पुणे शहर

अपघातात हात गमावलेल्या श्रावणीला आमदार शिरोळेंकडून ‘रोबोटिक हात’

पुणे : काही महिन्यांपूर्वी श्रावणी वाळुंज या १४ वर्षांच्या मुलीने अपघातात डावा हात गमावला होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेऊन तिला ‘रोबोटिक हात’ मिळवून दिला. आता तिच्या हातामध्ये जाणीवा निर्माण झाल्या असून, त्या हाताने तिला कामे करता येऊ लागल्याने श्रावणीला अपार आनंद झाला आहे.

अपघातात हात गमावल्यानंतर श्रावणीने खूप दुःख अनुभवलं, सोसलं. हातासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारांचा खर्च तिच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने तिला मदतीची गरज होती. आमदार शिरोळे यांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि फिटवेल गॅसकेट को. प्रायव्हेट लिमिटेडचे चैतन्य शिरोळे यांच्याशी संपर्क साधला आणि श्रावणीला रोबोटिक हात मिळवून दिला. रोबोटिक हात बसविल्यानंतर श्रावणी आता स्वतः लिहिणे, भाजी चिरणे, बुटाच्या लेस बांधणे अशी कामे स्वतः करु लागली असून त्यात तिला आनंद मिळत असल्याचे श्रावणीने, आमदार शिरोळे यांना सांगितले.

Img 20210727 wa0218

आपण समाजाचे देणे लागतो, ज्यांना गरज असते त्यांना योग्यवेळी मदत देणे हीच खरी माणुसकी. ज्यांना आपण प्रामाणिकपणे मदत करतो, त्यावेळी त्यांनी दिलेले आशीर्वाद आपल्याला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत रहातात, अशी भावना आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली. सहकार्य केल्याबद्दल चैतन्य शिरोळे यांचेही त्यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये