासाठी नाफेड, एफसीआय, एनसीसीएफ आदीसंस्थांशी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे पॅक्सना धान्य साठवणुकीसाठी खात्रीलायक सुविधा (ॲश्युअर्ड स्टोअरेज) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना निश्चित उत्पन्नाचा स्त्रोतही उपलब्ध होईल.

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ…भाजपा पक्ष संघटनेकडून मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी
पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता

पुणे/दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.

पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे.

‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.