कोथरुड

कोथरूडमध्ये सामुदायिक महा बुद्धवंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

कोथरूड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कोथरूडच्या छ. शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौकामध्ये आंबेडकरी समाज आणि बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मानवतावादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामुदायिक महा बुद्धवंदना घेत अभिवादन केले.

यावेळी प्रास्ताविक करताना कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले म्हणाले, कोथरूड मतदार संघातील वेगवेगळ्या पक्ष , संघटना, आणि संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक हितासाठी समितीच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचारानुसार काम करण्याची जास्त गरज असून दलित कष्टकरी समाजाचे हित जपण्याकरता सर्वजण एकत्र आलेलो आहोत.

Img 20240414 wa0054871862291247787932

कोणीतरी आपल्यासाठी काही करेल याची वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. समितीच्या माध्यमातून कोथरूड मतदार संघातील २८ बुद्ध विहारांचे आधुनिकीकरण व आद्यवतीकरण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  या अभियानाची सुरुवात आज आलेल्या मान्यवर तसेच सर्व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आली.

Img 20240404 wa00195661228638643442239

यावेळी सामुदायिक महा बुद्धवंदना या कार्यक्रमासाठी रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे,  वसंत मोरे, गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार, डॉ.संदीप बुटाला, राम सोनवणे , स्वप्निल दुधाने, संदीप मोकाटे, सचिन धनकुडे, पप्पू टेमगिरे, संदीप बर्वे, मुख्तार मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.

सामुदायिक महा बुद्धवंदना या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले,  बाळासाहेब खंकाळ , दीपक कांबळे,  नामदेव ओव्हाळ ,वसंतराव ओव्हाळ ,राजू गायकवाड, अर्चना चंदनशिवे, दिपाली चव्हाण, केशव पवळे, संतोष शेडगे मिलिंद कदम, विजय बगडे आदींनी केले होते. यावेळी कोथरूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये