आरोग्य

भाजल्याने झालेल्या जखमेवर प्रभावी उपचारासाठी डॉ. सारिका वायरकर यांना पेटंट

मुंबई : त्वचेला दुखापत झाल्यावर किंवा भाजल्यावर मलम लावूनच उपचार करण्याची पद्धत सध्या उपलब्ध आहे. मात्र, दुखापतग्रस्त भागाला स्पर्श न करता उपचार करण्याची पद्धत शोधण्यात आणि त्याचे पेटंट मिळविण्यात “डॉ. सारिका वायरकर” यांना यश आले आहे.

त्यांना ‘टॉपिकल फोम कंपोझिशन कंप्रइजिंग मुपिरोसिन’चे भारतीय पेटंट क्रमांक ४०८०५९ प्रदान केले आहे. हा शोध मुपिरोसिनच्या फोम फॉर्म्युलेशनशी संबंधित आहे. त्वचेची दुखापत किंवा भाजलेल्या जखमेवर साधारणपणे वापरले जाणारे प्रतिजैविक हे मुपिरोसिन हे क्रीम फॉर्म्युलेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ते थेट जखमेवर लावावे लागते. डॉ. सारिका यांच्या संशोधनामध्ये थेट जखमेला स्पर्श न करता ते इच्छित ठिकाणी सहजपणे लागू केले जाऊ शकते. त्यामुळे ही सद्यस्थितीत उपचारासाठी एक प्रभावी उपचार पद्धत असणार आहे. डॉ. सारिका वायरकर या एसव्हीकेएम, एनएमआयएमसच्या शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.

Fb img 1647413711531 1


“हे फॉर्म्युलेशन गंभीर जखमा, गंभीर दुखणे विशेषत: भाजलेल्या जखमा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. दीर्घकालिन जखमांच्या व्यवस्थापनात लक्षणीयरित्या याची मदत होऊ शकते.

– डॉ. सारिका वायरकर, सहयोगी प्राध्यापक, SPPSPTM, NMIMS.

Img 20221012 192956 045 1


SPPSPTM चे डीन डॉ. बाळा प्रभाकर यांनी डॉ. सारिका वायरकर यांचे कौतुक करताना शाळेच्या ग्राऊंड ब्रेकींग संशोधनावर सातत्याने भर दिल्याबद्दल सांगितले. तसेच, डॉ. सारिका वायरकर यांचा हा शोध भाजलेल्या रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल असेही ते म्हणाले. NMIMS SCHOOL OF PHARMACY कडून अशा आणखी नावीन्यपूर्ण संशोधन कार्याची अपेक्षा डॉ. बाळा प्रभाकर यांनी व्यक्त केली.

Img 20221121 wa00097959273488039321580

SPPSPTM विषयी थोडक्यात –


शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (SPPSPTM) 2006 मध्ये SVKM NMIMS च्या छताखाली स्थापन झालेली फार्मसी स्कूल आहे. फार्मास्युटिकल सायन्सेमध्ये डॉक्टरेट, पदव्यूत्तर, पदवीधर आणि डिप्लोमा प्रोग्राम येथे उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये