नागरी संघटनेचे नगरसेवक शांताराम जावडेकर हे कमला नेहरू, प्रभात रोड या सुशिक्षित भागातून निवडून आले होते. त्यांनी पक्षांतर करायचे ठरवले आणि पक्षांतर करायचे झाल्यास नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावयाचा. आणि नव्या पक्षाची उमेदवारी घेऊन लोकांचा कौल घ्यावयाचा. अशी तात्विक भूमिका त्यांनी घेतली होती.
१९८३ सालचा तो काळ होता. तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता, हे लक्षात घेतले पाहिजे. नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ नका, असे अनेकांनी जावडेकर यांना विनवले. पण, तत्वनिष्ठ असलेल्या जावडेकरांनी कोणाचेही ऐकले नाही आणि राजीनामा दिला. आणि काँगेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्या वॉर्डमध्ये पोटनिवडणूक झाली आणि नव्याने स्थापन झालेल्या भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. जावडेकरांचा पराभव झाला.
या पोटनिवडणुकीतून लोकप्रतिनिधी झालेल्या बापट यांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. ते सलग तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि आता खासदार झाले. फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पुणे महापालिकेचे सभासद, विधानसभेचे सदस्य आणि आता लोकसभेचे सदस्य अशा तीनही सभागृहात प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट हे पुण्यातील एकमेव नेते आहेत.
राजेंद्र पंढरपुरे . (जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
2 Comments