कोथरूडमध्ये १४ एप्रिलला होणार सामुहिक बुद्ध वंदना..२२ एप्रिलला विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
कोथरूड : कोथरूड भीम महोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या Dr.Babasaheb Ambedkar Jayanti निमित्ताने १४ एप्रिल व २२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांनी दिली. कोथरूड मधील सर्व समाज बांधव एकत्र येत कोथरूड भीम महोत्सव साजरा करत असून एक आदर्शवत जयंती साजरी केली जाणार आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समरक चौकात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्वंदना घेतली जाणार आहे. ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडणार आहे.

२२ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे. तसेच महामानव पुरस्कार प्रदान सोहळा हि पार पडणार आहे. कवी किशोर कदम यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोथरूड भीम महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कोणाकडूनही वर्गणी जमा न करता समाजबांधवांनी केलेल्या धम्मदानातून हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.



कोथरूड मधील समाज बांधवांनी एकत्र येत कोथरूड भीम महोत्सव समिती 2024 ची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विजय डाकले यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, दीपक कांबळे, सहकार्याध्यक्ष जितेश दामोदरे, सतीश रणावरे, उमेश कांबळे, खजिनदार अमोल जगताप, सहखजिनदार विजय मोघे, अशोक करंजकर, उत्सव प्रमुख दत्ता वडवेराव, बळीराम खळगे, राहुल वाघमारे, राजाभाऊ गायकवाड, सतीश खडके, सेक्रेटरी वसंतराव ओव्हाळ, दत्ता शेंडगे, सारंग गायकवाड, केशव पवळे, सह सेक्रेटरी प्रदीप मदाळकर, पुंडलिक दुपारगुडे, अण्णा लोखंडे, संतोष मस्के, सुरेंद्र शिंदे, सोमनाथ गोरके, संघटक भारत भोसले, कैलास कदम, दयावान बचुटे, समाधान कीरतकर्वे, सल्लागार ॲड. मंगेश कदम, ॲड. आनंद कांबळे, वसंत वाघमारे, नितीन कांबळे, तात्या कसबे, नागेश गायकवाड यांची निवड करून एक एकजुटीचे दर्शन घडवले आहे. सर्वांनी एकत्र एक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेले जयंती साजरी करण्याचा मानस केला असून त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.





