#kravenagar – Sinhasan News

“मावळे, जिजाऊ आणि बालशंभूरायांच्या रूपातून इतिहास झाला जिवंत!”
कर्वेनगरमध्ये मोरया मित्र मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साही वातावरणात साजरी

पुणे : धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि हिंदवी साम्राज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोरया मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत भक्तीभाव, अभिमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसर “जय शिवराय… जय शंभूराजे…”च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि प्रत्येकाच्या मनात इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा जागा झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याते मोहनराव शेटे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाली. काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या शिवव्याख्यानात मोहनराव शेटे यांनी संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान यांचा इतिहास जिवंत करून दाखवला. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि भावनेचे अश्रू तरळले.

या जयंती महोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा. चिमुकल्या मुलांनी मावळे, राजमाता जिजाऊ, बालशिवबा आणि बालशंभूराजे यांची वेशभूषा साकारत इतिहास जणू प्रत्यक्ष उपस्थित केला. त्या निरागस चेहऱ्यांवर दिसणारा स्वराज्याचा अभिमान पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. पालकांनी आपल्या मुलांचे कौतुक करत मोबाईलमध्ये हे अविस्मरणीय क्षण टिपले.

यासोबतच राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या चित्रांमधून आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांविषयीचा आदर आणि इतिहासावरील प्रेम व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नगरसेवक स्वप्नील दुधाने आणि खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा मुकुंद भेलके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका रेश्मा संतोष बराटे, इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य मंगेश नवघणे, संभाजी गावडे, कैलास सरतापे, गजानन कड, संजय गाडे, अनंता केंडे, शिवाजी भोईटे, रामदास राजहंस, बेबी करेकर, मंडळाचे अध्यक्ष अथर्व भरम, उपाध्यक्ष गणेश शिंदे, खजिनदार गणेश गायकवाड, कार्याध्यक्ष अक्षय केसवड, माजी अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक केदार मारणे म्हणाले, “मुलांना इतिहास फक्त पुस्तकांतून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजावा आणि त्यांच्या मनात स्वराज्याचा अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे मुलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत राहू.”

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केदार मारणे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर प्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. रोहिदास जाधव यांनी आभार मानले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा केवळ उत्सव नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात स्वराज्याचा इतिहास, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

– प्रथम क्रमांक : प्रणव शशिकांत जाधव (पलूस, सांगली)
– द्वितीय क्रमांक : अथर्व विठ्ठल गुरव (चंदगड, कोल्हापूर)
– तृतीय क्रमांक : आकांक्षा दलपत चव्हाण (कन्नड, संभाजीनगर)

चित्रकला स्पर्धा (चित्र रंगवणे)

– प्रथम : आराध्य सोमनाथ लांडे
– द्वितीय : श्रीकृष्ण अरुण पवार
– तृतीय : कार्तिक नितीन पाटील
– उत्तेजनार्थ : सई अविनाश मारणे, तेजुल शरद पवार

चित्रकला स्पर्धा (चित्र काढणे)

– प्रथम : अर्थव अनंत सुतार
– द्वितीय : गौरव गोविंद दुब्बे
– तृतीय : आयुषी धर्मेंद्र सिंग

शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा

– प्रथम : काव्या सोमनाथ लांडे
– द्वितीय : हिंदवी गणेश रजपूत
– तृतीय : ओवी नेताजी भोसले
– उत्तेजनार्थ : अंथाग अमृत मारणे (२ वर्षे), शुभ्रा विवेक कोतवाल, सार्थक बालाजी बिरादार