क्रीडा

खेळाडूंसाठी आनंदाची बातमी… या खेळांच्या प्रशिक्षण आणि सरावाला राज्य सरकारची परवानगी

मुंबई : कोरोनाची लाट आता हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने  क्रीडापटूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने विविध खेळाच्या प्रशिक्षणासाठी आता परवानगी दिली आहे. तसंच स्पर्धा देखील आयोजित करण्यास हिरवा कंदील दिला आहे.

आर्चरी, सायकलिंग, तलवारबाजी, शुटिंग तसंच मध्यम संपर्क येणारे खेळ क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल या खेळांना सराव करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील वेगवेगळी मैदानं तसंच प्रशिक्षण केंद्र आता सुरू करता येणार आहेत. सर्व प्रशिक्षण ठिकाणी 10 ते 15 खेळाडू नेमून दिलेल्या वेळेत सुरक्षित अंतर लक्षात घेत वेगवेगळ्या वेळांमध्ये सराव करता येईल.

Img 20201213 wa0074

खेळाडूंसाठी किंवा त्यांचे पालक यांच्यामध्ये जर कोविडची लक्षणं आढळल्यास सरावाच्या ठिकाणी मनाई असणार आहे. त्याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्ये सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशिक्षण असेल अथवा कोणतीही स्पर्धा आयोजित केली असेल तर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांच्या देखील कोविडच्या चाचण्या केल्या जातील, असं निर्देशही सरकारने दिले आहे. कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरीही योग्य ती सर्व खबरदारी देखील घेणे गरजेचं असल्याचं राज्य सरकारने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

कंटेनमेंट झोन शिवाय राज्यातील सर्व मैदान क्रीडा स्पर्धा क्रीडा प्रशिक्षण यांना याचा मोठ्या  फायदा होणार आहे. मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये अनेक प्रशिक्षण तसंच खेळाडूंना सरावासाठी राज्य शासनाची परवानगी नाकारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत होत्या. पण राज्य सरकारने काढलेल्या वेळापत्रकामुळे आता दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये