आरोग्य

अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी ; राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्ताने डॉ. सुधा गार्डी यांचा लेख..

दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर भारतभर राष्ट्रीय पोषण सप्ताह आयोजित केला जातो. (National Nutritional Day.)दरवर्षी ह्या निमित्त एक थीम (ध्येय) दिलेली असते. त्या प्रमाणे ह्या वर्षी..2021 साठीची थीम आहे Feeding Smart Right From Start म्हणजे सुरवातीपासूनच जेवन आहार पोषण छान ठेवा व्यवस्थित ठेवा.

आपल्या कडे आयुर्वेदात खूप पुर्वी पासून एक श्लोक आहे. अन्न तारी, अन्न मारी,अन्न नाना विकारी. खरंच अन्न हे एक दुधारी शस्त्र आहे.योग्य सकस आहार नक्कीच तुम्हाला निरोगी आयुष्य देतो, तर अन्नाचा अतिरेक, चुकीचे अन्न खाण्याची पद्धत तुमचे आरोग्य बिघडवू शकते. आज जगभरात दरवर्षी लाखो लोक चुकीच्या अन्न अथवा अयोग्य पोषणामुळे दगावत असतात.

राष्ट्रीय पोषण सप्ताह आयोजित करण्यामागचा हेतूच मुळी आहारा बाबात,पोषणाबाबात जनजागृती करणे हा आहे. योग्य सकस आहार घेणे, वेळच्या वेळी आहार घेणं, योग्य तो व्यायाम करणं, पोषक पदार्थाचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. आज चुकीच्या पोषणामुळे मधूमेह, उच्चरक्तदाब, वजन वाढणे, कर्करोग, त्वचारोग असे असंख्य आजार होतात.

समर्थ रामदासांनी तर एक अत्यंत बोधप्रद वचन सांगितले आहे, ‘जीवन करी जीवित्वा। अन्न हे पूर्णब्रह्म॥ उदरभरण नोहे। जाणिजे यज्ञकर्म*॥’
खरंच आज आपण सर्वांनी मिळून राष्ट्रीय पोषण सप्ताह च्या निमित्ताने आपला आहार, पोषण, आपले आरोग्य ह्या विषयावर नक्कीच विचार केला पाहीजे..
निरोगी आयुष्य जगण्यासाठी नक्कीच सकस आहार, सकस विचार व योग्य तो व्यायाम गरजेचा आहे.

डाॅ.सुधा गार्डी, डाॅ. ऋषिकेश गार्डी
(समर्थ हाॅस्पीटल वारजे)

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये