महाराष्ट्र

फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नका! एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांचे आवाहन

एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला असून, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी केले आहे.

एमएनजीएलकडे फेक कॉल्ससंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने सदर बाब अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, एमएनजीएलनेही ग्राहकांना सूचित केले आहे.

Img 20240404 wa00195661228638643442239



त्यासोबतच, अशा फेक आणि फ्रॉड कॉल्स संदर्भात एमएनजीएलने १ एप्रिल २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार ही दाखल केली आहे. याशिवाय, एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना याबाबत जागृत करण्यासाठी आपल्या ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही ग्राहकांना सूचित केले आहे. त्यासोबतच विविध वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीस देऊन, रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि ग्राहकांना एसएमएस तसेच व्हॉट्सअँपद्वारे संदेश पाठवून जनजागृती करत येत आहे. तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी सदर बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे.

यासंदर्भात एमएनजीएलजे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी सांगितले आहे की, “एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही अँप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचार करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे. एमएनजीएल केवळ देयकावर/बिलावर नमुद केलेल्या बिल प्रदान पद्धतीच्या माध्यमातून म्हणजेत https://www.mngl.in/pay-bill वरुन, भारत बिल पेमेंट सिस्टिम (बीबीपीएस), एनएसीएच, इसीएस, एक्सिस/आयसीआयसीआय बँकच्या शाखेमध्ये धनादेश आणि शिवाजीनगर किंवा चिंचवड येथील एमएनजीएल वॉक-इन सेंटर्समध्ये बिलाची रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा तोतयागिरीपासून ग्राहकांनी सावध राहावे.”

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये