राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – Sinhasan News

रखडलेल्या पावसाळी वाहिन्यांच्या कामाचा मुहूर्त कधी? पुण्यात महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार
पुणे– पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण होणारी दरवर्षीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला यंदा मुहूर्त सापडला खरा मात्र उपाय योजनेसाठी सुरू केलेल्या कामालाच विलंब होत असल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गंभीर बाब म्हणजे काम सुरू करून एक महिना झाला तरी देखील अत्यंत संथगतीने सुरू असणाऱ्या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. उलट उपयोजना करण्यासाठी केलेल्या कामामुळेच अपघात निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे.

येरवड्यातील प्रभाग क्रमांक दोन येथील अग्रसेन हायस्कूल ते कॉमरझोन रस्त्यावर मोठ्या व्यासाच्या पावसाळी वाहिन्या बसवण्याचे काम संथ गतीने सुरू असून कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणते उपाय योजना न केल्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल असे मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथील अग्रसेन हायस्कूल ते कॉमरझोन रस्त्यावर दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत असतात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी या महत्त्वपूर्ण कामासाठी महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडला. मागील महिन्यात NDMA अंतर्गत मोठ्या व्यासाच्या पावसाळी वाहिन्या बसविण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली. त्याकरिता रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली असून त्यामध्ये पाणी व गाळ साचलेला आहे. कॉमरझोन कडे वळताना हा मोठा खड्डा असून त्यामध्ये अनेक केबलच्या वाहिन्या अस्ताव्यस्त पडलेले आहेत. खोदाई केलेला राडाराडा देखील रस्त्याच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भागापर्यंत पसरलेला आहे.

या परिसरात दोन मोठ्या शाळा असून कॉमरझोन आयटी पार्क मुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. एकंदरीत या सर्व परिस्थितीत या ठिकाणी मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे काम पंधरा दिवसांपासून बंदच असल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाच वेळी ड्रेनेज विभागाचे काम सुरू असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केबल वाहिन्या देखील टाकण्यात येत असल्याचे लक्षात येते. कदाचित एका कामासाठी परवानगी घेऊन इतर विभागाची खाजगी ठेकेदारांची कामे अधिकाऱ्यांना हाताशी पकडून कदाचित सुरू असावीत अशी देखील शंका निर्माण होत आहे.

एकंदरीतच पावसाळी वाहिन्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अशाप्रकारे ठेकेदाराकडून कामाला होणारा विलंब, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सर्वकाही अलबेल असल्याचे लक्षात येते. सदर ठिकाणी तातडीने कामाला सुरुवात करून सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांसह काम लवकरात लवकर वेळेत पूर्ण करावे. तसेच कामासाठी विलंब करणारे ठेकेदार व दुर्लक्ष करणारे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर देखील कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष निखिल गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पुण्यात पाण्यावरून राजकारण तापले, भाजपकडून प्रशासनाची पाठराखण तर राष्ट्रवादी कडून आंदोलन, एक महिन्यानंतरही समस्या सोडवण्यात अपयश
पुणे – भामा आसखेड प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा होईपर्यंत यावर अवलंबून असणाऱ्या भागात दिवसभर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करू नये, अशा सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. शहराच्या पूर्व भागातील दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्ये संदर्भात महापालिका आयुक्तांनी भामा आसखेड प्रकल्प जलशुद्धीकरण केंद्राला स्थानिक लोकप्रतिनिधींसह नुकतीच भेट दिली.

यावेळी नगरसेविका अश्विनी भंडारे, संगीता दांगट, नंदिनी धेंडे, शीतल सावंत, नगरसेवक अनिल टिंगरे, रवी उर्फ हर्षल टिंगरे, सुहास टिंगरे, अनिल सातव, रामदास दाभाडे यांच्या सह माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक राहुल भंडारे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे शहराच्या उत्तर पूर्व भागातील गढूळ आणि पिवळसर तसेच अपुऱ्या कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी कशाप्रकारे शुद्ध केले जाते याचा प्रत्यक्ष आढावा त्यांनी यावेळी घेतला. तज्ञांच्या मदतीने गढूळ पिवळसर पाण्याच्या तक्रारीचे पुढील दोन दिवसात निराकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले. तज्ञांच्या पाहणीनंतर व त्यांच्या निष्कर्षानंतर यावर उपाययोजना होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट करण्यात आलं. भामा आसखेड प्रकल्पाच्या वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने MSEDCL विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याबाबत देखील महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत.

पुणे महापालिकेत पाण्याचे राजकारण
एकंदरीतच या गंभीर समस्येला महिना उलटला तरी महापालिका प्रशासनाला यावर उपाययोजना करता आली नाही. प्रभाग दोनच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयावर आंदोलन करून उपाययोजना करण्याची मागणी केली. तर सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाच्या चुकांची पाठराखण करत सोयीच्या भूमिका घेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांनी देखील दोन वेळा भामा आसखेड प्रकल्पाला भेट दिली. एकंदरीतच पाण्याच्या या गंभीर समस्येबाबत सत्ताधारी भाजप व सत्तेत असूनही प्रशासनावर पकड नसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुटप्पीपणा या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. सत्तेत असणारा भाजप पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात ठरत असून महापौरांनी आदेश देऊन देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते. तर भाजपसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापालिकेत प्रशासनावर स्वतःची पकड निर्माण करता न आल्यामुळे आता पक्षावर आंदोलनाची वेळ आली आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजप आणि राष्ट्रवादी यामधील धूसफूस या निमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांना दिसून येत आहे.

बापू पठारेंना स्पष्ट भूमिकाच घेता येईना

विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या घरात मुलगा आणि सून हे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे मतदारसंघात काम करताना त्यांनाही स्पष्ट भूमिका घेता येत नसल्याचे दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या महापालिका आयुक्त तरी किती गांभीर्याने सोडवतात हे पाहणे आता गरजेचे आहे.

महायुतीत पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवरून खलबते; भाजप की राष्ट्रवादी कोण मारणार बाजी ?
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुण्यातील जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पुण्याच्या जागेवर जोरदार दावा ठोकल्याने उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पुण्याची जागा कोणाला सुटणार यावर आगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १ जून २०२६ पर्यंत वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मजबूत संख्याबळ असल्याने दोन्ही पक्षांकडून या जागेवर हक्क सांगितला जात आहे. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यात भाजपने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिकांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही ग्रामीण भागात आपली पकड कायम ठेवत संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ही जागा प्रतिष्ठेची मानत आहेत.

भाजपकडून संघटनात्मक काम करणाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेल्या काही नावांची चर्चा सुरू आहे.   दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समन्वय साधू शकणाऱ्या नेत्याच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी पुण्याची जागा सोडण्यास दोन्ही पक्ष फारसे तयार नसल्याचे चित्र आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असते तर भाजपने या जागेसाठी एवढा जोर लावला नसता पण दादा नसल्याने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी, बैठका आणि मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे पुण्याची जागा अखेर भाजपला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली बाजू वरचढ कशी हे सांगत जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, राहुल कुल, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जागा भाजपलाच सुटली पाहिजे व पक्षाने पुण्याचा जागेवरचा आग्रह सोडू नये अशी भूमिका मांडली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे, सुनील टिंगरे, निलेश निकम,माजी उपमहापौर दीपक मानकर, विलास लांडे, सुरेश घुले, योगेश बहल या पुणे शहर व जिल्ह्यातील नेत्यांनीही पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगत या जागेवर दावा सांगितला आहे. तर पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही आपली भूमिका मांडली आहे.

भाजपचे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आमचे ३३३ मतदार असल्याचे सांगत या जागेवर ठाम दावा सांगितला आहे. तर त्याला प्रत्युत्तर देत सुनील टिंगरे, निलेश निकम यांनी आमचे ३४४ मतदार सदस्य असल्याचा दावा करत पुण्याच्या जागेवर राष्टवादीचाच स्वाभाविक हक्क आल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहर पातळीवरील नेत्यांमध्ये जागेवर वाद सुरू असून ही जागा कोणाला सुटणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा तिढा कसा सोडवणार हे पाहावे लागणार आहे. आगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा वाद सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.

ज्युनिअर कॉलेज-खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील भागीदारीवर बंदी घालण्याची मागणी
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे चालू शैक्षणिक वर्षात कार्यवाहीचे आश्वासन

मुंबई : राज्यभरात NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील विविध अनियमितता व खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील कथित अनधिकृत व्यावसायिक संबंधांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली.
यावेळी ॲड. अमोल मातेले यांनी मंत्री महोदयांकडे सविस्तर निवेदन सादर करत अनेक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी कोचिंग संस्थांमध्ये थेट अथवा अप्रत्यक्ष व्यावसायिक संबंध निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर, उपस्थिती व्यवस्थेवर, फी संरचनेवर आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

निवेदनामधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे ज्युनिअर कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसमधील थेट भागीदारीवर बंदी घालण्यासाठी विशेष शासन निर्णय (GR) जारी करणे. “कॉलेज प्रवेशासोबत मोफत क्लास” किंवा “क्लास घेतल्यास प्रवेश निश्चित” अशा एकात्मिक प्रवेश योजनांना बेकायदेशीर घोषित करणे. कॉलेज संचालक, विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींनी कोचिंग व्यवसायातील हितसंबंध शपथपत्राद्वारे जाहीर करणे बंधनकारक करणे. पालक व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू करणे. जिल्हास्तरीय विशेष तपास समिती स्थापन करून कॉलेज-कोचिंग व्यवहारांची चौकशी करणे. नियमभंग करणाऱ्या संस्थांवर मान्यता निलंबन अथवा रद्द करण्याची कारवाई करणे.

आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करणे. केवळ नावापुरत्या उपस्थितीवर आधारित शिक्षण पद्धतीला आळा घालणे. संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा प्रस्तावित करणे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक व नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष तपास मोहीम राबविणे.

बैठकीदरम्यान शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका व्यक्त केली. सदर विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये यासंदर्भात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ॲड. अमोल मातेले यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व्यापारीकरण रोखण्यासाठी, शैक्षणिक प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेलकडून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्धार

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन कार्यालयात शोकसभा पार पडली. या शोकसभेत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला आहे.

“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखणी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील काळात उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या नेत्या सुनित्राताई पवार,प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला मजबूती देण्याचा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या शोकसभा बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अजितदादा पवार यांच्या शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेवर पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी, अशी सुचना अण्णा बनसोडे यांनी दिली.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. बैठकी दरम्यान शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा सादर करत सूचना व्यक्त केल्या. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक, शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आगामी काळात जिल्हा व तालुकास्तरावर बैठका, जनजागृती अभियान व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

खडकी पोलीस स्टेशनजवळ उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे PWD चे आश्वासन
औंध  : औंध रस्ता ते खडकी रस्त्यावर खडकी पोलीस स्टेशनजवळ उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिले आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी याबाबत मागणी केली आहे.

याठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत रस्ता करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतुबंधन योजनेतून हा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. आज याबाबत सुनील माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेऊन असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत पत्र देऊन विनंती केली. त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या रस्त्याची पाहणी करून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार तसेच इतर आवश्यक संस्थांना देण्याचे आश्वासन दिले.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, औंध रोड, खडकी स्टेशन रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. हाच रस्ता पुढे खडकी पोलिस स्टेशन जवळून राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. या मार्गावर असलेल्या खडकी पोलिस स्टेशनच्या पाठीमागे रेल्वेचा ब्रिटिशशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून रस्ता जाऊन तो राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी, कोरेगाव पार्क, विमाननगर, येरवडा, नगर रस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र हा अंडरब्रिज रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते.

हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्गासाठी असलेल्या विशेष तरतुदीतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माने यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यावर त्यांनी राज्य सरकार कडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतुबंधन योजनेमधून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे राज्य सरकार मार्फत केंद्राच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला हा प्रस्ताव जाणे गरजेचे असल्याचे ही माने यांनी या भेटीत श्री. बाविस्कर यांना सांगितले. यावर त्यांनी लवकरच याबाबत पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याचे तसेच हा प्रस्ताव राज्य शासनासह आवश्यक संस्थाना पाठवण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी सचिन दांगट यांची निवड
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी सचिन दशरथ दांगट यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या वतीने त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. सचिन दांगट गेले अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात पुणे शहरात सक्रिय आहेत, त्यांनी नुकताच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

सचिन दांगट हे भारतीय जनता पक्षामध्ये सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम बघत होते. तसेच ते पुणे महापालिकेचे माजी स्वीकृत सभासद आहेत. शांत आणि मितभाषी असलेल्या सचिन दांगट यांचा मोठा मित्र परिवार आहे.

पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील तसेच पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सचिन दांगट यांनी निवडीनंतर म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निखिल गायकवाड
पुणे : आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व निखिल गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना पक्षाच्या पुणे शहर सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला आहे.

या प्रसंगी माजी आमदार व पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, मुस्लिम बँकेचे उपाध्यक्ष ऍड. आयुब शेख, अजय सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहरात मागील वीस वर्षांपासून विविध लोकप्रिय दैनिकातून पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी – शांतीनगर येथून सलग तीन वेळा (1974 ते 1985) विनाप्रचार महापालिकेवर निवडून आलेले त्यांचे काका(चुलते) रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिवंगत विजयराव गायकवाड यांचा वारसा लाभल्यामुळे त्या माध्यमातून देखील त्यांची समाजात स्वतंत्र ओळख आहे.

फुले -शाहू -आंबेडकरी विचारधारेवर काम करत असताना त्यांनी त्यांच्या निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक विधायक उपक्रम तसेच अनेक प्रश्नांवर चांगल्या प्रकारे काम केलेले आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देखील सक्रिय असे काम केले. निखिल गायकवाड यांच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एक प्रामाणिक,अभ्यासू नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

विजय खळदकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..
प्रभाग ३० कर्वेनगर, होम कॉलनी मधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली.

कर्वेनगर : काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे माजी अध्यक्ष व मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. विजय खळदकर यांच्या पक्षातील प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कर्वेनगर भागातील ताकद वाढली असून होत असलेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

विजय खळदकर यांची गेले अनेक दिवसांपासून पक्षांतराची चर्चा सुरू होती, आज अखेर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश पार पडला आहे. होऊ घातलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत कर्वेनगर प्रभाग 30 मध्ये खळदकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ वाढले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकीत एकत्र येऊन लढवणार असल्याचे  निश्चित झाले असल्याने या प्रभागात भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा तगडा पॅनल पाहायला मिळणार आहे.

प्रभागातील नागरिकांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवता याव्यात, या उद्देशाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, तो विश्वास प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार केला असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहून, विकासकामांच्या माध्यमातून पक्षाचा आणि नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी भावना विजय खळदकर यांनी पक्ष प्रवेशानंतर व्यक्त केली आहे.

प्रमोद शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (श प.) पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा
कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे माजी अध्यक्ष
प्रमोद शिंदे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येणारी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कालच पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  आज प्रमोद शिंदे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवला आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने घेतलेल्या सरकार विरोधात घेतलेल्या अनेक आंदोलनात सहभागी होत या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. राष्ट्रवादीत दोन भाग पडल्यानंतर शरद पवार यांच्या बरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांनी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत पक्षाची बाजू खंबीरपणे न डगमगता मांडत संघर्ष केला.

या येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असे वाटत असताना आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते निराश झाले असून त्यातून राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे.

प्रमोद शिंदे यांनी दिलेले राजीनामा पत्र