पुणे शहर

मंगळवारी पुणे बंद : सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांचा मुक मोर्चा; एक दिवस शिवरायांसाठी.. आपल्या अस्मितेसाठी सहभागी व्हा. दीपक मानकर यांचे आवाहन

डेक्कन पासून प्रारंभ लाल महाल येथे सभेने समारोप होणार

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने मंगळवारी (दि. १३) सकाळी साडे नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.एक दिवस शिवरायांसाठी.. आपल्या अस्मितेसाठी शिवप्रेमींनी आणि पुणेकरांनी एक दिवस शिवरायांसाठी द्यावा आणि मोठया संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केले आहे.

मानकर म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या मोर्चा मध्ये सर्व सामान्य पुणेकरांनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विदयार्थी या सर्वांनी सहभागी होऊन एक दिवस शिवरायांसाठी द्यावा असे मी आवाहन करीत आहे. या मोर्चा वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन मोर्चा मध्ये सहभागी होणाऱ्या पुणेकरांसाठी नदीपात्रात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Fb img 16474137314577667123777135621121

पुणेकर म्हणून या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या वाचाळवीरांना योग्य तो संदेश देण्यासाठी सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर म्हणून दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा खंडोजीबाबा चौकापासून टिळक चौकमार्गे लक्ष्मी रोडने बेलबाग चौक डाव्या हाताने लालमहाल येथे सभेने समारोप होणार आहे. या वेळी काळी फीत बांधून मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करणार आहे. अशी माहिती मानकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये