dipali dhumal – Sinhasan News
जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने मनस्ताप
पुणे : पुणे महानगरपालिकेचे जन्म व मृत्यू दाखले देणे व नोंद ठेवणे यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत स्वतंत्र जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. पण सध्या या यंत्रणेकडून  वेळेत जन्म व मृत्यू चे दाखले मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या संदर्भात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून याबाबत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. धुमाळ यांनी म्हंटले आहे की मार्च २०२०  पासून जन्म व मृत्यू दाखले नागरिकांना वेळेत मिळत नाहीत असे निदर्शनास येत आहे. यावर माहिती घेतली असता प्रशासकीय कामकाजासाठी सेवक वर्ग नाही अशी माहिती सांगितली जात आहे. परिणामी नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मृत्यू होऊन ६ महिने उलटले तरी मनपाकडे याबाबत नोंद नाही.  नागरिक कार्यालयात दाखले मिळावे म्हणून गर्दी करतात परंतु त्यांचे निराकरण न करता अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
वास्तविक जन्म व मृत्यू यांच्या नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय संगणकीय यंत्रणा उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार व वेळेत काम पूर्ण न करण्याच्या धोरणामुळे जन्म व मृत्यू कार्यालयात रांगा लागत आहेत . याबाबत जन्म व मृत्यु नोंदणी विभाग प्रमुख व संबंधित काम करणारे अधिकारी व कर्मचारी वेळेत काम करत नसल्याची  माहिती घेऊन आवश्यकता वाटल्यास कर्तव्यात कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
लायगुडे हॉस्पीटल मधील बंद केलेले स्वॅब टेस्ट सेंटर सुरू करा
लायगुडेमध्ये ऑक्सिजन बेड्स सुरू करण्याची मागणी
पुणे : शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता सिंहगड रोडवरील पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे हॉस्पीटल मधील बंद करण्यात आलेले कोरोना स्वॅब टेस्ट सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे तसेच ओपीडी व उपलब्ध असलेल्या खोल्या मध्ये ऑक्सिजन बेड्स सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे.  सिंहगड रस्त्यावर लोकमत कार्यालयाजवळ पुणे मनपाचे प्रशस्त व भव्य इमारती मध्ये लायगुडे हॉस्पीटल आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या ठिकाणी या परिसरातील नागरिकांसाठी कोरोना स्वॅब टेस्ट सुरू करण्यात आले होते.  त्यामुळे हजारो नागरिकांची स्वॅब टेस्ट ची व्यवस्था झाली होती. परंतु हे सेंटर आता बंद केल्याने आजु बाजूच्या परिसरातील  नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना पु. ल. देशपांडे उद्यानात स्वॅब टेस्ट साठी जावे लागत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
प्रशासनाचा हे सेंटर बंद करण्यामागचा उद्येश काय हे समजत नाही. या हॉस्पीटल मध्ये सर्व सुविधा असताना कोणाच्या सांगण्या वरून व कशासाठी हे सेंटर बंद केले आहे असा प्रश्न ही ही उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.
हा परिसर शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या मोठी आहे.  या हॉस्पीटलमध्ये रुग्णांसाठी कोरोना साठी आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स व आवश्यक असणारी सुविधा हॉस्पीटल सुरू करणे गरजेचे आहे. आज पुणे शहरात व उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आवश्यक बेड्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत या हॉस्पिटलच्या इमारतींमधील खोल्यामध्ये अद्ययावत कोविड सेंटर त्वरीत सुरू करावे. त्याच बरोबर ताबडतोब जे स्वॅब सेंटर बंद केलेले आहे ते  सुरू करण्यात यावे.  संबधित अधिकाऱ्यांना याबाबत सुचना द्याव्यात अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा : धुमाळ
पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आहोरात्र या रुग्णांवर डॉक्टर, नर्सेस यांच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. इतर कर्मचाऱ्यांची त्यांना मदत मिळत आहे. परंतु डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
संपूर्ण जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले असून पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रुग्णांना सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, सेंटर हॉस्पिटल व आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांना महापालिकेकडून वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
इतर मनपा सारखे त्यांना जादाची पगारवाढ, वैद्यकीय सेवा,  पगारी रजा देणे, अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना विमा संरक्षण,भत्ता आदी त्यांच्या मागण्या बाबत तातडीने विचार करावा असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर उभा करावे. धुमाळ
दिपाली धुमाळ यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर  छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय सुरू झाले आहे. शेकडो कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्या देखील सुरू झाल्या आहेत त्यामुळे औद्योगिक कंपन्या मधील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने कामानिमित्त बाहेर पडत आहे. सद्य परिस्थितीत कंपन्यांमध्ये देखील कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. सध्या पुणे शहरात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे बेड मिळणे देखील मुश्कील आहे.  त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.
धुमाळ यांनी यासंदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, पुणे शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कोरोना बाधित रूग्णांना वेळेत हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे प्राण गेले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आवश्यक हॉस्पिटलची संख्या  कमी आहे.
प्रत्येक कंपनी मध्ये शेकडो च्या संख्येने कामगार वर्ग आहे. कोरोना बाधित कामगारांना हॉस्पीटल व उपचार वेळेत मिळत नसल्याने  अनेक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा धोका जर कमी करायचा असेल तर काही ठराविक कर्मचारी असलेल्या कंपनीने आपल्या कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या कंपनीच्या आवारातच विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्स असलेले कोविड सेंटर उभा करावे व त्याठिकाणी आवश्यक असलेला स्टाफ डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशन व हॉस्पीटल साठी लागणारा कर्मचारी वर्ग त्याठिकाणी ठेवावा. जेणेकरून कंपनीमधील कोरोना बाधित कर्मचारी वर्गावर त्वरीत उपचार होतील.
काही कंपन्यांची अशा प्रकारे विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, तात्पुरते रुग्णालय उभारण्याची तयारी देखील आहे .अशा प्रकारे ज्या कंपन्या हॉस्पिटलची व्यवस्था करतील त्यांना केंद्र शासन, राज्यशासन किंवा महानगरपालिका  स्तरावरून विशेष सवलत व मदत करावी. या संदर्भात आवाहन करून अध्यादेश काढावा, अशी मागणी धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
अनुकंपा व रोजंदारी सेवकांना कामावर रुजू करा : धुमाळ
पुणे : पीएमपीएमएल मधील अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवक आदेशानुसार  गेले ६ महिन्यापासुन घरी आहेत. अनुकंपावरील रोजंदारी सेवकांमध्ये बहुतेक कर्मचारी ह्या महिला आहेत . काम बंद असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करुन या सेवकांना कामावर रुजु करुन घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पीएमपीएमएल चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
सहा महिने काम नसल्याने वेतनही नाही. काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात , मुलांचे शिक्षण व इतर घर  खर्चामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावाखाली जगाव लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा विचार केला जावा असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
कारोना च्या पार्श्वभूमीवर शहरातील पीएमपीची प्रवासी सेवा बंद असताना बदली व रोजंदारीवरील चालक, वाहक कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला होता.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता बस सेवा सुरू झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन रोजंदारीवरील चालक वाहकांना कामावर रुजु केल्याबद्दल धुमाळ यांनी जगताप यांचे अाभार मानले आहेत. या निर्णयामुळे या सेवकांच्या हाताला काम मिळाले व त्यांना जीवन जगण्यासाठी उभारी मिळाली आहे. अशाच प्रकारे अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवकांचा ही विचार करून त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
पुणे पालिकेच्या विरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
पुणे:  निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन आणि आता पत्रकार पांडुरंग रायकर तसेच पुणे शहरातील अनेक नागरिकांना उपचार व  रुग्णवाहिका यासंदर्भात येणाऱ्या अडचणीतून जीव गमवावा लागला आहे.  सातत्याने पुणे महानगरपालिकेकडे यंत्रणेत सुधारणा आणण्याच्या सूचना करून, निवेदनाद्वारे मागणी करून देखील कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. यापुढे जर योग्य उपाय योजना अंमलात आल्या नाहीत. तर राष्ट्रवादी काँगेस पार्टीकडून पुणे शहरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भातील पत्र खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, यांच्याकडून पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
पत्रात म्हंटले आहे की, याआधी टेस्टींग बाबतीत होणारा हलगर्जीपणा, विलगीकरण कक्षांमधील गलथान कारभार तसेच खाजगी हॉस्पिटलकडून होणारी लूट आणि आता जम्बो हॉस्पिटल मधील यंत्रणेतील निष्काळजीपणा हे सर्व पाहता पुणे हे कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे आज पुन्हा एकदा आधोरेखित झाले आहे.
पुण्यात कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढीला लागल्यापासून एक लोकप्रतिनिधी या नात्याने झालेल्या महत्वाच्या बैठकीत वारंवार आम्ही प्रशासनाला नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विविध सूचना केल्या. परंतु दुर्दैवाने त्यावर अनेक मुद्यावर सकारात्मक अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. साधे बैठकांचे इतिवृत्त किंवा कार्यवाही अहवालाची माहिती देखील लोकप्रतिनिधींना पुरवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी , डॉक्टर आणि इतर कर्मचारी पिडीत रूग्णांसाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी महापालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही हे वास्तव आहे . प्रशासनाची अकार्यक्षमता व योग्य समन्वयाच्या  अभावामुळे वारंवार समस्या उद्भवत असल्याचे दिसत आहे . आजतागायत परिस्थितीत सुधारणा नाही – आज ही रुग्णवाहिका यंत्रणा आणि डॅशबोर्डचा अपयशीपणा अनुभवायला मिळत आहे. तर दुसरीकडे ॲाक्सिजन व व्हेंटिलेटरच्या अभावामुळे होणारे मृत्यू, विलगीकरण कक्षेतील विविध समस्यांमुळे रूग्णांची होणारी हेळसांड, वैद्यकीय सेवेवर येणारा अतिरिक्त ताण … हे विदारक चित्र पुण्याचे आहे. आम्हां लोकप्रतिनिधींची मदत घ्या. असे प्रशासनाला सांगून देखील पूर्वीच्या आयुक्तांनी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. याची फार मोठी किंमत शहराला मोजावी लागत आहे.
कोरोनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे सादरीकरणाच्या माध्यमातून आश्वासक चित्र प्रशासनाकडून रंगवले जाते. परंतु याव्यतिरीक्त सर्वांनी सांघिक प्रयत्न करण्याची व लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे. प्रशासकीय नियंत्रणाच्या आभावामुळे आता अजून किती जीव जाणार ?? असा प्रश्न दिलेल्या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.
रोजंदारीवरील चालक-वाहक होणार कामावर रुजू
पुणे : आजपासून पीएमपीएमएल बस सेवा सुरू झाली असून त्यामुळे गेले पाच महिने बेरोजगार झालेल्या व आर्थिक अडचणीत आलेल्या पीएमपीएमएल मध्ये बदली व रोजंदारी वर असलेल्या चालक वाहकांना आता आधार मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांकडून या अगोदरच आगार प्रमुखांना बदली हंगामी रोजंदारी वाहनचालकांना कामावर रुजू होण्यासंदर्भात कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत.
गेले पाच महिने बस सेवा बंद असल्याने ह्या रोजंदारी वरील चालक-वाहकांना समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र आता काम सुरू झाले असल्याने त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत. पीएमपीएल बस सुरू होण्याच्या अगोदर पासूनच विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी बस सेवा सुरू झाल्यानंतर या रोजंदारीवर असलेल्या चालक-वाहकांना कामावर रुजू घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
या बाबतीत धुमाळ म्हणाल्या की, काम नसल्याने रोजंदारीवरील चालक-वाहक आर्थिक विवंचनेत होते. बस सेवा सुरू झाल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे आपण या चालक – वाहकांना बस सुरू झाल्यावर कामावर घ्यावे असा आग्रह धरला होता व त्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश ही आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना ला अटकाव करण्यासाठी जी यंत्रणा तयार करण्यात आली आहे त्यामधील संगणकीय व सर्व्हे कामासाठी महामंडळातील कायम वाहन वर्कशॉप सेवक दोन्ही महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. आजपासून २५ टक्के बस सेवा सुरू होत असल्याने ती सुरळीत चालण्यासाठी बदली हंगामी रोजंदारी चालक वाहक यांची मदत होणार आहे.