#corona – Sinhasan News
कोरोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध
मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत ३०० चा टप्पा ओलांडल्याने करोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.
“ज्या पद्धतीने करोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ७० टक्के लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळालेली नाही. अलीकडील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, करोनाची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. १६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरण सुरू झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फ्रन्टलाईन वर्कर, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांपासून १२ वर्षांच्या बालकांची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्यात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांच्या गटातील सर्वाधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच महापालिका निवडणुकींमधील आघाडीबाबत निर्णय : अजित पवार
पुणे : प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच महापालिका निवडणुकींमधील आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
पुणे जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी  झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत कोविड सेंटरच्या अनुषंगानं होत असलेल्या आरोपांवरही चर्चा झाली. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सगळी कामे पारदर्शक पद्धतीनं झाली आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा सत्कार केल्याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांच्या बेमुदत उपोषणाचा इशारा पत्राची सरकारनं दखल घेतली असून प्रधान सचिव वल्सा नायर या अण्णांना भेटणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात रविवारी ४ हजार नवे कोरोना बाधित; पण परिस्थिती नियंत्रणात महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे महापालिका हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ रुग्ण रुग्णालयात आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार, दि. ०९ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : १४,८९०
◆ नवे रुग्ण : ४,०२९ (५,२६,०३५)
◆ डिस्चार्ज : ६८८ (५,०२,०१८)
◆ चाचण्या : १८,०१२ (३९,७७,३८१)
◆ मृत्यू : १ (९,१२७)
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे राज्य सरकारचे सुधारित आदेश
मुंबई : राज्य सरकारने शनिवारी जाहिर केलेल्या नियमात बदल केले असून जिम आणि ब्युटी सलून हे हेअर कटिंग सलून प्रमाणे  या आस्थापना ५० % क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने नव्याने परिपत्रक काढून जाहिर करण्यात आली आहे.
हा नवीन आदेश कोणताही नवीन आदेश जारी होईपर्यंत अंमलात राहील. ब्युटी सलून हे हेअर कटिंग सलूनसह गटबद्ध केले जातील आणि नमूद केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून 50% क्षमतेसह खुले राहण्याची परवानगी आहे. ब्युटी सलून,हेअर कटिंग सलून मध्ये मुखवटे (mask) काढण्याची परवानगी नसेल.
जिम साठी हे आहेत नियम
या सेवा वापरण्याची परवानगी आहे. काम करणारे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केले जातील. मास्क वापरण्याच्या अधीन असताना 50% क्षमतेसह जीम सुरू ठेवण्याची परवानगी आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच ते वापरण्याची परवानगी असेल सेवे मध्ये असलेले सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले हवे.
भारतात लसीकरणाने पार केला 150 कोटी डोसचा टप्पा
देशाला डोस संख्येतील 100 ते 150 कोटीपर्यंतचा पल्ला  गाठण्यास अवघा अडीच महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे एकीकडे करोना संकट पुन्हा गडद होऊ लागले असले; तरी दुसरीकडे लसीकरण मोहिमेने वेग घेतल्याचे सूचित होत आहे. देशातील 91 टक्के प्रौढांना (18 वर्षांवरील) आतापर्यंत करोनालसींचा किमान एक डोस मिळाला आहे. तर, 66 टक्के प्रौढांना दोन डोस देण्यात  आले आहेत.
सरलेल्या वर्षात फक्त प्रौढांचे लसीकरण करण्यात आले. नववर्षात (3 जानेवारीपासून) 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत देशातील संबंधित वयोगटातील 22 टक्के मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. आता 10 जानेवारीपासून देशात बूस्टर (प्रीकॉशन) डोस देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतील.
पुण्यात दिवसभरात १,१०४ रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली
पुणे  : शहरात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एका दिवसात दुपटीहून अधिक वाढली असून १ हजार १०४ नवे कोरोना संक्रमित रुग्ण महापालिकेच्या दैनंदिन अहवालात नोंदविण्यात आले आहेत.
शहरातील रुग्णांची संख्या एका दिवसात दुपटीने वाढल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. दि. ३ जानेवारी रोजी ४४४ दैनंदिन रुग्ण नोंदविले गेले होते. ४ तारखेला ही संख्या दुप्पट झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची स़ख्या ३ हजार ७९० पर्यंत जावून पोहोचली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून १५१ पूर्ण बरे झाले आहेत, असे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे. तसेच, दिवसभरात ६ हजार८१९ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.
पुण्यातील १ ली ते ८ वी पर्यंतची शाळा ३० जानेवारी पर्यंत बंद – महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईनंतर आता पुणे शहरांतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईनंतर आता पुण्यातीलही सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित महापालिकेच्या आढावा बैठकीत समोर आली माहिती
पुणे : पुण्यातून कोरोना संदर्भातली एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.
27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचंही समजतंय. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.
गेल्या 8 दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचंही महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे.जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन केलं असून गरज भासल्यास सुरु होणार, असंही ते म्हणालेत. तसंच 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून क्वारंटाईनसाठी पुन्हा हॅाटेल सुरु करणार असल्याचंही ते म्हणालेत. तसंच लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचण यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाणार असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
राज्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे संकटही आणखी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी आजपासून  15  ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोवीनवर नाव नोंदणी करता येते. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही लस देण्याची सुविधा करण्यात आली आहे. पुण्यासह पूर्ण राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.
आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने लसीसाठी नाव नोंदवता येणार आहे. ज्या मुलांचा जन्म 2007 साली किंवा त्यापूर्वी झालेला आहे, ही मुलं लस घेण्यास पात्र आहेत. 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लस दिली जाणार नाही. मुलांकडे शाळेचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे अनिवार्य आहे.
एकच मास्क अनेकदा घातल्याने होऊ शकतात अनेक आजार
पुणे : एकच मास्क आणि अस्वच्छ मास्क जास्त वेळ घातल्याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात, असा इशारा तज्ञांकडून देण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क अत्यंत गरजेचा असला तरी योग्य प्रकारचा म्हणजेच स्वच्छ असणेही गरजेचे आहे.  अस्वच्छ मास्कमुळे तुम्हाला घसा खवखवणे, पोटाशी संबंधित समस्या आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. जर तुम्ही कपड्यांचे मास्क घालत असाल तर हा मास्क जास्तीत जास्त तीन महिने घालू शकता. मात्र त्यानंतर मास्क बदलणे गरजेचे आहे. त्याच वेळी, डिस्पोजेबल N95 मास्क दर दोन महिन्यांनी बदलले पाहिजेत.
जर तुम्ही सर्जिकल थ्री लेयर मास्क घातलात तर तुम्ही हा मास्क तीन ते चार तासांत बदलू शकता. याशिवाय पुन्हा वापरता येणारा मास्क दोन महिन्यांनी बदलावा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मास्क फक्त पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा घालणे योग्य नाही. मास्क स्वच्छ करण्यासाठी, प्रथम कोमट पाण्यात 10 मिनिटे बुडवा. नंतर मास्क साबणाने स्वच्छ करा. यानंतर, मास्क काही तास कडक सूर्यप्रकाशात ठेवा. जेव्हा मास्क सुकतो तेव्हा तो घरात अशा ठिकाणी ठेवा जेथे तुम्ही  पुन्हा पुन्हा स्पर्श करणार नाही.