पुण्यातून राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्लाबोल
पुणे: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज रायबरेतीलून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आज महाराष्ट्रातील पुण्यात येऊन त्यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून महिला, युवक, शेतकरी आणि सर्वांसाठी दिलेल्या योजनांची माहिती देत मोदी सरकारच्या गॅरंटीवरही टीका केली. तसेच, आपल्या भाषणातून त्यांनी कर्नाटकमधील प्रज्जव रेवण्णा यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पातळी सोडून भाषणबाजी सुरू केल्याचं म्हटलं. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पुण्यातील सभेतून राहुल गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते.यावेळी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, चंद्रकांत हांडोरे, मोहन जोशी, प्रशांत जगताप, दिप्ती चौधरी, आबा बागुल, रमेश बागवे ,बाळासाहेब शिवरकर, अंकुश काकडे, वंदना चव्हाण, गजानन थरकुडे, अरविंद शिंदे
राहुल गांधींनी संविधान, शेतकरी, जातनिहाय जनगणना, विकास या विषयांवर राहुल गांधींनी भाष्य केलं. तर, कर्नाटकच्या रेवण्णाचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडलं. रेवण्णाने 400 महिलांवर बलात्कार केलाय, मोदींनी त्याच रेवण्णासाठी मतं मागतिली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयास भाजपाच्याच एका नेत्याने पत्र लिहून रेवण्णावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी काहीही कारवाई केली. तरीही नरेंद्र मोदी या रेवण्णासाठी कर्नाटकात जाऊन मत मागत आहेत,असे म्हणत राहुल गांधींनी रेवण्णा प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य केलं.
मी जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा मला आनंद होतो. महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य, जसं मी महाराष्ट्रात लँडींग करतो, मला आनंद वाटतो. मी काँग्रेस संघटनेची बात करत नाही, विचारधारेची बात करत आहे. तुमच्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे, हजारो वर्षांपासून येथे काँग्रेसची विचारधारा आहे. नॅचरल काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्रात आहे, स्वातंत्र्यांची लढाई, फुलेंची विचारधारा, आंबेडकरांची, गांधींजींची विचारधारा आपल्या सर्वांच्या रक्तात आहे, आपल्या अनेक पिढ्यांमध्ये आहे, असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या रक्तात काँग्रेस असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेतून शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता, त्याच पुण्यातून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलणं हे पंतप्रधानांना शोभतं का, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.