#ChaityaBhoomi – Sinhasan News

दादरला चैत्यभूमी नाव देण्याची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस
मुंबई/पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व आवश्यक सुविधांचे काटेकोर नियोजन करावे. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, त्यासाठी आवश्यक विधिमंडळीय प्रक्रिया आगामी अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारी संदर्भातील आढावा बैठकीत सांगितले.

यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ व ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात सुमारे १५ लाख अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अनुयायांसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि वाहतुकीची पुरेशी व्यवस्था करावी. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. वाढीव खर्चाची तरतूद करून कामाला गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. विविध शासकीय यंत्रणा आणि समन्वय समितीच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असून, अनुयायांच्या वाहनांना टोल सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात येणाऱ्या सुमारे १५ लाख अनुयायांच्या आरोग्य, सुविधा व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.