महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना नोटीस जारी, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता  प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये. दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे नोटीस जारी केली आहे. तसेच त्यांना दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचेही निर्देश दिलेत. त्याचवेळी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल देखील केला. यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं म्हटलं. 

Img 20230717 wa0012281298961742807603730839

शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना देत कोणत्याही गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केलं नाही. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना नोटीस जारी केली असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर नाही ना येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला त्यांचं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिलेत. 

Img 20231109 wa001228129905032016030159557

राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यानंतर यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही उच्च न्यायालयातच जा, पण यासाठी बराच अवधी लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल. तारीख नंतर कळणार असली तरीही फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं वकिल सिदार्थ शिंदे यांनी म्हटलं.

Screenshot 2024 01 23 07 45 22 397201286937204183359
Img 20240122 wa00087153526944112457621
Img 20240121 wa00382598004317740425806
Img 20240121 wa00112357920439439015160
Img 20240121 wa000431078865672467356
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00065252206207234881050
Fb img 17058117418324121437191700473490
Img 20240120 wa00572661306229998441106
Img 20240120 1411245335154334332732265
Fb img 17058116689734456722729440444596
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये