पुणे शहर

कोथरूडमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

पुणे : ६ जुन “शिवराज्याभिषेक दिन” कोथरूड मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ६ जुन रोजी स्वराज्यदिन म्हणुन युगपुरुषाने दिलेला भारतभुमीला सुवर्णदिन त्यामुळे त्याला असाधारण महत्व लाभले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कोथरूड गावठाण येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवाराज्याभिषेक दिनानिमित्त वंदन आणि  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

Img 20220606 wa0009

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन दादा मानकर, युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरूनानी, धनंजय पायगुडे, लखन सौदागर, आशिष शिंदे, विजय बाबर, महिला पदाधिकारी ज्योतीताई सूर्यवंशी आणि नानेकर ताई उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघा तर्फे ऋषिकेश कडू, श्रीकांत बालघरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये