#khopoliPolice – Sinhasan News

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न करायला निघालेल्या तरुणाचे पोलिसांनी वाचवले प्राण
खोपोली : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कारने निघाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याचे प्राण वाचवले. बोरघाट पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली असून पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

शनिवारी (१५ मार्च) पहाटे सुमारे ३.०५ वाजण्याच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या डायल ११२ वर एक कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राने क्रेटा कार (क्रमांक MH-12/Y-4224) घेऊन इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या करण्यासाठी निघाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याकडून बोरघाट येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले.

यानंतर बोरघाट येथील डी.डी. पथकातील पोलीस शिपाई सचिन घोरपडे यांनी तात्काळ माहिती बोरघाट व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केली. प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तरुण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

बोरघाट पोलीस मदत केंद्रातील अंमलदार पोलीस हवालदार अमोल कांबळे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड आणि पोलीस शिपाई नाशिर शेख यांनी सतर्कतेने जवळपास दीड तास महामार्गावर लक्ष ठेवून शोध सुरू ठेवला. अखेर अमृतांजन ब्रिज परिसरात संबंधित वाहन अडवण्यात पोलिसांना यश आले. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय सुदाम दंडवते (वय २३, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) असे सांगितले. डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार तोच तरुण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी आपुलकीने संवाद साधून त्याला शांत करून घातक इराद्यापासून त्याला परावृत केले.

प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या आदेशानुसार बोरघाट पोलीस मदत केंद्राच्या शासकीय वाहनातून त्या तरुणाला खोपोली पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढे खोपोली पोलीस ठाण्याकडून प्रभारी अधिकारी सचिन हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तरुणाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले असून याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेत बोरघाट पोलीस पथकाने दाखवलेल्या सतर्कता आणि तत्परतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचले असून प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील तसेच पोलीस कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.