#आरोग्य – Sinhasan News
पनीर आणि चीज बाबत हॉटेल चालकांना हा नियम बंधनकारक.. परिपत्रक निघाले, कारवाई होणार
तुम्ही हॉटेल मध्ये पनीर,चीज खाताय का ? रहा दक्ष अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम..
मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात 25 मार्च 2026 पासून मोहीम राबवली जात आहे.
पनीरमधील वाढत्या भेसळीची गंभीर दखल घेत तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने, मंत्री झिरवाळ यांनी पनीरच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेल्या ‘ॲनालॉग’वर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही पाठिंबा मिळाला असून तसे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
अनेक हॉटेल्समध्ये पनीरऐवजी स्वस्त पर्यायांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याने तक्रार करण्यात आली होती. मात्र, नव्या नियमानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटना त्यांच्या मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर पदार्थात ‘नैसर्गिक पनीर/चीज’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’, हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. खाद्यपदार्थ विक्रेते किंवा हॉटेल चालक पनीर म्हणून चीज ॲनालॉगची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की,  अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार ग्राहकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. जे हॉटेल मालक पारदर्शकता पाळणार नाहीत आणि माहिती लपवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतील, त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. नागरिकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ असलेल्या पनीरमध्ये होणारी भेसळ ही चिंतेची बाब आहे. ग्राहकांना आपण काय खातोय हे कळायलाच हवे. यापुढे पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचे निर्देश
चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंट आणि केटरर्सना बल्क मेसेजद्वारे या नव्या नियमांची माहिती दिली जात आहे. पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक
अन्न सुरक्षा मानके विनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉग हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून ‘चीज ॲनालॉग’ या प्रवर्गात मोडतो. हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.
तक्रार कुठे कराल ?
उत्पादन घेताना ग्राहकांनी दक्षता घ्यावी. दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
अँटेरियर नी पेन नक्की काय आजार आहे.. लक्षणे, निदान आणि उपचार घ्या जाणून
अँटेरियर नी पेन Anterior Knee Pain एक नवीन आणि खूप प्रमाणात दिसून येणारे गुडघे दुखीचे कारण ठरत आहे. येरवी वयोमानानुसार येणारी गुडघे दुखी हे हल्लीच्या काळात कमी वयोगटातील स्त्री पुरुष दिसून येत आहे. अँटीरियर नी पेन ही तर तसे बघितले तर गुडघे दुखीची सुरुवात समजली जाते.
४० वयोगटातील लोकांना ह्या अँटीरियर नी पेन ने ग्रासले असल्याचे सध्याचे चित्र आहे. अँटीरियर नी पेन म्हणजे गुडघ्याच्या समोरील भागात सतत वेदना ,सतत दुखणे, समोरील बाजूला सूज येणे. अशी लक्षणे दिसून येतात. याची कारणे बघितली तर वाढलेले वजन, मधुमेह, उच्चरक्तदाब, थायरॉइड लवकर मासिक पाळी बंद होणे, जन्मतः पायात गुडघ्यात बाक असणे, दोन्ही गुडघे जवळ आणि घोटे लांब असणे, मांडतील स्नायू कमजोर असणे त्यामुळे गुडघ्याच्या वाटीवर ताण येणे, गुडघ्याची वाटी मांडीतील हाडावर दाबली जाणे घासणे जाणे,
जन्मत: पाय मध्ये गॅप असणे, पाय सपाट असणे फ्लॅट फिट असणे, पायातील पादत्राणे हलक्या क्वालिटी ची वापरणे अशी कारणे दिसून येतात.
लक्षणे
सतत आणि नेहमी गुडघ्याच्या समोरील बाजूला दुखत राहणे, कधी वाटी च्या वर तर कधी वाटीच्या खाली दुखणे,गुडघ्यावर सूज असणे, जिना चढउतार करताना त्रास होणे, मांडी घालून जास्त वेळ बसता न येणे, भारतीय शौचालय चा वापर करताना वेदना होणे, जास्त वेळ जमिनीवर काही काम साठी बसावे लागते तर उठताना त्रास होणे, आधार घेऊन जमिनीवरून उठणे,
वारंवार वेदना शामक औषधे घ्यावी लागणे, चालणे कमी होणे, चालताना स्पीड कमी होणे, गुडघ्याच्या आतून कट कट आवाज येणे अशी लक्षणे अँटीरियर नी पेनमध्ये दिसून येतात..
निदान
पेशेंट ची लक्षणे आणि क्लिनिकल तपासणी केली असता ह्या आजाराबद्दल निदान करता येते  काही पेशंट मध्ये एक्सरेज  गरजे नुसार  एमआरआय, काही पेशेंट मध्ये कार्टिलॉग्राम तपासणी केली जाते.  गरजेनुसार  डिजिटल स्कॅनोग्राम विथ बायोमेट्रीक एंगल तपासणी केली जाते. लवकर तपासणी लवकर उपचार केले तर निश्चित लवकर नी पेन कमी होण्यास मदत होते आणि भविष्यात नी चे आयुष्य वाढू शकते.
काही पेशंट मध्ये विटामिन डी विटामिन B१२ ची कमतरता अँटीरियर नी पेन साठी कारणीभूत ठरू शकते.
उपचार
लवकर निदान ,मेडिसिन , वजन कमी करण्यासाठी फायदेशीर एक्सरसाइजेस, योग्य चांगली पादत्राणे वापरणे,
शुगर कंट्रोल करण्यासाठी योग्य व्यायाम आणि संतुलित आहार घेणे, मांडीतील स्नायू बळकट करण्यासाठी योग्य प्रमाणात व्यायाम करणे, गरजेनुसार फिजियोथेरपी ही मदत घेणे..
डॉ सचिन नागापूरकर
अस्थी रोग आणि कृत्रिम संधारोपण तज्ञ
पुणे
काय आहे कोक्सीडिनिया आजार..सांगताही येईना आणि सहनही होईना
कोक्सीडिनिया नाव ऐकताच काही तरी भयंकर आजार आहे की काय असे नक्की वाटले असणार. कोक्सीडिनिया म्हणजे टेल बोनचा आजार, Disease of tail bone माकड हाडाचा आजार. बऱ्याच जणांना हे हाड दुखण्याचा आजार असतो. कोणाला लगेच सांगता येत नाही आणि सहन पण होत नाही अशी अवस्था हा आजार झाल्यावर रुग्णाची होते. काही जण लज्जा पोटी आजार लपवतात पण आजार लपवणे म्हणजेच आजार वाढवणे हे मात्र नक्की
कोक्सीडिनिया होण्याची कारणे
सतत एका जागी बसून काम करणे,
सतत दोन चाकी वाहन चालवणे,
वाहन चालवताना गाडी खड्डा मधून जाणे आणि टेल बोन ला इजा होणे,
महिला वर्गात डिलीवरी दरम्यान ह्या हाडाला इजा होणे,
वजन जास्त प्रमाणात वाढणे,
मधुमेह , थायरॉइड चा आजार,
मानसिक ताणतणाव आसणे,
सतत नकारात्मक विचार करणे,
टाइप A पर्सनालिटी च्या लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो आणि तो लवकर बरा होत नाही.
लक्षणे
माकड हाड ला सतत दुखत राहणे, जास्त वेळ एका जागेवर बसता न येणे, हार्ड सरफेस वर बसले की माकड हाड नितंब दुखत राहणे, लैंगिक संबध ठेवताना वेदना होणे,  संडास करताना वेदना होणे, गाडी चालवताना वेदना होणे.
निदान
साधारणपणे  पेशंट च्या बोलण्यावरून  तपासणी केल्यावर आजाराचे प्राथमिक निदान होते.
गरजे प्रमाणे  एक्सरे काढून आजाराचे निदान करता येते.
५०% पेशेंट मधे एक्सरे नॉर्मल असतात.
काही पेशेंट मध्ये एक्सरे मद्दे हाडाला थोडा बाक आलेला दिसतो.
उपचार
मेडिसिन काही ठरावीक व्यायाम
कडक जागेवर बसणे टाळणे आवश्यक आहे.
डॉक्टर यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
डॉ. सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ
रमजान..खजूर आणि आरोग्य : डॉ.सचिन‌ नागापूरकर
रमजान महिना हा मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र महिना. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचे तीन हिस्से असतात. रमजान महिन्याचा पहिला दशक ‘कृपेचा’, दुसरा दशक ‘क्षमेचा’, तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून ‘मुक्ततेचा’ मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल.
मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र मानला जाणारा हा महिना.‌ उपवास रोजा ठेवण्याचा महिना. मुस्लिम समाजात ह्या मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात.. रमजान महिन्यात रोजा  महत्वाचा मानला जातो. रोजा उपवास सुरू करताना सुर्योदयापुर्वीचे जेवण म्हणजे सहेरी..आणि‌ सुर्यास्तानंतरचे जेवण म्हणजे इफ्तार आणि ह्या दोन्ही वेळा आहारातील प्रमुख पदार्थ म्हणजे खजूर.
खजूर ह्या खाद्यपदार्थाला मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र पदार्थ म्हणून मानले जाते. मोहम्मद पैगंबर यांचे आवडते फळ म्हणून पण खजूर कडे बघितले जाते. जगभरातील मुस्लिम बांधव खजूर चे सेवन ह्या रमजान ईद रोजा उपवास दरम्यान करतातच. अतिशय शक्तिवर्धक असे हे फळ आहे. कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॉपर ने भरपूर असे हे फळ खजूर आरोग्यासाठी लाभदायक आहे. चांगल्या साखरेचे प्रमाण खजूर मध्ये असते, त्यामुळे दिवसभर उपवास असताना देखील शक्ती उर्जा निर्माण करण्याचे कार्य खजूर खाल्ल्यामुळे होते.
रोजा उपवास दरम्यान पाणी पिणं पण बंद असतं. खजूराचे सेवन केल्यास तहान लागणं कमी होते. भारतात बारा महिने खजूर उपलब्ध आहे. लाल आणि काळे खजूर. ह्या सह जगभरात पन्नास प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. बाजारात अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन या प्रकारचे खजूर मिळतात.
खजूरमध्ये फायबर चे प्रमाण भरपूर असल्याने अन्न पचन पण व्यवस्थित होते.असे हे आरोग्यदायी फळ रमजान महिन्यात आपल्या मुस्लिम बांधवांप्रमाणे सर्वांनी खाल्ले तर निश्चितच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
समस्या जेष्ठांच्या, चिंतन व उपाय ; डॉ सचिन नागापूरकर
जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त
आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात न चुकता येणारा कालावधी म्हणजे जेष्ठत्व, म्हातारपण…आजमितीस जगभरात झालेल्या वैद्यकीय विषयातील संशोधनामुळे सामान्य माणूसाचे आयुष्यमान खूप वाढले आहे. आज वयाच्या 85/90 वया पर्यंत सुद्धा निरोगी आयुष्य जगणारे लोकं आहेत.
साधारणपणे वयाच्या साठी नंतरचा काळ हा जेष्ठ नागरिक म्हणून संबोधला जातो. नोकरदार वर्ग या वयातच आपल्या नोकरीतून मुक्त होऊन रिटायरमेंट आयुष्य जगण्यास सुरुवात करतो. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पाच असतो हा कालावधी. मुलं मोठी झालेली असतात, नोकरी कामे करत असतात, सून जावाई आलेले असतात. आपला संसार थोडा बाजूला ठेवून मुलगा/ मुलगी च्या संसारात लक्ष घालावे लागते. नातू..नात आलेले असतात. आजारपणही सुरू होण्याचा हाच कालावधी असतो. शरिरातील बदल जाणवू लागतात. महिलांमध्ये विशेषतः जास्त प्रमाणातील बदल जाणवू लागतात. इतके वर्ष केलेला संसार आता सून बाईचा ताबा आलेला असतो.
मधूमेह/ उच्चरक्तदाब,वजन वाढणे असे आजार होण्यास सुरुवात झालेली असते. जेष्ठत्व प्राप्त झालेली गोष्ट जाणवत असते. वयोमानानुसार शरिरातील कॅल्शियम..व्हिट्यामिन ड चे प्रमाण कमी होत असते त्यामुळे कंबर, पाठ, गुढघेदुखी सुरू झालेली असते. चालण्या फिरण्यावर मर्यादा येण्यास सुरुवात होते.
आजमितीस असंख्य जेष्ठ नागरिक हे कौटुंबिक जीवनातील वाद वैचारिक मतभेद मुळे एकटेच राहताना आढळतात. कोणी दोघे जेष्ठ नवरा बायकोच एकत्र राहतात. मुलगा/ सून/ मुलगी/ जावाई. फारशी दखल देत नाहीत तर काही जेष्ठ नागरिक वृद्धाश्रमात राहणे पसंद करतात.जेष्ठ नागरिकांना आज आपण सर्वानी एकत्र येऊन मिळून आधार देणे आवश्यक आहे. आपणही आज ना उद्या जेष्ठ वृद्ध होणार आहोत याचे भान ठेवले पाहीजे.
जेष्ठ नागरिकांमध्ये वैद्यकीय आजारांचे प्रमाण खूप असते.
डोळ्याचे आजार, हाडांचे आजार, कंबरदुखी, गुढघेदुखी,
उच्चरक्तदाब, मधूमेह, कर्करोग आज जेष्ठ नागरिकांना आपल्या आधाराची मानसिक धीर देण्याची गरज आहे.
त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जीवनातील उमेद कायम ठेवण्यासाठी आधाराची गरज आहे.
जेष्ठ नागरिक संघटना सारख्या गोष्टींमधून आज बरेच जेष्ठ नागरिक आपले आयुष्य खुप छान उपक्रम आयोजित करून जगत आहेत. आपल्याला फक्त त्यांना मानसिक मदत करायची आहे. आपल्या घरातील असो, परिसरातील असो, नातेवाईक असो जे कोणी जेष्ठ नागरिक असतील त्यांची विचारपूस करायची आहे. त्यांना काही वैद्यकीय मदत लागत असेल तर ती उपलब्ध करून द्यायची आहे. जेष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
आजही काही जेष्ठ नागरिक हे तरूणांना लाजवतील इतक्या उमेदीने काम करतात. आज सर्वच क्षेत्रात जेष्ठ नागरिक आपल्या कामाची दखल घेतली जाईल अशी कामे करताना दिसून येतात चला तर मग आज जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात जेष्ठांच्या वैद्यकीय आजाराचे लवकरात लवकर निदान व उपचार करून त्यांना तरूण राहण्यास मदत करू यात.
पावसाचा आनंद लुटा पण आरोग्याची काळजी घेत…
जून महिना आला की पावसाची चाहूल लागते. उन्हाळ्यातील प्रखर उन्ह आणि नंतर येणारा सर्वांचा आवडता ऋतु पावसाळा. नेहमी पावसाळा आला की गृप सहली, पर्यटन, मस्त पाऊस व गरमागरम चहा, भजी पकोडे, मका कणिस आणि बरेच काही…..
आता तर सामान्य माणंस गेली साधारण दीड वर्ष झाले घरात आहेत. आता लाॅकडाऊनचा काळ संपला आहे. अनलाॅक सुरू आहे. कोरोना रुग्ण कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. मग सहाजिकच ह्या पावसाळ्यात घराबाहेर पडून मौजमजा पर्यटन, सहल ह्याचे प्रणाम वाढणार हे नक्की….Enjoy the rain but take care of your health …
परंतु दरवर्षी आपण पावसाळा आला की आपल्या शरीराची काय काळजी घ्यावी ह्या बाबात सविस्तर चर्चा करतोच, परंतु ह्या वर्षांत आपल्याला पावसाळ्यातील आजार बाबात जनजागृती तर आहेच पण कोरोना संसंर्ग नियम पाळून आपले जीवन जगायचे आहे.  पावसात मस्त भिजणे हे तर लहान मुले, तरूण व ज्येष्ठांनाही आवडते. पण पावसात भिजून आनंद लुटत असताना आरोग्याची काळजी ही घेणे तितकेच गरजेचे आहे.
साधारणपणे पावसाळ्यात होणारे आजार म्हणजे थंडी ताप, खोकला , दमा, पोटात दुखणे, संडास उलटीचा त्रास होणे, पायाला जखमा, तळपायाला भेगा पडणे, मलेरिया/ हिवताप.
पावसाळ्यातील आजाराची करणे
पावसाळ्यात सर्वत्र पाणी जमा झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होते त्यामुळे थंडी तापाचे रुग्ण वाढतात कारण डासांचे प्रमाण वाढलेले असते. परिणामी होणारा मलेरिया, हिवताप आजारचे रुग्ण वाढतात. भारतात दरवर्षी आजही मलेरिया हिवताप मुळे हजारो लोकांचा बळी जातो.
पावसाळ्यातील दमट हवामानमुळे दम लागणे,
श्वसनाचा त्रास होणे या आजारात पण वाढ होत असते. पावसाळ्यातील भ्रमंती, भटकंती मध्ये घराबाहेरील कमी शिजवलेले शिळे अन्न उघड्यावरील माश्या बसलेले अन्न खावून बरेच जण आजारी पडतात….
पावसाळ्यात  घ्यावयाची काळजी..
पावसाळ्यातील मौज मजा नक्कीच केली पाहीजे, पण आपली व आपल्या परिवारातील सदस्यांची तब्येत ठीक राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जसे की पाणी उकळून गरम करून गार करून पिणे,
आपल्या परिसरातील घाण साफ करून घेणे ज्यायोगे डासांची उत्पत्ती होणार नाही म्हणजे डेंग्यू, मलेरिया
सारखे आजार होणार नाहीत. पावसात भिजणे शक्यतो टाळावे अथवा भिजून होताच ओले कपडे बदलणे, डोके कोरडे करणे खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण थंडी ताप सारख्या आजारांना आमंत्रण दिल्या सारखे होईल.
दमा अस्थमा सारखा आजार असणाऱ्यांनी तर जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरील, उघडे, तळलेले माशा बसलेले अन्न खाणे टाळले पाहीजे. घरात डास प्रतिबंध खिडकी जाळी वापरली पाहीजे, ह्या वर्षा पावसाळ्यात आपल्याला खूप काळजीपूर्वक रहायचे आहे..दरवर्षी पावसाळ्यातील आजार व पुर्णपणे न संपलेली कोरोनाची साथ त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे.
लाॅकडाऊन उठवला गेला आहे हे मान्य आहे,परंतु थोडासा संयम बाळगून सामाजिक भान, कुटुंबातील सदस्यांची काळजी व आपल्या आरोग्याची काळजी घेत पावसाळ्यातील मौजमजा करा. दरवर्षी पावसाळ्यात जर कोणाला थोडा थंडी ताप आला तर आपण तो घरातच बसून किरकोळ घरगुती उपचार करून घेत, परंतु कोरोना संसंर्ग काळ आहे शक्यतो घरातच बसून उपचार करणे, अंगावर आजार काढणे शक्यतो ह्या वर्षी टाळाच. वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ मंडळी,नफॅमिली डॉक्टर कडून उपचार करून घ्या.
डाॅ.सीमा पाटील
डाॅ.मिलींद पाटील
ओम हाॅस्पीटल बावधन