#Modi Meets Sharad Pawar – Sinhasan News

पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा केली याची शरद पवारांनी दिली माहिती
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत दोन विषयांवर चर्चा केल्याचं सांगितलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी ही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत.”

“महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत मी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली नाही. मी यातील केवळ एका प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण एका पत्रकाराशी संबंधित आहे. त्या पत्रकाराचं नाव आहे संजय राऊत. संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत. परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“आम्ही आमचे दोन विषय पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले आहेत. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की या विषयांवर ते गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील,” असंही पवारांनी नमूद केलं.

दिल्लीत मोदी-शरद पवार भेट; राष्ट्रवादी-भाजप नेते म्हणतात…
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास 20 मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच ही भेट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत फक्त दोन्ही नेते उपस्थित असल्याचं समजत आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहू नये असं म्हटलं आहे. “नितीन गडकरीदेखील शरद पवारांच्या निवासस्थानी भोजनाला उपस्थित होते. आज शरद पवार आणि मोदींची भेट झाली. पण यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. हा एका राजकीय परंपरेचा भाग आहे. विचारांचे मतभेद असले तरी मनभेद असण्याची गरज नाही. शब्दांचा योग्य उपयोग, एकमेकांचा सन्मान करताना योग्य क्षणी भाव व्यक्त करणं हा यामागचा भाग आहे. भाजपची शिवसेनेसोबत नक्कीच कटुता आहे, मात्र राष्ट्रवादीशी कटुता असण्याचं सध्या कोणतं कारण नाही, असं त्यांनी म्हटलं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रतिक्रियेचा अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांनी कसलंही तथ्य नसताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. राष्ट्रवादी हा एक पक्ष नाही तर कुटुंब आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.”

‘सर्वच पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. शरद पवार यांना 55 वर्ष.संसदीय राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यात गैर काहीच नाही. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या कारवाया सुरू आहेत, त्याबद्दलही या भेटीत चर्चा झाली असावी. मात्र मलाही या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची नेमकी माहिती नाही,’ असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.