पुणे शहर

शिवाजीनगर मधून मधुकर मुसळे यांची माघार…

पुणे : “मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे “ भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ता, स्मार्ट औंध साकारण्यासाठी अथकपणे काम करणारे सेवाभावी नगरसेवक, मला  ज्येष्ठ बंधूतुल्य असणारे मधुकर मुसळे यांनी  छ. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगीतले.

शिरोळे म्हणाले,राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष व शेवटी मी, ही भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे, त्या संस्कारांचे परिपूर्ण पालन करणारे मुसळे यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीचा छ. शिवाजीनगर मतदारसंघातील विजय निेश्चित झालेला आहे.

मी पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. महायुती सत्तेत यावी यासाठी अहोरात्र मेहनत करणार्या हजारो कार्यकर्त्यांना मुसळे यांच्या कृतीमुळे प्रेरणा मिळणार आहे., मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सारे एकत्रित काम करून छ. शिवाजीनगरचा विकास करीत  राज्यात खर्या अर्थाने शिवशाही आणू. असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576
Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0012281298193617916566931378

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये