#japan – Sinhasan News
दिल्ली: जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज सायंकाळी भारतात दाखल होणार आहेत . या दौऱ्यात ते भारतासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध आणि चीन सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान फुमिओ किशिदा हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असल्याने या त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. किशिदा यांचा हा पहिला दौरा आहे. आज संध्याकाळी त्यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सोबत बैठक होणार आहे,
नंतर दोन्ही नेते माध्यमांसमोर संवाद साधणार आहेत. भारत आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये तब्बल साडेतीन वर्षांनंतर बैठक होणार आहे. जपान सध्या भारताला शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करत आहे. याशिवाय जपानच्या मदतीने भारतात बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. जपानचे पंतप्रधान दोन दिवस भारतात असतील.
भारत आणि जपान यांच्यातील ही १४ वी शिखर परिषद आहे जी साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर होणार आहे. किशिदा यांनी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी जपानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या भेटीदरम्यान किशिदा आणि पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील.
जपानी वृत्तसंस्था निक्केईने दिलेल्या वृत्तानुसार, किशिदा भारताला २.५ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या निर्णयावर सहमती देऊ शकतात. जपानचे पंतप्रधान भारतात जपानी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत मोठी घोषणा करू शकतात. शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान असताना २०१४ मध्ये त्यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला होता. शिंजो आबे यांनी ३.५ ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता किशिदा हे ५ ट्रिलियन गुंतवणुकीची घोषणा करू शकतात.