#एसटी – Sinhasan News
आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी
मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिला प्रवाशांसाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास  करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च)  एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
माझ्या डॉक्टर बनण्याच्या प्रवासात एसटीचा मोठा वाटा : डॉ. सचिन नागापूरकर
एसटीने ग्रामीण भागात अनेक डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी घडवले.
आज गेले साधारणपणे 2 महिने कालावधी झाला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आजतरी कोणताही निर्णय झालेला नाही. संपकरी आणि सरकार चर्चासत्र सुरूच आहे पण यश आलेले नाही. एसटी ही ग्रामीण भागातील गरीब जनतेची एक रक्तवाहीणी, मी तर म्हणेल ती एक कौटुंबिक सदस्य आहे.
आज माझ्या वयातील असंख्य डाॅक्टर असतील, कोणी इंजिनिअर असतील, कोणी तहसिलदार कोणी कलेक्टर झाले आहेत. ते त्या काळात फक्त आणि फक्त एसटी बसने प्रवास करूनच. मला आठवते वैद्यकीय शिक्षण घेत असताना एसटी बसचा दिवाळीनंतर की आसपास  २ दिवसांचा संप झाला होता तर माझ्या सोबतच घरातील सर्व चिंतेत होते. संप कधी संपेल, तू परत काॅलेजला कसा जाणार, आपल्याकडे खाजगी वाहन नाही, त्यामुळे सर्वच जण काळजीत. दोन दिवसाच्या संपाने ही परिस्थिती झाली होती. एसटी लगेच सुरू व्हावी म्हणून देवाकडे साकडे घालत होत त्यावेळी लोकांनी..
मला आठवते मला वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याआधी सरकारी दवाखान्यात काम करणे आवश्यक होते. मला नंदुरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल व्हायचे होते. मी राहत असलेल्या अंबाजोगाई येथून अक्कलकुवाला जाण्यासाठी डायरेक्ट एसटी बस तेव्हा नव्हती. अंबाजोगाई ते औरंगाबाद साधारणपणे 5/6 तास प्रवास, तिथून पुढे औरंगाबाद ते धुळे कन्नड घाट रस्ता. साधारणपणे मी अंबाजोगाई वरून सकाळी 10 वाजता निघायचो धुळे येथे रात्री 2 वाजता पोहचायचो, मग काय एसटी स्थानकावरच बाकावर मस्त झोपायचो. डास होते चावायचे पण कधी कोणता आजार होऊ दिला नाही त्यांनी कारण तशी मैत्रीच झाली होती. प्रातःविधी परत स्थानकावरच.  मग तोंड हात धुवून पुढची गाडी सकाळी 6 वाजता धुळे ते अक्कलकुवा..
अक्कलकुवा येथे सकाळी 9 वाजता दवाखान्यात हजर. प्रवास लांबचा होता पण कधी कंटाळा नाही आला. आणि दुसरा पर्याय पण उपलब्ध नव्हता. माझ्या सारखेच असंख्य डाॅक्टर, तहसिलदार, मोठे सरकारी अधिकारी असतील ज्यांच्या कारकिर्दीत एसटी चे खूप मोठे योगदान आहे. आज मात्र ..एसटी….आगारात धुळ खात पडून आहे याचे वाईट वाटत आहे.
न चुकता, न थकता धावते ती आपली एसटी, लालपरी, लालडब्बा..एक प्रवासी असो की दहा की चाळीस. एसटी बस वेळेवरच निघणार हे नक्की. आजही हा नियम मोडला नाही तिने. ग्रामीण भागातील रस्ते त्या वेळीही खराबच होते आजपण परिस्थितीत फारसा फरक नाही पण ती लालपरी आधीपण आणि आजपण ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी आहे. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, काॅलेज मध्ये शिकणारे मुलं, ग्रामीण भागात राहून ,परिवारातील सदस्यांना शहरात शिक्षणासाठी ठेऊन. दररोज/ आठवड्यात एकदा येणेजाणे करणारे कर्मचारी सर्वांची सोय, माफत दरात पास काढून करणारी आपली ती एसटी. मला आठवते मी काॅलेज मध्ये असताना ग्रामीण भागातील काही मुले होती त्यांचे दोन वेळचा जेवणाचा डब्बा हा एसटी मधून येत असतं. आताच्या जनरेशन ला कदाचित हे खरे वाटणार नाही.  पटणार नाही….पण तो एक काळ होता.
अहो प्रियसीला भेटायला जसा प्रियकर परिस्थितीवर मात करून जातो ना तशी ही एसटी आजही ऊन वारा पाऊस, खराब रस्ते सगळा त्रास सहन करत आपल्या सामान्य जनतेला  भेटायला जाते. खरच ती एक कौटुंबिक सदस्यच आहे..
एसटी संपावर आता तोडगा निघणे आवश्यक
लोकांकडे खाजगी वाहने आहेत म्हणून कदाचित आज सामान्य माणूस संप असताना देखील शांत आहेत. लाॅकडाऊन आहे जनता बाहेर पडत नाही, शाळा/ काॅलेज बंद आहेत म्हणून कदाचित एसटी बस बंदची दाह जाणवत नाहीये. पण ह्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहीजे. लालपरी परत रोडवर फिरली पाहीजे. असंख्य गोरगरीब मध्यम वर्गीय शेतकरी यांची कैवारी आहे ही एसटी. चर्चेतून प्रश्न सुटतात, आता हाही प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून महाराष्ट्रातील दैवत पांडुरंगाच्या व आई तुळजाभवानीच्या चरणी लीन होऊयात. परत एकदा लालपरी दिमाखात फिरताना दिसू देत.                     एकट्या माणसासाठी फिरणारी एसटी
आज ….एकटी पडली आहे.
डाॅ.सचिन नागापूरकर
एक एसटी प्रेमी अस्थीरोग तज्ञ
पुणे
हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका,कर्तव्यावर रूजू व्हा – एसटी कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुंबई : वडाची साल पिंपळला लावा. अशी मागणी आपण करतोय. होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एस टी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील. असे आवाहन महाराष्ट्र एस टी कामगार सेना अध्यक्ष आणि खासदार अरविंद सावंत यांनी एसटी
कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे केले आहे.
अरविंद सावंत यांनी लिहलेले पत्र
प्रिय एस टी तील सुज्ञ कर्मचारी, कामगार बांधवानो, भगिनींनो
जय महाराष्ट्र !! दिवाळी पासून आपण सर्वजण हळूहळू संपात सामील झालात आणि आपल्याच प्रवाशांना ऐन दिवाळीत आपण जे “प्रवाशांच्या सेवेसाठी ” ब्रीद मिरवतो त्या सेवेपासून प्रवाशांना निव्वळ वंचित न्हवे तर वेठीस धरण्याचे काम केले. बांधवानो, भगिनींनो होय हे कबूल आहे की एस टी तील कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. पण, हे माहीत असतानाही आपण नोकरी स्वीकारली.त्यातही आताच कुठे कोरोनाच्या बांधनातून आपण थोडेसे मोकळे होऊन आपली सेवा सुरु झाली. थोडासा महसूल येऊ लागला आणि आपण हा संप केला. अंतर्मुख व्हा, शेजारील कर्नाटक मधे भाजपा चे सरकार आहे. तेथेही एस टी कर्मचाऱ्यांनी याच मागणीसाठी १५ दिवस संप केला. त्याचे काय झाले याची माहिती घ्या हीं विनंती.
तिच भाजपा ची मंडळी इथे आपली माथी भडकवितायत आणि आपण त्यांच्या राजकारणाला बळी पडतोय. कोरोनाच्या संकटात आमच्या काही एस टी कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केले त्यांचा आम्हाला अभिमानच आहे परंतू त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला गेला याचीही आपल्याला जाण असायला हवी.
एव्हडेच न्हवे तर माननीय परिवहन मंत्री नामदार श्री अनिल परब यांनी हजार कोटी रुपयांहूनअधिक अर्थसहाय्य आदरणीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मिळवले म्हणून पुढील पगार मिळाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसे आपले घर तुटपुंज्या पगारावर चालवणे कठीण वाटते तसेच सरकारचेही आहे. तुटपुंज्या उत्पन्नावर एका मागोमाग एक अशी संकटाची मालिका सुरु असतानाही सरकार आपणास मदत करीत आहे.
आपल्या प्राथमिक मागणी नुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून दिला वर बोनसही दिला. पण त्यावर समाधान न मानता आपण सर्वांनी ऐन दिवाळीत सरकार आणि जनतेला वेठीस धरून वि्लिनिकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप करण्याचा जो निर्णय घेतला त्याला संयुक्त कृती समितीतील एकाही संघटनेने पाठिंबा दिलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आंदोलन कुणी सुरु केले. डेपो डेपोना कुणी टाळी ठोकली. त्यांचा एस टी कर्मचाऱ्यांशी काय संबंध. सुरुवातीला हातावर मोजता येतील एव्हडेच डेपो बंद होते. मग भाजपा चे पाडळकर आणि मंडळी पुढे आली आणि त्यांनी आगीत तेल ओतत हे आंदोलन हाती घेतले. भाजपा चे आमदार, स्थानिक पदाधिकारी डेपो डेपोत जाऊन टाळी ठोकू लागली. मग एक दोन अन्य राजकीय पक्षांनीही पोळी भाजण्याचा स्वार्थ साधला. आणि हे आंदोलन पेटवले.
मागील पाच वर्षे भाजपचे सरकार होते. तेव्हा राज्यही आर्थिक संकटात न्हवते मग का नाही वि्लिनिकरण केले. उलट तत्कालीन अर्थमंत्री श्री सुधीर मुंनगंटीवारांनी स्पष्ट सांगितले की वि्लिनिकरण करता येणार नाही आम्ही त्यांना मदत करू शकतो. हे उदगार केव्हाचे आहेत जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती उत्तम होती तेव्हाचे.मग आता जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे त्यात आमच्या हक्काचे जी एस टी चे रु ४००००/- कोटी केंद्र सरकारने आजवर दिलेले नाहीत त्या काळात आपण हीं मागणी रेटतो आहोत हे कुठल्या व्यावहारिक माणसाला पटेल.तेही जेव्हा एस ती च्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असती तेव्हा आम्ही संप केला हे योग्य नाही झाले.
वंदनीय शिवसेनाप्रमुख म्हणायचे हक्क मागताना कर्तव्याला विसरु नका ! याचा आपल्याला विसर पडला.
आम्हाला फोन करणारे,मेसेज करणारे आम्ही शिवसैनिकच आहोत हे सांगतात त्यांच्यासाठी हे बाळकडू!
शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते किती कनवाळू आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे त्यांना आपल्याच कर्मचाऱ्यांचे भले करावे असे वाटत नाही का ?
खरे तर,आपण नोकरी महामंडळाची स्वीकारली आहे सरकारची नाही हे मुळातच विसरलोय. आणि वडाची साल पिंपळला लावा अशी मागणी आपण करतोय. होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एस टी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे  आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे .
जय महाराष्ट्र !!