#balagandharv – Sinhasan News

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब, कलाकारांचा विरोध
पुणे : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून कलाकारांनी याला तीव्र विरोध विरोध केला आहे. राजकारणी मंडळी हे राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहे. पण, आम्ही याला विरोध करणार आहोत, असा पवित्रा कलाकारांनी घेतला आहे.

पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृहच सुरू आहेत. तर काही श्रेयवादावरून राजकारण सुरू असल्याने नाट्यगृह बंद आहे. असाच प्रकार या बालगंधर्व नाट्यगृह मंदिराबाबत होणार आहे आणि अजूनही यासारखी वास्तू कुठेही नाही. त्यामुळे ही वास्तू पाडू नये, असं म्हणत काही कलाकार तसेच सामान्य नागरिकांनी मतं व्यक्त केली आहेत.

सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. नव्या वास्तूत ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांची पार्पिंग व्यवस्था असेल. एक हजार, पाचशे आणि तीनशे अशा आसनक्षमतेची तीन नाट्य़गृहे असणार आहे.

पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. २०१८ साली मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीत हा विषय बाजूला राहिला होता. रंगमंदिर पाडण्यास काहींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आणि अखेर बालगंधर्व पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता याला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

प्रदीर्घ काळानंतर बालगंधर्व मध्ये निनादली तिसरी घंटा
पुणे :  कोरोना महामारीचे काळे ढग दूर सारून नाट्य कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात पुन्हा एकदा इंद्रधनुष्य खुलेल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गो-हे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह  निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून सर्व नाट्यगृह आजपासून सुरु होत आहेत, ह्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणेतर्फे नटराज पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन, माजी नगरसेवक प्रशांत बधे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, अभिनेत्री लीला गांधी आदी सिने-नाट्य सृष्टीतील कलाकार, रंगमंच मागील कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्य़ संख्येने उपस्थित होते.

डाॅ.नीलम गो-हे पुढे म्हणाल्या, कोरोना सारख्या महामारी मुळे गेली दीड-दोन वर्षे सांस्कृतिक क्षेत्र झाकोळले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घडणा-या पुणेकरांना घरात कोंडून घ्यावे लागले. यामुळे कलाकार तर त्रस्त झालेच त्याच बरोबर रसिक पुणेकरांना देखील खूप त्रास झाला. या काळात अनेकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले. लोकांनी  आत्महत्या सारखे पाऊल लावण्यापर्यंत विचार केला. पंरतू हा सगळा नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करायचे आहे.

संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे म्हणाले,  आज केवळ नाट्यगृहाचे द्वार उघडलेले नसू आज
कलाकारांच्या आशचेद्वार उघडलेले आहे. गेली दोनवर्षे नाट्यगृह बंद आणि सांस्कृतिक क्षेत्राला जणूकाही आणिबाणिच लागली होती. तो काळ आता सरला असून आता नव्या उमेदिने नटराजाची सेवा करायची.

अभिनेत्री लीला गांधी कलाकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा दिवस असून आता थांबायचे नाही. भविष्यात कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी परमेश्र्वर चरणी प्राथना आहे. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.