आणि अधिकृत तिकीट मिळूनही उमेदवार अपक्ष लढला.
पुणे : निवडणूक म्हंटली की, उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळते. त्यात महापालिकेची निवडणूक म्हणजे जागा कमी पडतात आणि इच्छुक उमेदवार जादा हे समीकरण ठरलेलेच असते. मग पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय कार्यकर्ते पक्षाने दुसऱ्याला दिलेल्या एबी फॉर्मची चोरी देखील करू शकतात. त्याचाच हा किस्सा..
विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. पुणे महापालिकेची २००७ साली झालेली सार्वत्रिक निवडणूक जोरदार रंगात आली होती. प्रचार शिगेला पोहोचला होता. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आदी पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर केले जात होते. दरवेळी अखेरपर्यंत उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया चालते. त्यावेळी ही तसेच झाले होते.
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येत होती. कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयात इच्छुक उमेदवार एबी फॉर्म अधिकृत उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते. त्यावेळी काँगेस पक्षाच्या एका उमेदवाराला अधिकृत तिकिटाची घोषणा होऊन एबी फॉर्म हातात मिळाला. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढविणार असल्याने फॉर्म मध्ये भरताना चूक होऊ नये. म्हणून त्या बिचाऱ्या उमेदवाराने पक्षातील एका सहकाऱ्याला फॉर्म भरून देण्याची विनंती केली. आणि घात झाला.
अधिकृत घोषणा झालेल्या उमेदवाराने विश्वासाने ज्या सहकाऱ्याला फॉर्म भरण्यास दिला. तो सहकारी काही क्षणांत तेथून अदृश्य झाला. आणि उमेदवाराचे धाबे दणाणले. थोड्या वेळाने समजले की, त्याच्या सहकाऱ्याने स्वतः चेच नाव त्या अर्जात भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
किस्सा इथेच संपला नाही. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्याने फसवून एबी फॉर्म भरला होता. त्याला माघार घेण्यास सांगितली. त्यानुसार त्या उमेदवाराने माघार देखील घेतली. मात्र काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. आणि काँग्रेसला आपल्याच अधिकृत उमेदवाराला पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा लागला.
विनायक बेदरकर
(Editor- सिंहासन NEWS)
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
4 Comments