पुणे शहर
माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन
पुणे : शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून 1999 साली विनायक निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख, अशी त्यांची ओळख होती. दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 साली काँग्रेस पक्षाकडून निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हातात घेतला. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली होती.
बाळासाहेब ठाकरे आम्हा दोघांना उद्देशून “जय भवानी जय शिवाजी” म्हणायचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या निधनानंतर माजी आमदार दीपक पायगुडे यांची भावनिक पोस्ट