कोथरूडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
भव्य पालखी सोहळा, रक्तदान शिबिर व जैन कीर्तन, जन्मोत्सव-पाळणा चे आयोजन
कोथरुड : कोथरूड येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नित्य अभिषेक, ध्वजारोहण, चढावे, पूजन, महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक अहवाल वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त मंदिर परिसरात मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती. भगवान महावीर यांचा २६२३ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली होती. यावेळी जय जिनेंद्र, अहिंसा परमो धर्म व नमोकार महामंत्राचा जयघोषात भव्य पालखी काढण्यात आली.
कोथरूड येथील उद्योजक स्व. पोपटलाल मेहता यांच्या स्मरणार्थ वर्धमान प्रेसचे मेहता बंधू आणि परिवार यांना भगवान महावीरांचा पालखी सोहळ्याचा मान मिळाला. भगवान महावीर यांचा पालखी सोहळा मध्ये युवक-युवतींचा तसेच सर्व वयोगटातील जैन बांधवानी सहभाग घेऊन कोथरूड मध्ये भ. महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जन्मकल्याणक महोत्सव निमित्त शोभा पोकळे यांचे मैना सुंदरी कथा हे जैन कीर्तन व जैन विचार मंचाचे विठ्ठल साठे यांचे जैन धर्म आणि संस्कृतीचे व्याख्यान, तसेच रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरचे उदघाट्न उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. या वेळी १०८ जणांनी रक्तदान शिबीर मध्ये सहभाग घेतला. दुपारी १२ वा. भगवान महावीरांचा जन्मोस्तव-पाळणा संपन्न झाला.
जन्मकल्याणक महोत्सव निमित्त माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील , माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, वासंती जाधव, हर्षाली माथवड, श्रद्धा प्रभुणे पाठक, डॉ. संदीप बुटाला आदी उपस्थित होते.
भगवान महावीर मंडळ व जैन मंदिराचे ट्रस्टी दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, श्रीकांत पाटील, शिरीष बोरगावे, रमेशभाई शहा, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, प्रितम मेहता, शोभा पोकळे, महावीर पालगौडर, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदुम तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.