#aadhar card #aadharcard #Maharashtra #govofindia #Central government #आधार कार्ड – Sinhasan News

आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात-डॉ.मेधा कुलकर्णीं यांची संसदेत लक्षवेधी; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व मजुरांना प्रमाणीकरणात अडचणी
नवी दिल्ली : नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत लोकसभेत बुधवारी खासदार डॉ. मेधा विष्णम कुलकर्णी यांनी सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व ग्रामीण भागातील मजुरांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आधार हा अडथळा नसून सर्वसमावेशक कल्याणाचा मार्गदर्शक साधन ठरला पाहिजे,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत विशेष उल्लेख (लक्षवेधी) करताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, अनेक नागरिकांचे बोटांचे ठसे झिजल्यामुळे, डोळ्यांच्या पडद्यावरील (रेटिनल) समस्या, शारीरिक अडथळे किंवा दीर्घकालीन आजारांमुळे बायोमेट्रिक पडताळणी होत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शन, आरोग्य सुविधा, अगदी बँकिंग सेवांपासूनही वंचित रहावे लागत आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (युआयडीएआय) ‘एक्सेप्शनल एनरोलमेंट’ आणि चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) तसेच ओटीपी-आधारित प्रमाणीकरण यांसारख्या पर्यायी उपाययोजना उपलब्ध असल्या, तरी त्या प्रत्यक्ष पातळीवर प्रभावीपणे अंमलात आणल्या जात नाहीत, असे त्यांनी नमूद केले. “फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना या पर्यायांविषयी माहिती नसते किंवा ते मदत करण्यास अनुत्सुक असतात,” असेही त्या म्हणाल्या.

या उपाययोजना कराव्यात: डॉ. कुलकर्णी

पर्यायी आधार प्रमाणीकरण पद्धतींची मिशन मोडमध्ये अंमलबजावणी, बायोमेट्रिक विसंगतीमुळे कोणताही नागरिक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये याची हमी,जनजागृती मोहीम व तक्रार निवारण यंत्रणा उभारणे, प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमून तातडीने सोडवणूक सुनिश्चित करणे

आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे आताच करून घ्या..
देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे.

आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे. याविषयी स्पष्ट सूचना ‘आधार’ च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आधार अपडेट केल्यास ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे अचूकता वाढेल, असं या सूचनेत म्हटलं आहे.

तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या भागातील आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता किंवा ऑनलाईनही ते अपडेट करता येईल. आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन पद्धतीनं अपडेट किंवा दुरुस्त करता येते याचीच माहिती आता जाणून घेऊया.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in  या वेबसाईटवर जायचं आहे. इथं लॉग इन (Log in) पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे केपचा (Captcha) टाकून सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक एटापासून (OTP) पाठवला जाईल. तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. मग लॉग इन (Log in) वर क्लिक करायचं आहे.

पुढे माय आधार (‘My Aadhar’) नावाचं एक नवीन पेज ओपन होईल. इथं वेगवेगळ्या सेवांची यादी तुम्हाला दिसेल. त्यातील आॉनलाईन अपडेट सर्व्हिस (‘Online Update Services’ ) या रकान्यावर क्लिक करायचं आहे. एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथल्या अपडेट आधार ऑनलाईन (‘Update Aadhar Online’) या रकान्यात क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. इथं आधार अपडेट कसं होतं, त्याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. uidai या पोर्टलवरून तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.

पण, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असेल तर मात्र जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल. आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल, त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचं स्टेटस पाहू शकाल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल आणि एसएमएसद्वारे तुम्हाला तसं कळवलं जाईल, अशा सूचना इथं असतील.

पुढे तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार ‘Proceed to Update Aadhar’ या पर्यायावर क्लिक कराचयं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला नाव, जन्मतारिख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचं आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे. समजा मला पत्ता अपडेट करायची असल्यास ॲडरेस  (address) या रकान्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार ( ‘Proceed to Update Aadhar’ ) या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तिथे Current Details रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल, डिटेल्स टू बी अपडेटेड (Details to be Updated ) या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला ती भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकायचं आहे. एरिया (Area) या रकान्यात गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाकायची आहे. पुढे पीन कोड (Pin Code) टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येतं. पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचं (Post Office) नाव निवडायचं आहे.

सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप (Select Valid Supporting Document Type) या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागपदत्र निवडायचं आहे. त्यानंतर व्ह्युव डिटेल्स ॲंन्ड अपलोड डॉक्युमेंट्स (View details and upload documents )वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून कंटीन्यु टू अपलोड (continue to upload ) वर क्लिक करायचं आहे. हे डाक्यूमेंट अपलोड झालं की नेक्स्ट (next) वर क्लिक करायचं आहे.इथं तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसून येईल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायावर तुम्हाला टिक करून नेक्स्ट ( next) वर क्लिक करायचं आहे.पुढे तुम्हाला 50 रुपये एवढं पेमेंट करायचं आहे. इथल्या सूचनेवर टिक करायचं आहे आणि मग मेक पेमेंट (make payment)  वर क्लिक करायचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.

पेमेंट केलं की ते सक्सेस झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. येथील download acknowledgement वर क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफमध्ये डाऊनलोड होऊन मिळेल. या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवंय, तेही नमूद केलेलं असेल. आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर आधार लेटर तुमच्या पत्त्यावर पाठवून दिलं जाईल.