#Dr.khankhoje – Sinhasan News

रणझुंजार थोर क्रांतिकारक आणि श्रेष्ठ कृषितज्ञ डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे
पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८६ रोजी वर्धा पूर्वीचे पालकवाडी येथे झाला. वडील सदाशिव
खानखोजे हे अर्जन्वीस होते. पांडुरंग हा सर्वात मोठा मुलगा शंकर आणि राम ही दोन लहान भावंडे आणि सुंदरी एक बहीण होती. पांडुरंगचे सुरुवातीचे शिक्षण वर्ध्याच्या इंग्लिश मिडल स्कूल मधे झाले.

महादेव गोविंद आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या अत्यंत प्रभावशाली व्याखानांचा प्रभाव पांडुरंगवर पडला. १८९६मधे शाळकरी विद्यार्थी असतांना बाल समाज नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली दर रविवारी त्यांचे बाल मित्र भारताचा इतिहास जाणून घेत भारताच्या इतिहासा बरोबर ते अब्राहम लिंकन यांचे लिखाण अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणी शिवाय इटालियन विचारवंत आणि क्रांतिकारक म्याझींनी आणि ग्यारीबाल्डी यांचे लिखाण आणि कार्य ते अभ्यासत.

लोकमान्य टिळकांचे ब्रिटिश सरकारवर टीका करणाऱ्या लेखांमुळे टिळकांविषयी असलेल्या भक्तीभावात वाढ झाली. पांडुरंग च्या भावी कृतींमागे लोकमान्य टिळक ही सर्वाधिक प्रभावी प्रेरणा ठरली. १९०१ मधे प्राथमिक शिक्षण आटोपून पांडुरंग नागपूरला नील सिटी हायस्कूल ला दाखल झाला पुढे वडिलांनी पांडुरंग च्या विवाहाचा घाट घातला पण पांडुरंग ने सपशेल नकार देऊन जवळच्याच हनुमान मंदिरात भारत स्वतंत्र होई पर्यन्त लग्न
न करण्याची शपथ घेतली.

मित्रांबरोबर बरीच खलबते झाल्यावर असे ठरले की, लष्करी प्रशिक्षण घेतल्याखेरीज ध्येय साध्य होणार नाही. अखेर पांडुरंग ने गुरु लोकमान्य टिळक यांना भेटण्याचे ठरवले. डॉ. रामदास परांजपे खानखोजे परिवाराचे मित्र यांचे कडून टिळकांचे नावे शिफारस पत्र मिळविले. पांडुरंग च्या या अश्या अनेक प्रसंगांमुळे घरच्यांनी पांडुरंगशी संबंध तोडले होते त्यामुळे तो गंभीर आर्थिक संकटात होता .१९०५ मधे अखेर आप्पासाहेब हळदे यांचेकडून पैसे घेऊन पुण्याला टिळकांची भेट घेतली बऱ्याच चर्चेनंतर असे ठरले की जपान हे लष्करी प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण असू शकते. लष्करी प्रशिक्षणासाठी परदेशी जावे आणि सांकेतिक लिपीत टिळकांशी संपर्कात राहावे हा गुरुमंत्र घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. पांडुरंग ने अथक प्रयत्न करून कोलंबोला जाणाऱ्या एका जहाजावर हरकाम्या म्हणून काम मिळवून १९०६ साली भारत सोडला पांडुरंग यानंतर चार दशकाहून अधिक काळापर्यंत भारतात परतले नाहीत अगदी तरुण वयातच स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्यासाने पांडुरंग खानखोजे यांना कित्येक अग्निदिव्यांना तोंड द्यावे लागले.

ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी या क्रांतिकारकाच्या भोवती जाळे टाकले पण तत्पूर्वीच मोठ्या हिकमतीने ते परदेशात गेले. एका देशातून दुसऱ्या देशात त्यांची वणवण अखंड चालू राहिली पण मायभूमीला स्वतंत्र करण्याचे ध्येय मात्र अढळ होते जपान मधे लष्करी शिक्षण घेत असताना ते चीनी क्रांतीकारकांना इंग्रजी शिकवायचे व त्यांच्या उदरनिर्वाहाचे पैसे मिळवायचे याच वेळी त्यांची डॉ. सन येत सन यांच्या भेट झाली अशाच एका भेटीत देशाच्या विकासात शेतीचे महत्व किती आहे हे विशद केले आणि खानखोजेंनी शेती शास्त्र शिकावे असे सुचवले १९०७ साली त्यांनी सन फ्रान्सिस्को ला प्रयाण केले. १९०८ साली त्यांनी बरक्ले विद्यापीठात शेती अभ्यासक्रमासाठी नोंदवले.

अमेरिकेत स्थायीक झालेल्या भारतीय क्रांतीवादद्यांनी इंडिया इंडिपेंडन्स लीग ही संघटना सुरू केली. डॉ. खानखोजे हे या संघटनेचे प्रमुख संस्थापक होते. याच दरम्यान त्यांना राफेल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकेडेमी ची माहिती मिळाली व प्रयत्न करून तेथील लष्करी अभ्यास देखील सुरू ठेवला भारतीय स्वातंत्र्य संघाचे प्रचार कार्य त्यांनी प्रभावी पणे पार पाडले हा स्वतंत्र संघच पुढे म्हणजे १९१३ मधे गदर’ नावाने विश्वविख्यात झाला. गदर पक्षाच्या प्रहारक या संस्थेचे डॉ. खानखोजे हे प्रमुख होते.

१९११ मधे त्यांनी कृषिशास्त्रातील बी एस सी ही पदवी प्राप्त केली . १९१३ साली ते एम एस सी झाले व पुढील प्रवास सुरू ठेवला गदर पक्षाचे कार्य इंग्रजांचे दृष्टीने घातक असल्याने ब्रिटिश शासनाने अमेरिकन सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लाला हरदयाळ यांना अमेरिकन सरकारने अटक करताच
डॉक्टर खानखोजे हे अमेरिकेला राम राम ठोकून ग्रीस ला गेले व तेथून ते बर्लिन ला पोहोचले जर्मनीत गदरच्या प्रेरणेने बर्लिन कमिटी ची स्थापना झाली होती व भारतात चहू बाजूने क्रांति भडकविणे हा या कमिटीचा हेतु होता. जर्मनीतून भूमार्गाने त्यांनी बलुचिस्तान गाठले तेथील जनतेत ब्रिटीशांविरुध्ह असंतोष निर्माण करणे जर्मनीतून तुर्कस्थानमार्गे त्या जनतेला शस्त्रांचा पुरवठा करणे इत्यादि कामे करण्याची जबाबदारी डॉक्टर खानखोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारली होती .पांडुरंग ने युद्धशास्त्राचा अभ्यास केला स्फोटके बनविण्याचे शिक्षण घेतले
समविचारी तरुणांचा शोध घेत जगभर फिरले जहाल मतवादी गदर पक्षाचे संस्थापक बनले.

अनेक संकटे झेलली आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी जपान, अमेरिका, जर्मनी, परशिया, रशिया असे करत पुढे मेक्सिकोत गेल्यावर १९२४ मधे त्यांनी कृषि विषयातील डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्योत्तर काळात देशाची सेवा करता येण्यासाठी कृषि शास्त्राची निवड करून अभ्यास केला देश स्वातंत्र्यासाठी हाती घेतलेली शस्त्र बाजूला ठेऊन मेक्सिकोच्या कृषि क्रांतीतसक्रिय सहभाग घेतला तिथल्या शास्त्रीय संशोधनसूचित आवर्जून नोंदवली जाईल एवढी कामगिरीही त्यांच्या हातून पार पडली जपान मधली शेतीपद्धती, अमेरिकेत शिक्षण घेत वेगळ्या शेतावर घेतलेले अनुभव मेक्सिकोतील विविध प्रयोग कृषि प्रयोगशाळा उभारून मेक्सिकन इंडियन
शेतकऱ्यांना “हरितक्रांतीचा” नवा दृष्टीकोन दिला.

मृत्युची टांगती तलवार डोक्यावर सदैव लटकत असल्यामुळे डॉक्टर खानखोजे यांना भारतात येणे शक्यच नव्हते युरोपातील प्रगत देशांना ते भेटी देत वेग वेगळ्या देशांना भेटी देणे सुरूच होते याच निमित्ताने ते स्पेन ची राजधानी माद्रीद गेले असताना त्यांचा एका बेल्जियम कुटुंबाशी परिचय झाला व त्या कुटुंबातील जेनी सिडिक या युवतीशी १९३६ साली त्यांचा विवाह झाला. जेनी ची पुढे ही जानकी झाली सावित्री आणि माया या दोन मुलींचे
जनकत्व डॉक्टर खानखोजे यांना लाभले.

आपल्या आई वडिलांना भेटण्याची प्रबळ इच्छा असूनही ते येऊन भेटू शकले नाहीत कारण तेथील नागरिकत्व मिळाले होते आणि इकडे ब्रिटिशांची नजर त्यांच्यावर होती मध्यप्रांत चे कृषि मंत्री रा कृ पाटलांनी त्यांना आमंत्रित केले. १९५६ मधे मेक्सिकोतील घरदार जमीन विकून डॉक्टर खानखोजे कुटुंबासह भारतात आले. नागपुर विद्यापीठ वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती दुर्दैवाने त्यांच्या कृषिविषयक तज्ञतेचा योग्य
तो लाभ भारत सरकारने व राज्यसरकारने करून घेतला नाही. सारे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्यासापाई ज्याने उघड्यावर टाकले होते त्याची इतकी उपेक्षा स्वतंत्र भारतात व्हावी ही एक शोकांतिकाच म्हटली पाहीजे शेवटी नागपूर येथेच दिनांक १८ जानेवारी १९६७ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले व एका वादळी जीवनापूर्ण मिळाला.

संकलन : दिलीप खानखोजे पुणे