#LegalLiteracy – Sinhasan News

पुण्यात संविधान दिनी कायदे साक्षरतेचा नवा अध्याय! येरवड्यात शाळांमध्ये कायद्याचे धडे; थेट न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांकडून मार्गदर्शन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

पुणे : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार आणि कर्तव्यांसोबतच संरक्षण देणारे विविध कायदे प्रदान केले आहेत. मात्र, या कायद्यांची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकदा नागरिकांना आपल्या अधिकारांपासून वंचित राहावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती आणि प्रबोधनाचे उपक्रम राबविण्यात येणार असून, ज्येष्ठ वकील आणि न्यायाधीश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ४ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘निर्भय विद्यार्थी अभियान’ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथील स्वातंत्र्यसेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी कायद्याची माहिती आणि जाणीव असणे आवश्यक आहे. विशेषतः बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलूमुला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, निर्भय विद्यार्थी अभियानाचे संस्थापक सदस्य अॅड. दिलीप कुऱ्हाडे, निखिल गायकवाड, विजय शिवले, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे पूजन करून सामूहिक वाचन करण्यात आले. विशेष म्हणजे, संविधान दिनानिमित्त एकाच व्यासपीठावर संविधानाच्या प्रास्ताविकेचे मराठी, हिंदी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये वाचन व सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उर्दू भाषेत प्रास्ताविका सादर केली, तर पथनाट्याच्या माध्यमातून हिंदी भाषेत संविधानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. या बहुभाषिक उपक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

शाळेतील विद्यार्थिनींच्या बँड पथकाने मान्यवरांना मानवंदना देऊन स्वागत केले. तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलूमुला यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज असल्याचे सांगितले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव झाल्यास सुजाण, सुशिक्षित आणि कायद्याचे पालन करणारी पिढी घडण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमानंतर लक्ष्मीनगर आणि परिसरातून विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. संविधानातील मूल्ये, नागरिकांचे अधिकार आणि कायद्याचे महत्त्व यांचा संदेश विद्यार्थ्यांनी या रॅलीद्वारे परिसरात पोहोचविला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे प्राथमिक व माध्यमिक विभाग, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, निर्भय विद्यार्थी अभियान आणि परिवर्तन संस्था यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन भाषा, एक संविधान; विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाणीव निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न!

मराठी, हिंदी आणि उर्दू या तीन भाषांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण करून विविधतेतील एकतेचा संदेश देण्यात आला. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या आचरणात रुजावीत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.