कोथरुड

आजच्या युवा पिढीकडे ज्ञानाचे भांडार : वंदना चव्हाण

कोथरूडमध्ये गुरुजनांचा सन्मान व सिलंबम खेळातील खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान..

कोथरूड  : आजच्या तरुण पिढीकडे ज्ञानाचे भांडार आहे त्यामुळे आता आपल्याला तरुणांकडे गुरुजन म्हणून बघण्याची सवय लावून घ्यावी लागेल. आजची युवा पिढी जगभरातील ज्ञान आत्मसात करून पुढे जात आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे. असे मत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या कोथरूड मधील गुरुजनांचा सन्मान सोहळा आणि सिलंबम खेळातील खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राजेंद्र उभे, सीताराम तोंडे, कार्यक्रमाचे आयोजक कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, कार्याध्यक्ष जयश मुरकुटे, उपस्थित होते.

या प्रसंगी मार्तंड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शशिकांत उभे, सार्थक वेल्फेअर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्वाती नामजोशी, डॉ. नीलिमा घैसास, बीव्हीजी इंडिया लिमिटेड अप्रेंटिसशिप विभागाचे प्रमुख व राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित रवी घाटे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सीलंबन खेळात प्राविण्य मिळवत असलेल्या कोथरूड मधील २२ खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप ही यावेळी करण्यात आले.

वंदना चव्हाण पुढे म्हणाल्या, स्वप्नील दुधाने यांनी नावीन्यपूर्ण कार्यक्रम घेतला आहे. आज ज्या गुरुजनांचा सन्मान झाला त्या चौघांचे कार्य सर्वांना स्फूर्ती देणार आहे. सिलंबन खेळातील खेळाडूंसमोर हा विविध क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान होतोय ही खरच खूप चांगली गोष्ट आहे.

पालक कायम मुलांनी चांगल काय तरी करावं यासाठी धडपडत असतात. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचा खूप आटापिटा सुरू असतो आणि तो आवश्यकही आहे पण शिक्षणा बरोबरच मुलं खेळली पाहिजेत, त्यांनी मराठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत यासाठी येथे जमलेले पालक प्रयत्नशील आहेत हे जास्त कौतुकास्पद आहे. क्रिकेट, टेनिस यांसारख्या खेळात हा आपला सीलंबन सारखा मराठी खेळ मागे पडतोय का अशी शंका आता मनात येणार नाही.

स्वप्नील दुधाने यांचा राजकारणातील प्रवेश कसा झाला हे सांगताना चव्हाण म्हणाल्या, स्वप्नील हे कधी राजकारणात नव्हते. त्यांच्या आई नगरसेविका होत्या. त्यांना ते मदत करायचे. महापालिकेत मंजूर केलेल्या कामांचे कधी भूमिपूजन कधी उद्घाटनाला मी प्रभागात यायचे त्यावेळी स्वप्नील हे केलेल्या कामातील बारकावे, तांत्रिक बाजू सांगत यातून त्यांचं इंजिनियरच ज्ञान प्रभागात  काम करताना उपयोगी आल्याचं दिसत होत. मी अनेक वेळा म्हणायचे तू  राजकारणात का येत नाही, त्यावेळी ते नाही मी फक्त आईला मदत करतो असे म्हणत. पण मी ज्या वेळी पक्षाची शहराची अध्यक्ष होते, त्यावेळी कोथरूड मतदार संघासाठी अध्यक्षाची निवड करायची होती. त्यावेळी मी स्वप्नीलला कोथरूड चा अध्यक्ष करायच ठरवलं त्यावेळी त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं आपण राजकारणात येऊ एक पद घेऊ म्हणून, पण त्याला कोथरूड च अध्यक्ष पद दिलं. ज्यावेळी मागील विधानसभेला पक्षाला उमेदवार द्यायचा होता त्यावेळी आम्ही सर्वांनी स्वप्नील च नाव सुचवलं होत पण त्यावेळी मनसेला पाठिंबा द्यायचा ठरलं. पण आम्हाला मनापासून वाटतं तरुण मुलं राजकारणात आली पाहिजेत. खऱ्या अर्थानं पुढं काय केलं पाहिजे याच ज्ञान त्यांच्याकडे आहे म्हणून सुशिक्षित तरुण पिढी राजकारणात येणं गरजेचे आहे असे वाटते.

Fb img 16474137314571819310932637888379

प्रशांत जगताप म्हणाले, नक्कीच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत त्यांच्या बरोबर समन्वय साधला पाहिजे पण आताच्या पिढी बरोबर आपण अपडेट राहील पाहिजे कारण ही पिढी खूप ज्ञानी आहे. 12 वर्षाच्या पुढील मुलांना आता माहिती तंत्रज्ञान, सोशल नेटवर्किंग याबाबतची सखोल  माहिती आहे. जात, धर्म, आर्थिक पाठबळ अशा कोणत्याच बाजू नसलेली आजची युवा पिढी केवळ बुद्धिमत्तेवर, आपल्या ज्ञानाच्या बळावर यश मिळवत आहे. जगात काय चाललंय ते बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. आज सिलंबन खेळातील मुलांना शिष्यवृत्ती मिळतेय त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. मुलांना शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ खेळायला लावले पाहिजे व संस्कृती ही जपायला शिकवली पाहिजे. स्वप्नील दुधाने व जयश मुरकुटे,यांचेकडून मैदानी खेळासाठी प्रोत्साहन दिलं जातंय हे कौतुकास्पद आहे.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये