पुणे शहर

कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’; गांधींजींच्या विचारांचा जागर!

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड येथील गांधी भवन येथे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी या सर्व कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या सप्ताहाचे उद्घाटन रविवारी (1 ऑक्टोबर) करण्यात आले.

डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘धर्माबद्दल’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. आज सोमवारी, (2 ऑक्टोबर) 154 व्या गांधी जयंतीच्या निमित्ताने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी प्रार्थना आणि भजनांचे आयोजन करण्यात आले तर संध्याकाळी, शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम रंगणार असून विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी कार्यक्रमस्थळी भेटी देणार आहेत.

Img 20230812 wa0001281292979418231884101793

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ कार्यक्रमाची रुपरेखा 

सोमवार, 2 ऑक्टोबर

दुपारी 4.00 वाजता- गांधी पुतळा (गांधी भवन, कोथरूड, पुणे) ते गोखले पुतळा (गुडलक चौकाजवळ फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे) दरम्यान शांतीमार्च

मंगळवार, 3 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- प्रा. डॉ. मर्णीद्रनाथ ठाकुर (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) यांचे व्याख्यान. विषय- आज यदि गांधी होते तो…

बुधवार, 4 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- परिसंवाद विषय: लोकसभा निवडणूक २०२४ आव्हाने व पर्याय
वक्ते- विजय चोरमारे (पत्रकार आणि अभ्यासक), किरण माने (प्रसिद्ध अभिनेते आणि कलाकार)

गुरुवार, 5 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- पत्रकार आणि अभ्यासक पी. साईनाथ यांचे व्याख्यान
विषय: आजचे वर्तमान आणि आव्हाने

शुक्रवार, 6 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- विचारवंत आणि अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांचे व्याख्यान
विषय : गांधी समजून घेताना

शनिवार, 7 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- अविष्कार निर्मित ‘उमगलेले गांधी अभिवाचनाचा प्रयोग सहभाग : अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते, धनश्री करमरकर आणि दीपक राजाध्यक्ष

रविवार, 8 ऑक्टोबर
सकाळी 10.00 ते सायं. 6.00 पर्यंत-
पहिले सत्र मा. सत्यरंजन धर्माधिकारी (माजी न्यायमूर्ती) विषय: गांधी विचार आणि न्यायव्यवस्था
दुसरे सत्र : मा. डॉ. कुमार सप्तर्षी विषय: सत्याग्रह शास्त्र
तिसरे सत्र प्रा. डॉ. शैलजा बरूरे (प्रमुख, गांधी अभ्यास केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय) विषय: गांधी-आंबेडकर विचार आणि वारसा

Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये