पुणे शहर

सिंहगड रस्त्यावर फुकट काजूकतलीसाठी दुकानदारावर गोळीबाराचा प्रयत्न

पुणे : सिंहगड रस्त्यावरील एका स्वीटमार्टच्या मालकाने काजूकतली फुकट दिली नाही म्हणून, दोघांनी स्वीटमार्टच्या मालकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल देखील जप्त केले आहे. सुरज मुंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वडगाव बुद्रुक येथे फुलपरी स्वीट मॉल आहे. तिथे सोमवारी दोन तरुण आले आणि त्यांनी एक किलो काजूकतली घेतली. त्यावर दुकानदाराने मालाचे पैसे मागितल्यावर दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी दुकानदारावर गावठी पिस्तूलामधून दोन वेळा गोळी मारण्याचा प्रयत्न केला पण, गोळी काही बाहेर आली नाही.ती गोळी दुकानातच पडली आणि आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. त्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर काही तासांतच आरोपी सुरज मुंडे आणि एका अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये