पुणे शहर

१ व २ डिसेंबर महाराष्ट्रभर महावितरण कार्यालयासमोर मराठा समाजाची निदर्शने

८ डिसेंबर रोजी अधिवेशन कळात मुंबई वर मराठ्यांचा वाहन मार्च

पुणे :  महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी पुणे येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

उमेदवारांना डावलून नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याने मराठा समाज येत्या १ व २ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यानुसार अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

२०१४ ते २०२० प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्न , शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी , अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे , असे अनेक प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने मराठा तरुण आक्रमक आहेत. या बैठकीत दिल्ली येथून छत्रपती संभाजीराजे , ॲड. दिलीप तौर , औरंगाबाद एम एम तांबे , अहमदनगर बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, राजेंद्र कुंजीर, विरेंद्र पवार  मुंबई , संजीव भोर अहमदनगर , अंकुश कदम- नविमुंबई , विनोद साबळे – रायगड , राजन घाग, विलास सुद्रिक, विनोद पोखरकर, प्रफुल्ल पवार, अनंत मोरे- मुंबई , तुषार जगताप , गणेश कदम – नाशिक , दिलीप पाटील, सचिन तोडकर- कोल्हापुर , माऊली पवार, रवि मोहीते – सोलापुर , गंगाधर काळकुटे -बिड , रवि सोडतकर – औरंगाबाद , डॉ. संजय पाटील, प्रविण पाटील, प्रशांत भोसले- सांगली , रूपेश मांजरेकर – मुंबई , विवेकानंद बाबर- सातारा, किशोर मोरे‌, दशहरी चव्हाण, उपोषणकर्ते के. उ. कदम, गणेश काटकर, अनिल शिंदे, तसेच अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये