पुणे शहर
कोथरूड मधील महात्मा सोसायटीत गव्याचे दर्शन पकडण्यासाठी वनखात्याची टीम दाखल
पुणे : पुण्यात कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत आज (बुधवार) पहाटे पाच वाजल्यापासून एक मोठा गवा (Indian Gaur) आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वनखात्याची टीम ट्रँक्विलायझर घेऊन तिथे पोहोचली आहे.
बुधवारी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक गव्या चे दर्शन झाल्याने घबराट पसरली. महात्मा सोसायटीतील गल्ली क्रमांक एक मधील मोकळ्या जागेमध्ये या गवा दिसला. यापूर्वी पुण्यामध्ये गव्याचे वास्तव्य कुठे आढळून आले नाही त्यामुळे हा गवा कोल्हापूरहून पुण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे म्हणाले, मी याबाबतीत वनविभागाला तक्रार केली आहे. त्यांचे पथक याठिकाणी आले आहे.