#janganana #punenews #pmcpune – Sinhasan News

पुणे महापालिकेकडून जनगणना २०२७ प्रथमच होणार स्व- गणना व डिजिटल गणना; जाणून घ्या कशी होणार स्व- गणना…
पुणे : भारताची जनगणना २०२७ प्रथमच होणार स्व- गणना व डिजिटल गणना भारताची जनगणना ही जगातली सर्वोत्तम जनगणना पैकी एक असून तिला समृद्ध परंपरा लाभली आहे ती जगातील सर्वात मोठ्या उपक्रमापैकी एक आहे भारतात पहिली जनगणना इसवीसन १८७२ मध्ये करण्यात आली होती ती देशाच्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली होती.

सन १९८१ मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली सन १९८१ पासून जनगणना ही दर १०वर्षांनी करण्यात येत असून सन २०२७ ची जनगणना ही या शृंखलेतील १६ व जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची ८ वी गणना आहे. भारताची जनगणना २०२७ चे पुणे महापालिका क्षेत्रातील कामकाजहे दोन टप्प्यात होणार असून घरांची यादी व घरांची गणना हे पहिल्या टप्प्याचे कामकाज दिनांक १ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.

यंदाच्या जनगणनेत नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी https://Se.census.gov.in ह्या स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली असून महाराष्ट्रासाठी ते दिनांक १ मे ते १५ मे २०२६ कालावधी करिता उपलब्ध राहील. नागरिकांना आपली माहिती स्वतः भरता येणार आहे. स्वगणनेत दिनांक ०१ मे २०२६ ते दिनांक १५ मे २०२६ या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

प्रथम नागरिक रजिस्ट्रेशन करून विचारलेल्या ३४ प्रश्नांची माहिती भरून ती सबमिट केल्यानंतर नागरिकांना Self Enumeration D (SE ID XXXXXXXXXXX ) जनरेट होणार असून तो SMS अथवा Email id व्दारे प्राप्त होईल. सदर SE ID नागरिकांनी जतन करून ठेवावा व दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत येणारे जनगणना अधिकारी / प्रगणक यांना घरांना भेट देतेवेळी उपलब्ध करून देण्यात यावा.

जनगणना २०२७ या गणनेत प्रथमच मोबाईल ॲप व्दारे डिजिटल माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गटातील प्रत्येक घरांना दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत भेट देऊन माहिती संकलित करतील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असेल.

दुसऱ्या फेरीचे कामकाज हे माहे फेब्रुवारी २०२७ मध्ये केले जाईल. जनगणना आजच्या डिजिटलच्या युगात भारताच्या संचालनालया कडून नागरिकांना त्यांची पहिल्या टप्प्यातील घरयादी व घराची गणना संबंधित माहिती थेट online माध्यमातून गोपनीयरित्या भरून भारताच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आकडेवारी देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकर नागरिक बंधू भगिनी यांनी स्वगणनेत दिनांक ०१ मे २०२६ ते दिनांक १५ मे २०२६ या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तसेच अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.