
कोथरुड : शिवजयंतीनिमित्त कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका भोवती आकर्षक फुलांची सजावट करत श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने पारंपारिक पद्धतीने शिवछत्रपतींचा पाळणा आणि महाआरती करत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
आकर्षक सजावट करण्याची परंपरा याही वर्षी श्रीमान योगी प्रतिष्ठानने कायम ठेवली. ही सजावट पाहण्यासाठी कोथरूडवासियांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या संकल्पनेतून ही सजावट करण्यात आली होती.

गेली १४ वर्षे श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन शिवचरणांची सेवा करण्याचे व्रत अविरतपणे दुष्यंत मोहोळ यांनी जोपासले आहे. यंदाही पारंपारिक व महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशीच शिवजयंती साजरी श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन साजरी करण्यात आली.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व पुणे शहराचे माजी महापौर आणि लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.





