नाना पटोले यांच्या कारला अपघात ; घातपात असल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पटोले यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. मात्र हा आघात घातपात असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.
कारला धडक बसली तेव्हा काही वेळ आगोदर कारमधील सर्वजण खाली उतरले होते त्यामुळे कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठे नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. ट्रकचालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नाना पटोले या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली असा गंभीर आरोप अपघातानंतर नाना पटोले यांनी हा केला आहे. आम्ही तर यातून बचावलो, सुखरूप राहिलो पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असे पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात म्हणजे घातपात होता की काय याचाही पोलिस तपास करतील असेही पटोले यांनी नमूद केले आहे





