कोथरुड

कोथरूडमध्ये काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा..नेत्यांनी सरकारच्या धोरणावर साधला निशाणा..

कोथरुड : महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. आशिष गार्डन मध्ये घेण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणांमधून केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. महाराष्ट्र सरकारने अनेक विषयात जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिक्षण हक्क कायद्यात केलेल्या बदलामुळे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांवर कसा अन्याय होणार आहे यावर भाष्य करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. वाढलेल्या महागाईवरून यावेळी सरकारवर निशाणा साधण्यात आला.

Img 20240404 wa00195661228638643442239

यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या सह पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, चंदूशेठ कदम, योगेश मोकाटे, अजित दरेकर, माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष स्वप्निल दुधाने, राष्ट्रवादी ब्लॉक उपाध्यक्ष गिरीश गुरुनानी, पुणे शहर उपाध्यक्ष विजय खळदकर,

Img 20240404 wa00142311409567432001146

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे,  अनुसूचित जाती व जमाती शहराध्यक्ष सुजित यादव,आपचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. अमोल काळे, पुणे शहर युवक सरचिटणीस सागर कदम, संदीप मोकाटे,  आम आदमी महाराष्ट्र सचिव डॉ. अभिजीत मोरे, घरेलु कामगार नेते सुनील शिंदे, जयदीप पडवळ,  महिला ब्लॉक अध्यक्ष मनीषा करपे, महिला सरचिटणीस नयना सोनार, एन एस यु आयचे शहर अध्यक्ष अभिजित गोरे, देशमुख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Fb img 17124617087166045162395876378247
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये