युवा दिनानिमित्त युवकांचा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सन्मान.

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे शहर सरचिटणीस गिरीश गुरूनानी यांच्या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद जयंती व त्या निमित्त साजरा केला जाणारा राष्ट्रीय युवा दीन याचे अवचित्या साधून आज कोथरूड क्षेत्रातील होतकरू युवकांचा सन्मान करण्यात आला. याच अनुषंगाने कोरोना काळात लक्ष्यवेधी कामगिरी व अतोनात कष्ट करून समाजाची सेवा केलेले तरुण तरुणी डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी व पत्रकारांना भेटून राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी सन्मान चिन्ह व शाल नारळ, पुष्गुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड चे राष्ट्रवादी चे युवा नेतृत्व गिरीश गुरूनानी यांनी केले होते. युवा शक्ती चा सन्मान करून त्यांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आल्याचे यावेळी गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोरोना ला लढा देण्यात युवकांचा लक्षणीय वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. अश्या कर्तव्यनिष्ठ युवकांच्या हातात आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित व उज्वल असेल अशी भवना त्यांनी व्यक्त केली.

या सन्मानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप , वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रभारी सनी मानकर, पुणे शहर युवकचे अध्यक्ष महेश हांडे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस धनंजय पायगुडे, धनंजय भाऊ शेळके, पुणे शहर विद्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव, कार्याध्यक्ष शुभम माताळे, सरचिटणीस ऋषिकेश कडू, राष्ट्रवादी चित्रपट विभाग कोथरूड अध्यक्ष संकेत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभेचे उपाध्यक्ष अमोल गायकवाड, रवी गाडे, सौरभ ससाणे इत्यादी उपस्थित होते.



कोथरूड येथील सुतार दवाखान्यातील कोरोना चाचणी केंद्रात आणि लसीकरण मोहीम मध्ये कार्यरत असलेल्या स्वाती देविदास घर्डीनकर,अपर्णा राजेंद्र पायगुडे यांचा युवा सन्मानाने गौरव करण्यात आला. तसेच पत्रकार विनायक बेदरकर, समाधान काटे,विशाल सातपुते व कोथरूड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे युवा पोलीस कर्मी किसन शंकर राठोड,अजय विठ्ठल सावंत,गणेश रोहिदास बाठे,मनोहर वाल्मीक गिऱ्हे,नवनाथ धोंडीबा आटोळे,अशोक राजेंद्र अंधारे,सागर लक्ष्मण सुतार,युवराज अविनाश काळे यांना ही या युवा सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.या सर्व युवांच्या कर्तृत्वाचे गौरव करून त्यांचे कोथरूड वासीयांच्या वतीने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.






